Pankaja Munde : ...तर मी कोणत्याही मंचावर जाण्यास तयार; पंकजा मुंडेंचं सूचक विधान

Parali Shasan Aplya Dari : परळीतील सभेत खासदार प्रीतम यांच्या प्रतिनिधी म्हणून उपस्थित
Pankaja Munde
Pankaja MundeSarkarnama
Published on
Updated on

Beed Political News : कृषीमंत्री धनंजय मुंडेंच्या बीडमधील परळीत शासन आपल्या दारी हा कार्यक्रम पार पडला. या कार्यक्रमाला भाजप नेत्या पंकजा मुंडे आवर्जून उपस्थित होत्या. त्यातच त्या धनंजय मुंडे यांच्यासोबत एकत्रच हेलिकॉप्टरमधून कार्यक्रमस्थळी आल्याने राजकीय वर्तुळातून भूवया उंचावल्या गेल्या. यावेळी पंकजा यांनी मी कोणत्याही मंचावर जाण्यास तयार आहे, असे विधान केले. यानंतर मात्र आगामी निवडणुकीत परळीतील राजकीय स्थिती बदलणार का, याबाबत राजकीय वर्तुळात उलटसुलट चर्चा सुरू झाल्या आहेत.

पंकजा मुंडे यांचा २०१९ च्या विधानसभेत परळीतून पराभव झाला. यानंतर त्यांना भाजपने राज्याच्या राजकारणातून दूर ठेवल्याचे वारंवार बोलले गेले. याबाबत पंकजा यांनीही जाहीरपणे नाराजी व्यक्त केली. फॉर्म भरायला सांगूनही विधानसभेत स्थान दिले नसल्याची खंत व्यक्त केली. राज्यात मला का डावलले जाते, याबाबत केंद्रीय मंत्री अमित शाह यांच्याशी चर्चा करणार असल्याचेही त्यांनी सांगितले होते. मात्र अद्यापही वेळ मिळाली नसल्याचे बोलले जात आहे. दरम्यान, पंकजा मुंडे भाजप पक्ष सोडण्याच्याही चर्चा झडल्या आहेत, मात्र याला त्यांनी खोटे असल्याचे म्हटले.

Pankaja Munde
Telangana News : भाजप आधी काँग्रेसची बाजी! तेलंगणाच्या मुख्यमंत्रिपदाचा तिढा सुटला, रेवंथ रेड्डींच्या नावाची घोषणा

शिवसेना आणि राष्ट्रवादी फुटल्यानंतर राज्याची राजकीय समीकरणे बदलली आहेत. माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी आम्ही राज्याला पहिली महिला मुख्यमंत्री देऊ, असे विधान केले होते. ठाकरेंच्या या विधानानंतर राजकीय वर्तुळातून राष्ट्रवादी नेत्या खासदार सुप्रिया सुळे आणि भाजप नेत्या पंकजा मुंडे (Pankaja Munde) यांच्या नावाचीच चर्चा झाली. त्यामुळे मुंडे या ठाकरे गटात जाणार असेही बोलले गेले.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

दिवंगत गोपीनाथ मुंडे काँग्रेसमध्ये प्रवेश करणार होते. मात्र तो प्रवेश काही कारणांनी झाला नाही. आता पंकजा काँग्रेसममध्ये जाण्याचीही शक्यता वर्तवली जात होती. तसेच रासप प्रमुख महादेव जानकर यांनीही भाजपमध्ये बहीण पंकजा यांना त्रास होत असेल तर साडीचोळी देऊन माहेरी घेऊन येणार, असल्याचे वक्तव्य केले होते. दरम्यान, राजकीय वर्तुळात पक्ष बदलाच्या कितीही चर्चा झडल्या असल्या तरी पंकजा मुंडेंनी तसे काही होणार नसल्याचे स्पष्ट केले आहे.

या पार्श्वभूमिवर परळीतील शासन आपल्या दारी कार्यक्रमात पंकजा मुंडेंनी मी कोणत्याही मंचावर जाण्यास तयार असल्याचे विधान केले आहे. पंकजा मुंडे म्हणाल्या, 'मी खासदार प्रीतम मुंडेंची प्रतिनिधी आणि परळीची कन्या म्हणून या व्यासपीठावर आले आहे. आता परळीचा विकास व्हावा, यासाठी मी कोणत्याही व्यासपीठावर जाण्यास तयार आहे. परळीकरांनी मला भरभरून दिले आहे. माझ्या पुढच्या पिढ्यांनीही त्यांच्यासाठी काम केले तरी त्यांचे ऋण फिटणार नाही.'

(Edited by Sunil Dhumal)

Pankaja Munde
Nagpur Winter Session : विदर्भाचे प्रश्न फक्त पाच दिवसांच्या अधिवेशनात कसे सुटतील? : जयंत पाटील

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com