Pankaja Munde Video : पंकजा मुंडे नुकसानीच्या पाहणीसाठी गेल्या, शेतात बाजावर बसून खाल्ली भाजी- भाकरी!

Pankaj Munde visits disaster-hit village in Beed: अतिवृष्टीचा फटका बसलेल्या बीड जिल्ह्यातील नुकसानग्रस्त पिकांची पाहणी मंत्री पंकजा मुंडे यांनी केली. यावेळी त्यांनी शेतकऱ्यांना तत्काळ मदत करण्याचे आश्वासन देखील दिले.
Pankaja Munde
Pankaja Munde sarkarnama
Published on
Updated on

Pankaja Munde News : अतिवृष्टीचा सर्वाधिक फटका मराठवाड्यातील शेतकऱ्यांना बसला आहे. पिकांचे नुकसान झाले आहे. सगळे पीक पाण्याखाली गेल्याने शेतकरी चिंतेत आहेत. झालेल्या नुकसानाची पाहणी मंत्र्यांकडून करण्यात येत आहे. बुधवारी मंत्री पंकजा मुंडे यांनी बीड जिल्ह्यात जात शेतकऱ्यांच्या झालेल्या नुकसानीची पाहणी केली.

गेवराई तालुक्यातील हिरापूर येथे अतिवृष्टीमुळे सिंदफणा नदीला आलेल्या पुरामुळे पिकांच्या झालेली नासाडीची पाहणी पंकजा मुंडे यांनी शेताच्या बांधांवर जाऊन केली. या दौऱ्यानंतर शेतकऱ्यांसोबत त्यांच्या शेतातच भाजी-भाकरीचा आस्वाद घेतला. बाजावर बसून भाजी भाकरी खात असलेला त्यांचा फोटो सोशल मीडिवावर व्हायरल झाला आहे. त्यावर उलटसुलट प्रतिक्रिया देखील उमटत आहेत.

गेवराईसह शिरूर तालुक्यातील ब्रम्हनाथ येळंब, वणवे वस्ती येथे अतिवृष्टीने शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसानीचे पाहणी पंकजा मुंडे यांनी केली. या भागाची पाहणी करून त्यांनी शेतकरी व नागरिकांच्या सोबत संवाद साधून व्यथा जाणून घेतल्या.प्रशासनाकडून झालेल्या नुकसानाचे पंचनामे करणे सुरू असून याबाबत कोणतीही दिरंगाई न करता अतिवृष्टीजन्य परिस्थिती पूर्वपदावर आणण्यासाठी काम करण्याचे निर्देश देखील त्यांनी अधिकाऱ्यांना दिले.

Pankaja Munde
Sambhaji Bhide Controversial Statement : 'दांडिया खेळणं म्हणजे हांडगेपणा, नपुसंकत्व...', संभाजी भिडेंचे वादग्रस्त विधान

शेती वाहून गेल्या, विहीरी बुजल्या...

पावसामुळे शिरूर कासार तालुक्यातील नांदवली येथे प्रचंड नुकसान झाले आहे. येथी शेती वाहून गेली, विहिरी दबून गेल्या तसेच पिकांचे अतोनात नुकसान झाले आहे. काही ठिकामी घरात देखील पाण्यात गेले. येथील शेतकऱ्यांची पंकजा मुंडे यांनी भेट घेतली. तातडीने पंचनामे पूर्ण करून आणि सर्वतोपरी मदत करणार असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.

शेतकरी मदतीच्या प्रतीक्षेत

सरकारकडून तातडीने पंचनामे करून मदत केली जाणार असल्याचे सांगितले जात आहे. मात्र, शेतकऱ्यांचा पीकांसह त्यांचे संसार उपयोगी साहित्य, जनावरे देखील वाहून गेली आहेत. काही ठिकाणी मनुष्यहाणी देखील झाली आहे. त्यामुळे सरकारने मदतीचा फार्स न करता तातडीने मदत जाहीर करून तिचे वाटप करावे, अशी मागणी नुकसानग्रस्त शेतकरी करत आहेत.

Pankaja Munde
Marathi leaders in Delhi: मराठी नेत्यांचा दिल्लीत दबदबा आहे का? देशासाठी काय केले?

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com