

Ahilyanagar investment news : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दावोस इथून महाराष्ट्रासाठी हजार कोटी रुपयांची गुंतवणूक आणल्याचा दावा केला आहे. याच गुंतवणुकीमधून अहिल्यानगरच्या वाट्याला काहीतरी मिळावं, यासाठी भाजपचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी प्रयत्न सुरू केले आहेत.
तसेच, 'डिफेन्स क्लस्टर'साठी शिर्डीत डिफेन्स संदर्भात काही उद्योग सुरू आहेत. आता पारनेर अन् संगमनेर इथंही त्यादृष्टीने प्रयत्न सुरू आहेत. यासाठी हजारो एकर जमीन मिळवण्याचे प्रयत्न, आमदार काशिनाथ दाते आणि आमदार अमोल खताळ यांच्या माध्यमातून सुरू आहे,' असे पालकमंत्री विखे पाटील यांनी सांगितलं.
पारनेरमधील वन खात्याची पाच हजार एकर, तर संगमनेरमधील एक हजार जमीन मिळवण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. हे दोन्ही तालुका मंत्री विखे पाटील यांचे राजकीय प्रतिस्पर्धींचे आहे. यात काँग्रेसचे (Congress) ज्येष्ठ नेते माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांचा संगमनेर आणि खासदार नीलेश लंके यांचे पारनेर होमग्राऊंड आहे. या प्रतिस्पर्धींच्या बालेकिल्ल्यात, मंत्री विखे पाटील यांनी डिफेन्स क्लस्टर, प्रयत्न सुरू केले असून, त्यासाठी हजारो एकर जमीन सरकारला मिळणार असल्याने, त्यावर काय राजकीय रिअॅक्शन येते, याकडे आता लक्ष लागलं आहे.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी दावोस इथून हजार कोटी रुपयांची गुंतवणूक आणली आहे. त्यापैकी काहींचा लाभ अहिल्यानगर जिल्ह्याला व्हावा यासाठी प्रयत्न सुरू आहेत, असेही पालकमंत्री विखे पाटील यांनी सांगितले. येत्या 2026-27 चा नियोजन आराखडा 756 कोटीचा असला, तरी तो 1000 कोटीचा करण्याबाबत प्रयत्न आहेत, असेही सांगितले.
अहिल्यानगरच्या श्रीगोंदा तालुक्यातील पेडगाव इथं छत्रपती संभाजी राजे शौर्यस्तंभ उभारण्यासाठी पाच कोटी, पासपोर्ट कार्यालयाच्या नूतनीकरणास एक कोटी, गणित विज्ञान प्रदर्शनसाठी एक कोटी देण्याचे नियोजन आहे. पाणंद रस्ता विकास मोहिमेत अधिकाधिक रस्ते घेतले जाणार आहेत. अहिल्यानगर जिल्ह्यातील सर्व प्राथमिक शाळांतून मुला-मुलींसाठी स्वतंत्र स्वच्छतागृहांसाठी 30 कोटी रुपये दिले जाणार आहेत, असेही मंत्री विखे पाटील यांनी सांगितले.
अहिल्यानगर जिल्ह्याशी संबंधित सर्व प्रलंबित प्रश्नांच्या सोडवणुकीसाठी मुंबईमध्ये लवकरच बैठक घेतली जाणार आहे. भंडारदरा धरणाला शंभर वर्ष पूर्ण झाल्याने येत्या वर्षभरात विविध कार्यक्रम आयोजित केले जाणार आहेत. तसेच भंडारदरा व निळवंडे पर्यटन विकास आराखडा तयार केला जाणार आहे, असे त्यांनी स्पष्ट केले.
पारनेर तालुका ड्रग्ज केंद्र होत चालले आहे. सिस्पे घोटाळा इथं झालेला आहे. पोलिसांनी या बाबी गोपनीय ठेवता कामा नये. जे घडले आहे आणि जे गुन्हेगार आहेत, त्यांची माहिती जनतेसमोर आणावी. ड्रग्ज संदर्भातील आरोपींचे ज्यांच्या समवेत फोटो आहेत, त्या लोकांनी त्याचे खुलासे केले पाहिजे, असेही मंत्री विखे पाटील यानी म्हटले.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.