Youth commits suicide in Beed : पंकजा मुंडेंचा पराभव सहन न झाल्याने बीड जिल्ह्यात आणखी एका तरूणाने संपवले जीवन!

Pankaja Munde defeat and Youth commits suicide : गळफास घेण्याच्या काही मिनिटे आधी स्वतःच्या मोबाईलवरून फेसबुकवर 'अलविदा' असे टाकून पोस्ट शेअर केली होती.
Pankaja Munde defeat and Youth commits suicide
Pankaja Munde defeat and Youth commits suicideSarkarnama

Pankaja Munde and Beed Lok Sabha election : लोकसभा निवडणुकीत पंकजा मुंडे यांचा झालेला निसटता पराभव जिव्हारी लागल्याने आणखी एका मुंडे समर्थक तरूणाने जीवन संपविल्याची घटना बीड जिल्ह्यातील आष्टी तालुक्यात घडली. पोपट वायभासे असे मृत तरूणाचे नाव आहे. बीड जिल्ह्यातील ही दुसरी घटना असून यापूर्वी अंबाजोगाई तालुक्यात देखील अशीच घटना घडली होती.

आष्टी तालुक्यातील चिंचेवाडी येथील पोपट मधुकर वायभासे (वय ३७ वर्षे) हा तरूण मुंडे समर्थक होता. नुकत्याच पार पडलेल्या लोकसभा निवडणुकीत पंकजा मुंडे यांचा पराभव त्याच्या जिव्हारी लागला होता. पराभव झाल्यापासून तो सारखा विचारात गेला होता. मंगळवारी रात्री बारा वाजण्याच्या दरम्यान त्याने चिंचेवाडी शिवारात एका झाडाला गळफास घेऊन जीवनयात्रा संपविली.

बुधवारी दुपारी चिंचेवाडी येथे त्याच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. मृत तरूणाच्या पश्चात पत्नी, एक मुलगा, एक मुलगी असा परिवार आहे. या प्रकरणी अंभोरा पोलिस ठाण्यास आकस्मात मृत्युची नोंद करण्यात आली आहे.

Pankaja Munde defeat and Youth commits suicide
Pankaja Munde : "तुम्हाला शपथ आहे, माझ्यासाठी मरण्यापेक्षा..." तरुणाच्या आत्महत्येनंतर पंकजा मुंडेंची भावनिक साद

दरम्यान, पंकजा मुंडे(Pankaja Munde) समर्थक असलेल्या पोपट वायभासे याने गळफास घेण्याच्या काही मिनिटे आधी स्वतःच्या मोबाईलवरून फेसबुकवर 'अलविदा' असे टाकून पोस्ट शेअर केली होती.

पंकजा मुंडे यांचा लोकसभा निवडणुकीत झालेला पराभव जिव्हारी लागल्याने अंबाजोगाई तालुक्यातील डिघोळअंबा येथील ऊसतोड कामगार युवक पांडुरंग रामभाऊ सोनवणे यानेही नुकतीच शेतात गळफास घेत आत्महत्या केली होती.

पंकजा मुंडेंनी काय केलंय कळकळीचं आवाहन? -

पंकजा मुंडे म्हणाल्या आहेत की, ' स्वतः च्या जीवाला धक्का तोच लावेल ज्याला माझ्यावर प्रेम किंवा श्रद्धा नाही ...मी लढत आहे संयम ठेवत आहे. तुम्हीही सकारात्मकता दाखवा आणि संयमाने रहा..कोणी माझ्यासाठी जीव देणे कळतेय का किती कठीण आहे माझ्यासाठी? मला प्रचंड अपराधी आणि दुःखी वाटत आहे. मी स्वीकारला आणि पचवला आहे पराभव तुम्ही ही पचवा!! अंधारी रात्री नंतर सुंदर प्रकाश असतो तुम्ही माझ्या जीवनातील प्रकाश आहात.. शांत व सकारात्मक रहा please please..'

Pankaja Munde defeat and Youth commits suicide
Pankaja Munde : पंकजा मुंडे यांच्या पराभवाची 'ही' कारणं

तसेच, 'माझ्या साठी मरण्यापेक्षा आपल्या उद्देशासाठी जगा... आई बापाला दुःख देऊ नका.. त्यांच्या जीवाला घोर लावू नका.. तुम्हाला शप्पथ आहे..मुंडे साहेबांची... 15 जून पासून मी आभार दौरा करत आहे ...तो पर्यंत सर्व जण प्रतिक्षा करा...' असं कळकळीचं आवाहन पंकजा मुंडे यांनी त्यांच्या समर्थकांना केलं आहे.

(Edited by - Mayur Ratnaparkhe)

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com