Pankaja Munde News : '...ती सल दूर करण्यासाठी ही शेवटची संधी मला द्या'

Beed Lok Sabha Constituency : महायुतीच्या उमेदवार पंकजा मुंडेंचे बीडच्या मतदारांना भावनिक आवाहन!
Pankaja Munde
Pankaja MundeSarkarnama

Beed Loksabha Election : 'मला पैसे कामवायचे नाहीत, नावाची, प्रसिद्धीची लालसा नाही. एक काटा माझ्या मनात रुतलेला आहे. गोपीनाथ मुंडेंचे स्वप्न माझ्या डोळ्यात आहेत. ते पूर्ण करण्याची अशी संधी पुन्हा येणार नाही. दहा वर्षांपूर्वी मला गोपीनाथ मुंडेंना हार घालायचा होता, अंत्यसंस्कार करावा लागला. ती सल दूर करण्यासाठी ही शेवटची संधी मला द्या.', असे भावनिक आवाहन भाजपच्या राष्ट्रीय सचिव तथा बीड लोकसभा मतदारसंघातील भाजपाच्या उमेदवार पंकजा मुंडेंनी केले .

बीड लोकसभा निवडणुकीसाठी भाजपा महायुतीच्या उमेदवार म्हणून उमेदवारी बुधवारी पंकजा मुंडे यांनी चार उमेदवारी अर्ज दाखल केले. यानंतर शहरातून फेरी काढण्यात आली. सायंकाळी झालेल्या सभेत पंकजा मुंडे(Pankaja Munde) यांनी असे आवाहन केले.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

Pankaja Munde
Rahul Gandhi News : काँग्रेस नेते राहुल गांधी अचानक लातूर मुक्कामी!

यावेळी बीडचे पालकमंत्री धनंजय मुंडे(Dhananjay Munde), उमेदवार पंकजा मुंडे, खासदार डॉ. प्रीतम मुंडे यांच्यासह आमदार सुरेश धस, आम नमिता मुंदडा, आमदार लक्ष्मण पवार, आमदार प्रकाश सोळंके, आमदार बाळासाहेब आजबे, अमरसिंह पंडित, रमेश आडसकरआदींची उपस्थिती होती.

पंकजा मुंडे म्हणाल्या , 'या जिल्ह्याला कारस्थानाची सवय आहे. कोणी कारस्थाने करू नका. आपल्या विकासावर कोणतेही काळेढग येऊ देऊ नका . मी पराभव पचवलाय . हा पराभव माझा नव्हता तर जनतेचा होता. त्यामुळे माझी प्रत्येकावर बारीक नजर आहे. आता मी पदर पसरून म्हणतेय, एक काटा माझ्या मनात रुतलेला आहे. दहा वर्षांपूर्वी चार तारखेला मला गोपीनाथ मुंडेंना(Gopinath Munde) हार घालायचा होता, अंत्यसंस्कार करावा लागला. ती सल दूर करण्यासाठी ही शेवटची संधी मला द्या गोपीनाथ मुंडेंचे स्वप्न माझ्या डोळ्यात आहेत. ते पूर्ण करण्याची अशी संधी पुन्हा येणार नाही. मला माझ्यासाठी नाही, तर जनतेसाठी पद हवे आहे.'

Pankaja Munde
Jalna Lok Sabha Constituency : उन्हापासून बचावासाठी खबरदारी, पण दानवेंच्या लूकची चर्चा भारी..

भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी संविधान दिले. त्यांनी संविधानातून हक्क दिले. संविधान बदलण्याचा अधिकार जगात कोणालाच नाही. जर कोणी संविधानाला नख लावायचा प्रयत्न केला तर आपण तुमच्या आधी रस्त्यावर उतरू, असा इशाराही पंकजा मुंडे (Pankaja Munde) यांनी या आधीच्या भाषणातून दिलेला आहे.

(Edited by - Mayur Ratnaparkhe)

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com