Nagpur Winter Session : विदर्भाचे प्रश्न फक्त पाच दिवसांच्या अधिवेशनात कसे सुटतील? : जयंत पाटील

Vidarbha Issues : सोयाबीनची आज शेतकऱ्याला जी आधारभूत किंमत मिळते. त्यातून सोयाबीन काढणेदेखील परवडत नाही.
Amravati  NCP Rally
Amravati NCP RallySarkarnama
Published on
Updated on

Amravati News : विदर्भातील प्रश्न सोडवण्यासाठीच नागपूरचं अधिवेशन आहे. पण, ते किती दिवस आहे? बहुतेक आमदार गुरुवार, शुक्रवार या तीन दिवसांसाठी येणार नाहीत, फक्त पाच दिवसांचे हे अधिवेशन राहील. विदर्भाचे प्रश्न सुटायचे असतील तर नागपूरला एक महिन्याचे अधिवेशन व्हायला पाहिजे, अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी केली. (How Vidarbha issues will be resolved in just five days session: Jayant Patil)

अमरावती येथे राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने आक्रोश मोर्चाचे आयोजन करण्यात आले होते. आमदार रोहित पवार, अनिल देशमुख, रोहिणी खडसे यांच्यासह राष्ट्रवादीचे अनेक नेते सहभागी झाले होते. त्या मोर्चात जयंत पाटील बोलत होते.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

Amravati  NCP Rally
Karmala Sugarcane Issue : शिंदे-सावंतांवर शेतकऱ्यांचा भरोसा नाय का? करमाळ्यातील ऊस पवारांच्या कारखान्यांना...

जयंत पाटील म्हणाले की, जनतेचे प्रश्न सोडविण्यासाठी सरकारला वेळ नाही. तुमचे प्रश्न त्यांच्या दृष्टीने महत्त्वाचे नाहीत. विदर्भाच्या प्रश्नावर चर्चा करायला सरकारला वेळच नाही. आम्ही जो मोर्चा काढला आहे, तो सोयाबीनचे बाजारभाव पडले आहेत, म्हणून काढला आहे. जेव्हा जेव्हा शेतकऱ्याला दर मिळतो, त्यावेळी मोठा बडगा उगारला जातो. तेलाची आयात केली, सोयाबीनची आणि तेलबियांचे दर घसरले. सोयाबीनची आज शेतकऱ्याला जी आधारभूत किंमत मिळते. त्यातून सोयाबीन काढणे देखील परवडत नाही. म्हणून सोयाबीनला किमान 8000 रुपये प्रति क्विंटल दर मिळावा, ही आपली मागणी आहे.

कपाशीच्या संदर्भात साडेसहा-सात हजाराच्या वर दर जात नाही. जळगाव जिल्ह्यात सहा हजारांच्या वर शेतकऱ्याला चांगला बाजारभाव मिळाला नाही. आज राज्यात कापसाचे दर मागच्या वर्षीच्याही 12000 रुपयांच्या खाली गेले आहेत. कापसाला 14 हजार रुपये प्रतिक्विंटल बाजारभाव देण्याची व्यवस्था सरकारने करावी. या सरकारचे शेतकऱ्यांकडे प्रचंड दुर्लक्ष आहे. त्यांनी अजूनही कापूस खरेदी केंद्र सुरू केलेले नाही, असा आरोपही जयंत पाटील यांनी केला.

Amravati  NCP Rally
Backward Classes Commission : राज्य मागासवर्ग आयोगाचे अध्यक्ष राजीनामा देणार?; दोन मंत्र्यांच्या दबावाची चर्चा

आपल्याकडील संत्रा, केळी बांगलादेशला जातात. अनेक गोष्टींसाठी बांगलादेश आपल्यावर अवलंबून असताना शेतीमालावर कर वाढवण्याचे काम केंद्र सरकारकडून होताना दिसत आहे. त्याला कोणीही विरोध करत नाही. संत्र्याचा हंगाम संपला आणि लगेच सरकारने घोषणा केली. आम्ही 50 टक्के मदत देवू, म्हणजे महाराष्ट्रातल्या शेतकऱ्याला कसं फसवलं जातं. हे बघा. कांद्याची निर्यातीवर 40 टक्के कर लावला आहे. शेतकऱ्याला जेव्हा चार पैसे मिळायचा प्रश्न येतो, त्यावेळी हे सरकार दिल्ली आणि मुंबईतील लोकांचा विचार करतं. शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडलं जात आहे, असेही पाटील यांनी स्पष्ट केले.

Amravati  NCP Rally
Solapur MIM News : तेलंगणातील यशाचे ‘टॉनिक’ एमआयएमला सोलापुरात आमदारकी मिळवून देणार...?

जयंत पाटील म्हणाले की, सरकारने शेतकऱ्यांना दिलेली सर्व आश्वासने फसवी ठरली आहेत. जनता या सरकारावर नाराज आहे. सरकार नुसतंच घोषणा करतं. शासन आपल्या दारी नावाच्या इव्हेंट मोठ्या प्रमाणात करत आहे. दोन दोन कोटी रुपये फक्त मंडपावर खर्च करतात, पाच पाच कोटी रुपये फक्त त्या इव्हेंटसाठी खर्च करत आहेत. पण त्यातूनही लोकांचे प्रश्न सुटत नाहीत.

राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार, अनिल देशमुख, राजेश टोपे, प्राजक्त तनपुरे, संदीप क्षीरसागर, सुनील भुसारा हे सगळे आमदार जनतेच्या मागण्यांवर सरकारवर तुटून पडतील आणि कोणत्याही परिस्थितीत या प्रश्नांची चर्चा सभागृहात घडवतील, असेही जयंत पाटील यांनी अमरावती येथील आक्रोश मोर्चामध्ये सांगितले.

Amravati  NCP Rally
Shiv Sena MLA Disqualification Case : शिवसेना आमदार अपात्रतेप्रकरणी मोठा गौप्यस्फोट; ‘एकही आमदार अपात्र होणार नाही...’

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com