Pankaja Munde News : भर पावसात पंकजा मुंडेंचे भाषण; 'मोदींनी दिलेली संधी वाया घालवू नका'

Political News : भर पावसातही पंकजा मुंडे यांनी भाषण केले. दरम्यान, सायंकाळच्या वेळी असलेल्या सभेवेळी पाऊस आल्याने वीजपुरवठा खंडfत झाला. त्यामुळे उपस्थितांनी मोबाईल टॉर्चने प्रकाश पाडला.
Pankaja Munde
Pankaja Munde Sarkarnama
Published on
Updated on

Beed News : लोकसभा निवडणुकीचा प्रचार रंगात आला आहे. भाजपच्या लोकसभेच्या उमेदवार पंकजा मुंडे यांच्यासह भाजप व राष्ट्रवादी काँग्रेस तसेच महायुतीचे नेते आपापल्या भागात प्रचारात व्यस्त आहेत. खुद्द उमेदवार पंकजा मुंडे देखील प्रचारात व्यस्त आहेत. परिसरातील नाळवंडी येथील सभेदरम्यान पावसाला सुरुवात झाली. पावसातही पंकजा मुंडे यांनी भाषण केले. दरम्यान, सायंकाळच्या वेळी असलेल्या सभेवेळी पाऊस आल्याने वीजपुरवठा खंडfत झाला. त्यामुळे उपस्थितांनी मोबाईल टॉर्चने प्रकाश पाडला.

पंकजा मुंडे (Pankaja Munde), खासदार डॉ. प्रीतम मुंडेदेखील (Pritam Munde) विधानसभा मतदारसंघनिहाय दौरे करत आहेत. त्यांनी बीड तालुक्यातील नाळवंडी येथे सभा घेतली. सभेदरम्यानच पावसाला सुरुवात झाली. पावसात पंकजा मुंडे यांनी भाषण सुरू ठेवले.

Pankaja Munde
Narendra Modi In Pune : या लवकर, बस आली! मोदींच्या सभेसाठी पुण्यातील भाजप पदाधिकाऱ्याचा मेसेज व्हायरल

मला पंतप्रधान मोदींनी ही संधी दिलीय. पुन्हा मोदीच पंतप्रधान होणार आहेत, त्यामुळे ही संधी वाया घालू नका, असे आवाहनही त्यांनी केले. मी कधी जातीयवाद केला का, मी कधी तुमची कामे अडवली का, सत्तेत असताना कधी तुम्हाला त्रास दिला का, मी उमेदवार म्हणून तुम्हाला मान्य आहे का, असा सवाल करत आपण जिल्ह्यातील जनता विकासाच्याच बाजूने मत देईल, असा विश्वास पंकजा मुंडेंनी व्यक्त केला.

आपण कष्टकरी, शेतकऱ्यांचा आवाज बनून संसदेत काम करू, असे आश्वासनही पंकजा मुंडे यांनी दिले. बीड लोकसभा निवडणूक रंगतदार स्थितीत आली आहे. पंकजा मुंडे यांनी गेल्याच आठवड्यात शक्तिप्रदर्शन करत उमेदवारी अर्ज दाखल केला. त्यांच्या प्रचारासाठी भाजपसह राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार व महायुतीतील इतर नेते कामाला लागले आहेत.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

पंकजा मुंडे म्हणाल्या, बीडची निवडणूक वेगळ्याच दिशेने जात आहे. माझ्या काळात पीकविम्याचे कोट्यवधी रुपये आले. अनुदान मिळाले. सोयाबीन, कापसाचा प्रश्न पंतप्रधान नरेंद्र मोदींसमोर मांडू, असेही पंकजा मुंडे म्हणाल्या.

विरोधकांकडे अफवा पसरविणे आणि बुद्धीभेद करणे याशिवाय दुसरा कोणताही मुद्दा नाही. सत्तेत असताना जिल्ह्यात विकासाची असंख्य कामे केली. आम्ही केवळ बोलत नाहीत तर करून दाखवतो, असेही पंकजा मुंडे म्हणाल्या.

(Edited By : Sachin Waghmare)

R

Pankaja Munde
Pankaja Munde News : '...ती सल दूर करण्यासाठी ही शेवटची संधी मला द्या'

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com