Pankaja Munde News : मुंडे बहीण-भावातील संघर्षाला पूर्णविराम; दहा वर्षानंतर गोपीनाथ गडावर आले एकत्र !

Political News : भाजपकडून लोकसभेची उमेदवारी मिळाल्यानंतर पहिल्यांदाच पंकजा मुंडे या परळी नगरीमध्ये आल्या आहेत. या पार्श्वभूमी बीडच्या गोपीनाथ गड येथे पंकजा मुंडेंच्या स्वागतासाठी भाऊ धनंजय मुंडे, बहीण प्रीतम मुंडे यांनी हजेरी लावली.
Pankja munde, Dhnanjy Munde, Pritam munde
Pankja munde, Dhnanjy Munde, Pritam munde Sarkaranma
Published on
Updated on

Beed News : लोकसभा निवडणुकीचे रणशिंग फुंकण्यात आल्याने सर्वच पक्षांकडून तयारी सुरु करण्यात आली आहे. निवडणुकांमुळे राज्यातील वातावरण चांगलेच तापले आहे. सत्ताधारी व विरोधक एकमेकांवर आरोप करीत असताना बीडमध्ये मात्र लोकसभा निवडणुकीच्या निमित्ताने एकमेकाविरोधात निवडणुकीत उभे राहणारे पंकजा मुंडे, धनंजय मुंडे हे बहीण भाऊ दहा वर्षानंतर गोपीनाथ गडावर एकत्र आले.

भाजपकडून लोकसभेची उमेदवारी मिळाल्यानंतर पहिल्यांदाच पंकजा मुंडे या परळी नगरीमध्ये आल्या आहेत. या पार्श्वभूमी बीडच्या गोपीनाथ गड येथे पंकजा मुंडेंच्या स्वागतासाठी भाऊ धनंजय मुंडे, बहीण प्रीतम मुंडे यांनी हजेरी लावली. यावेळी पंकजा मुंडे या गोपीनाथ गडावर दाखल झाल्या होत्या. (Pankaja Munde News )

Pankja munde, Dhnanjy Munde, Pritam munde
Lok Sabha Election 2024 : बारामतीनंतर रावेरमध्येही नणंद-भावजय मैदानात? रोहिणी खडसे म्हणाल्या...

तीनही मुंडे बहीण भावांनी दिवंगत लोकनेते गोपीनाथराव मुंडे यांच्या समाधी स्थळाचे दर्शन घेतले. 21 जेसीबीच्या माध्यमातून आणि परराज्यातील ढोल ताशाच्या गजरात पंकजा मुंडे यांचे स्वागत करण्यात आले. महायुतीची बीड लोकसभा उमेदवारी मिळाल्यानंतर माजी मंत्री पंकजा मुंडे यांनी गोपीनाथ गड येथे गोपिनाथ मुंडे यांच्या समाधीचे दर्शन घेतले.

यावेळी पालकमंत्री धनंजय मुंडे, खासदर डाॅ. प्रितम मुंडे यांच्यासह असंख्य कार्यकर्ते उपस्थित होते. यावेळी मुंडे यांच्या समाधीवर पुष्प अर्पण करण्यात आले. पालकमंत्री धनंजय मुंडे यांनी बहीण पंकजा मुंडे यांचे गोपीनाथ गड येथे जंगी स्वागत केले.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)


धनंजय मुंडे यांनी 12 वर्षपूर्वी भाजपपासून (Bjp) वेगळे होत राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला होता. त्यासोबतच 2014 साली झालेल्या लोकसभा निवडणुकीनंतर गोपीनाथ मुंडे यांचे अपघाती निधन झाले होते. त्यानंतर 2014 साली झालेल्या विधानसभा निवडणुकीत पंकजा मुंडेंनी परळी विधानसभा मतदारसंघातून धनंजय मुंडेंचा (Dhanjay Munde) पराभव केला होता.

2019 साली झालेल्या विधानसभा निवडणुकीत धनंजय मुंडेंनी पंकजा मुंडेंचा (Pankaja Munde) पराभव केला होता. त्यानंतर दहा वर्षानंतर 2024 च्य लोकसभेसाठी पंकजा मुंडेंना उमेदवारी मिळाल्याने मुंडे बंधू-भगिनी गोपीनाथ गडावर एकत्र आल्याचे चित्र पाहावयास मिळाले. यावेळी पंकजा मुंडे यांच्या स्वागतासाठी नागरिकांनी गर्दी केली होती.

Pankja munde, Dhnanjy Munde, Pritam munde
Lok Sabha Election 2024 : गेवराईसाठी पंकजा मुंडेंचा 'सुवर्णमध्य' फॉर्म्युला

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com