Pune, 29 April : लोकसभा निवडणुकीच्या ( Lok Sabha Election 2024 ) रिंगणातील भाजप आणि मित्रपक्षांच्या उमेदवारांच्या प्रचारासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा झंझावात सुरू आहे. त्यातूनच मोदींनी सोमवारी दुपारी सोलापुरात जंगी सभा घेतली. त्यानंतर मोदींचा ताफा कराड आणि त्यापाठोपाठ सायंकाळी पुण्यातील रेसकार्सवर येणार आहे.
रेसकोर्सवरच्या सभेत पुण्यातील भाजपचे उमेदवार मुरलीधर मोहोळ ( Murlidhar Mohol ), बारामतीच्या सुनेत्रा पवार ( Sunetra Pawar ), शिरूरचे शिवाजीराव आढळराव-पाटील ( Shivajirao Adhalrao Patil ), मावळातील शिवसेनेचे उमेदवार श्रीरंग बारणेंसाठी ( Shrirang Barne ) मोदी मते मागणार आहेत. मोदींच्या ( Narendra Modi ) सभेला रेकॉर्डब्रेक गर्दी जमविण्यासाठी पुण्यासह जिल्ह्यातील भाजप, मित्रपक्षांची यंत्रणा गेली काही दिवस पायाला भिंगरी लावून काम करीत आहे. या सभेच्या गर्दीसाठी पुण्यातील भाजपच्या पदाधिकाऱ्यांना 'टार्गेट'ही दिले जात असल्याचे सांगण्यात येत आहे. पक्षाचे आमदार, माजी आमदार, महापालिकेतील माजी पदाधिकारी, माजी नगरसेवकांना कामाला लावले आहे.
(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)
लोकांच्या सोयीसाठी भाजपने प्रवासासाठी बसगाड्यांसह इतर सोयी केल्या आहेत. वेळेत सभेच्या ठिकाणी पोचण्यासाठी लोकांना वेळेत लोकांना गोळा केले जात आहे. त्यासाठी पुण्यातील भाजपच्या नेत्या, पदाधिकाऱ्यांची धावपळ सुरू झाली आहे. उन्हाचा पारा वाढत असतानाच सभांसाठी गर्दी जमविताना सर्वच पक्षाच्या नेत्यांच्या नाकीनऊ येत आहे. त्यातून भाजपच्या एका माजी नगरसेविकाच्या पतीचा 'व्हॉटसअॅप'वरील मेसेज चर्चेत आला आहे. 'मोदींच्या सभेच्या निमंत्रणाची इमेज व्हायरल करून संबंधित माजी नगरसेविकेच्या पतीने 'या लवकर, बस आली आहे,' असा मेसेज लिहिला आहे. या मेसेजची चर्चा सगळीकडे होत आहे.
लोकसभा निवडणुकीच्या तिसऱ्या आणि चौथ्या टप्प्यात बारामती, माढा आणि सातारा या अत्यंत प्रतिष्ठेच्या मतदारसंघांत मतदान होणार आहे. महायुतीच्या उमेदवारांसाठी पंतप्रधान मोदी सोमवारी आणि मंगळवारी प्रचार सभा घेणार आहेत. दोन दिवसांत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या एकून 6 सभा होणार आहेत. यात पुणे, कराड आणि सोलापुरातील सभेचा समावेश आहे, तर मंगळवारी, 30 एप्रिलला माढा मतदारसंघातील माळशिरस, धाराशिव आणि लातूर येथे सभा होणार आहेत. राज्यात सलग इतक्या सभा घेण्याची ही मोदींची पहिलीच वेळ आहे.
"'इंडिया' आघाडीत महायुद्ध सुरू"
सोलापुरातील सभेत मोदींनी 'इंडिया' आघाडीवर हल्लाबोल केला आहे. "माझे काम तुम्ही गेल्या दहा वर्षात पाहिले आहे. एकीकडे माझे काम आहे, तर दुसरीकडे इंडिया आघाडीमध्ये नेतृत्वासाठी भांडणं चालू आहेत. सध्या 'इंडिया' आघाडीत महायुद्ध सुरू आहे. आता पाच वर्षात पाच 'पीएम' म्हणजे दरवर्षी एक पंतप्रधान करणार असल्याचं 'इंडिया' आघाडीतील नेते सांगतात. म्हणजे एक पंतप्रधान एका वर्षात जेवढी लूट करू शकतो, तेवढी लूट करेल. अशा लोकांच्या हातात तुम्ही देश देणार आहात का?" असा सवाल नरेंद्र मोदींनी उपस्थित केला आहे.
R
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.