Pankaja Munde emotional appeal : ‘... तर 3 जून हा दिवस उजाडूच नये’; गोपीनाथ मुंडेंच्या स्मृतिदिनानिमित्त पंकजा मुंडेंचं हृदय हेलावणारे आवाहन चर्चेत

Gopinath Munde death anniversary News : भाजपचे दिवंगत नेते गोपीनाथ मुंडे यांचा 3 जून रोजी स्मृतिदिन आहे. त्या निमित्ताने पंकजा मुंडेंनी भावनिक आवाहन केले आहे.
Pankaja Munde, Gopinath Munde
Pankaja Munde, Gopinath MundeSarkarnama
Published on
Updated on

Beed News : भाजपचे दिवंगत नेते गोपीनाथ मुंडे यांचा 3 जून रोजी स्मृतिदिन आहे. त्या निमित्ताने पंकजा मुंडेंनी भावनिक आवाहन केले आहे. मुंडे यांच्या स्मृतीदिनानिमित्त गोपीनाथ गडावर व परळी शहरात विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमास नागरिकांनी मोठया संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन राज्याच्या पर्यावरण मंत्री पंकजा मुंडे यांनी केले आले आहे.

'दरवर्षी प्रमाणे आपल्या सर्वांचे लाडके लोकनेते गोपीनाथ मुंडे यांच्या पुण्यतिथीचा दिवस आला आहे. 3 जून हा दिवस उजडूच नये, असे आपल्यासारख्या असंख्य कार्यकर्त्यांना वाटते. पण त्या दिवशी मुंडे साहेबांच्या विचाराचे स्मरण करून त्यांच्या विचारावर चालण्याची शपथ घेऊन अनेक जण गोपीनाथ गडावर येऊन ऊर्जा घेत असतात. या दिवशी परंपरेप्रमाणे डोक महाराजांचे कीर्तन व उपस्थित राहतील तेवढ्याचे भोजन. हा गोपीनाथ मुंडे साहेबांचा पारिवारिक कार्यक्रम आहे, तर आपण सर्वानी 3 जूनला सकाळी 11वाजता गोपीनाथ गडावर उपस्थित राहावे,' असे आवाहन पंकजा मुंडे (Pankja Munde) यांनी केले आहे.

Pankaja Munde, Gopinath Munde
Mahayuti Government : महायुती सरकारमध्ये मंत्रीच अस्वस्थ, अधिकार मिळेनात? CM फडणवीसांना साकडे!

त्यासोबतच गोपीनाथ मुंडे (Gopinath Munde) यांच्या स्मृतिदिनानिमित्त परळी शहरात विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. त्यासोबतच गोपीनाथ गड येथे विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. यावेळी राज्याच्या पर्यावरण मंत्री पंकजा मुंडे यांच्यासह मान्यवरांची उपस्थिती राहणार आहे.

Pankaja Munde, Gopinath Munde
Uddhav Thackeray : ठाकरेंची धडधड वाढली, नाराज शिलेदाराच्या लेकीच्या लग्नाला शिंदे लावणार हजेरी, नेता गळाला?

यामध्ये 2 जून रोजी वैद्यनाथ मंदिर परिसरात कापडी पिशवी मशीनचे उद्घाटन केले जाणार आहे. याबरोबरच मंदिर परिसरात स्वच्छता मोहीम व वैद्यनाथाची महाआरती केली जाणार आहे. यानंतर आनंदधाम परिसरात वृक्षारोपण केले जाणार आहे.

Pankaja Munde, Gopinath Munde
Sanjay Raut Politics : अजित पवारांनी राजीनामा द्यावा, संजय राऊतांनी सांगितले 'हे' कारण

त्यासोबतच 3 जून रोजी गोपीनाथ गड येथे रक्तदान शिबीर व आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. त्यासोबतच वृक्ष रोपांचे वाटप केले जाणार आहे. तरी या सर्व कार्यक्रमास नागरिकांनी मोठया संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन करण्यात आले आहे.

Pankaja Munde, Gopinath Munde
Ajit Pawar first reaction : सात आमदारांनी साथ सोडल्यानंतर अजित पवारांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, 'तक्रारी केल्या...'

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com