
Beed, 28 December : गोपीनाथ मुंडे यांच्यासोबत आम्ही दहा वर्षे काम केलंय, तो अनुभव वेगळा आहे. तुमच्यासोबत (पंकजा मुंडे) काम करण्याचा अनुभव वेगळा आहे. पंकूताई तुम्हाला चांगली, ज्ञानी लोकं जमत नाहीत. तुम्हाला फक्त जी हुजूर, जी हुजूर (मुजरा करण्याची स्टाईल करत) करणारी लोकं पाहिजेत. पण, आमची औलाद जी हुजूर करणारी नाही. आमची औलाद स्वाभिमानी आहे. तुमच्यापुढं जी हुजूर करणार नाही. आजपर्यंत केलेला नाही आणि भविष्यातही कधी करणार नाही, भले राजकारणातून बाजूला जाऊ, अशा शब्दांत भाजपचे आमदार सुरेश धस यांनी मंत्री पंकजा मुंडे यांच्या नेतृत्वाला आव्हान दिले.
संतोष देशमुख खूनप्रकरणी काढण्यात आलेल्या शांतता मोर्चात बोलताना आमदार धस यांनी पंकजा मुंडेंवरही (Pankaja Munde) टीकास्त्र सोडले. ते म्हणाले, संतोष देशमुखांचा ज्या अमानुषपणे खून करण्यात आला. माझा आमच्या पंकूताईंना सवाल आहे. संभाजीनगरला तुम्ही विमानतळावर उतरलात. बारा डिसेंबरला गोपीनाथ मुंडे यांच्या जयंतीचा दिवस, त्यामुळे मी मान्य करतो की, तुम्हाला तिकडं जायचं होतं. पण, वाकडी वाट करून तुम्ही संतोष देशमुखांच्या घरी का गेला नाहीत हो? हा माझा सवाल आहे. का फक्त कोरडं बोलता?
धनुभाऊ तुम्ही जे बोललात ना. गोपीनाथगडाबद्दल... अरे गोपीनाथ मुंडे कोण? अरे गोपीनाथ मुंडेंनी त्यांच्या कालावधीत मटक्याचा खटका बसवला. मुंबईतील गॅंगवारही त्यांनीच बंद केले. त्यांच्यासोबतसुद्धा आम्ही दहा दहा वर्षे काम केलं. तो अनुभव वेगळा आहे. तुमच्यापुढे काम करण्याचा अनुभव वेगळा आहे. तुम्हाला चांगले, मोठे, ज्ञानी, जे चांगले आहेत, ते पंकूताई तुम्हाला जमत नाहीत. पंकूताई तुम्ही संतोष देशमुख यांच्या कुटुंबीयांच्या सांत्वनासाठी यायला पाहिजे होते, पण तुम्ही आला नाहीत. त्याचे काय असेल ते उत्तर द्या. देऊ वाटलं तर द्या नाहीतर अपेक्षाही नाही. पण किमान तुमच्याकडून येण्याची अपेक्षा होती, अशी भावनाही सुरेश धस (Suresh Dhas) यांनी बोलून दाखवली.
धस म्हणाले, तीनशे टीपर वाळूचे आणि पाचशे टीपर राखेचे चालतात. अधिकाऱ्यांना पिस्तूल दाखवून राखेची चोरी केली जाते. एक रुपयाही थर्मल पॉवरला न भरता २००२ पासून पाचशे टीपर अव्याहतपणे राख फुकट नेत आहेत. त्याचं उत्तर काय? पंकूताई तुम्ही २०१४ ते २०१९ दरम्यान बीडचे पालकमंत्री होता ना?. तुम्ही का बंद केले नाहीत ते टिपर? त्याचं कारण आहे, धनुभाऊचं घर वर आहे, पंकूताईंचं घर खाली आहे. सकाळी ते चहाला खाली असतात आणि दुपारच्या नाश्त्याला त्या वर असतात.
पंकूताई, धनुभाऊंनी तुमचं सगळंच काढून घेतलेले तुम्हाला मेळच लागू दिला नाही. सगळा झंटा फंटा ॲटम उधर है. झंटा-फंटा ॲटम कोण सांभाळत होतं...तर तो आका. बीडचं पालकमंत्रिपद, डीपीडीसी नाही, तर राज्याचं कृषिखांतही धनंजय मुंडेंनी भाड्यानं दिलं होतं. चुकीच्या माणसाच्या हातात दिलं होतं, असा आरोपही त्यांनी केला.
‘जो गोलीपर हमारा नाम होगा, उसको कोईभी रोक नही सकता’
बीड जिल्ह्यात ज्या जिल्हाधिकाऱ्यांनी पिस्तुलाचे लायसन्स दिले, ज्या पोलिस अधीक्षकांनी त्याला संमती दिली आणि ज्या उपविभागीय पोलिस अधिकाऱ्यांनी त्याला मान्यता दिली, त्या सर्वांवर कारवाई झाली पाहिजे. आम्ही पाचव्या टर्मचे आमदार झालो; पण आम्हाला सुरक्षा द्या, असं म्हणायाची वेळ अजून आमच्यावर आलेली नाही. ज्या दिवशी कोणी गोळी झाडणार आहे, ‘जो गोलीपर हमारा नाम होगा, उसको कोईभी नही रोक सकता,’ त्यामुळे घाबरायचं नाही, असेही सुरेश धस यांनी स्पष्ट केले.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.