Paranda News : काॅन्फीडंस हवा तर असा, आरक्षण जाहीर होताच नगराध्यक्षपदावर दावा अन् फटाक्यांची आतषबाजी!

Paranda City Council Reservation : माजी नगराध्यक्ष सौदागर यांनी काही महिन्यापूर्वी माजी आमदार मोटे यांची साथ सोडून शिवसेनेचे आमदार प्रा. तानाजी सावंत यांच्या नेतृत्वाखाली शिवसेनेत प्रवेश केला आहे.
Paranda City Council Election 2025 News
Paranda City Council Election 2025 NewsSarkarnama
Published on
Updated on
Summary
  1. परांडा नगराध्यक्ष पदाचे आरक्षण जाहीर होताच आमदार सावंत यांच्या समर्थकांनी फटाक्यांची आतषबाजी करत जल्लोष साजरा केला.

  2. या आरक्षणामुळे परांड्यातील राजकीय समीकरणे बदलण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

  3. स्थानिक स्तरावर इतर गटांकडूनही उमेदवारीसाठी हालचाली सुरू झाल्या असून आगामी निवडणुकीची रंगत वाढली आहे.

Local Body Election 2025 : राजकारणात आत्मविश्वास असावा पण ओव्हर काॅन्फीडंस नसावा, असं नेहमीच म्हटलं जातं. पण काही पदाधिकारी असे असतात ज्यांना आपल्या नेत्यावर आणि दावेदारीवर भलताच विश्वास असतो. असाच विश्वास आणि परांडा नगरपरिषदेचे माजी नगराध्यक्ष जाकीर सौदागर यांनी आपल्या कृतीतून दाखवला आहे. नगराध्यक्षपदाचे आरक्षण जाहीर झाल्यानंतर जाकीर सौदागर यांनी स्वतःच उमेदवारी दावा सांगत जणू ते नगराध्यक्ष झालेच अशा पद्धतीने जल्लोष केला. फटाक्यांची आतषबाजी आणि गुलालाची विजयाआधीच उधळण केल्याने याची जिल्हाभरात चर्चा होत आहे.

परंडा नगर परिषदेच्या अध्यक्षपदाचे आरक्षण नुकतेच जाहीर झाले. हे पद इतर मागासवर्गीय प्रवर्गासाठी राखीव झाले आहे. आरक्षणाची सोडत जाहीर होताच शिवसेनेत (Shivsena) दाखल झालेले माजी नगराध्यक्ष जाकीर सौदागर यांनी स्वतःची उमेदवारी जाहिर करत थेट नगराध्यक्ष पदावर दावा सांगितला. सौदागर उत्साही तर त्यांचे समर्थक अतिउत्साही. त्यांनी शहरात ठिकठिकाणी फटाके वाजवून, गुलाल उधळत जल्लोष साजरा केला. या प्रकाराने परांडा येथे चर्चेला उधाण आले आहे.

नगर परिषद (City Council) निवडणुकीची अधिकृत घोषणा अद्याप झालेली नाही, महायुती-आघाड्या संदर्भात कुठलाही निर्णय झालेला नसताना सौदागर यांचाहा जल्लोष म्हणजे 'उतावीळ नवरा अन् गुडघ्याला बाशिंग' असाच म्हणावा लागेल. मागील निवडणूकीच्या वेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी आमदार राहूल मोटे यांच्या नेतृत्वाखाली सौदागर यांनी बलाढय विरोधकाचा पराभव केला होता.

Paranda City Council Election 2025 News
Dharashiv ZP News : धाराशीवमध्ये माजी अध्यक्ष, सभापतींचे गटच झाले आरक्षित; अर्चना, शरण पाटलांना पुन्हा संधी!

माजी नगराध्यक्ष सौदागर यांनी काही महिन्यापूर्वी माजी आमदार मोटे यांची साथ सोडून शिवसेनेचे आमदार प्रा. तानाजी सावंत यांच्या नेतृत्वाखाली शिवसेनेत प्रवेश केला आहे. शिवसेनेकडून सौदागर यांनी आपली उमेदवारी जाहीर केली आहे. मात्र असे असले तरी शहरातील राजकीय परिस्थिती पाहता परंडा नगर परिषदेची निवडणूक महायुती एकत्र लढणार का? यावरच पुढील राजकीय समिकरणे ठरणार आहेत.

दुसरीकडे महाविकास आघाडीची धुरा शिवसेनेचे (उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष) जिल्हाप्रमुख रणजित पाटील हे सांभाळणार आहेत. आमदार डॉ. सावंत व माजी नगराध्यक्ष सौदागर यांच्या विरोधात शहर विकास आघाडीचा प्रयोग होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. तसे झाल्यास माजी नगराध्यक्ष सौदागर देखील स्वबळावर लढण्याची तयारी करू शकतात असे चित्र आहे.

मागील विधानसभा निवडणूकीच्या वेळी शिवसेनेचे जिल्हाप्रमुख पाटील यांनी पक्षाने दिलेली उमेदवारी मागे घेत मोटे यांचा प्रचार केला होता. त्यामळे माजी आमदार मोटे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या राष्ट्रवाद्री काँग्रेसमध्ये असले तरी शहराच्या निवडणूकीत त्यांची भूमिका सौदागर यांच्या विरोधात असेल असे बोलले जाते. तर माजी नगराध्यक्ष सौदागर यांनी सावंत यांच्या शहरातील मताधिक्यासाठी प्रतिष्ठा पणाला लावली होती. त्यामुळे सावंत हे आपले वजन सौदागर यांच्याच पारड्यात टाकतील हे स्पष्ट आहे.

महायुतीतील जागा वाटप करताना आपल्या भुमिकेशी फारशी तडजोड न करणारे आमदार प्रा. सावंत व भाजपाचे जेष्ठ नेते माजी आमदार सुजितसिंह ठाकूर यांच्यातील नगराध्यक्षपदासह नगरसेवकांच्या उमेदवारीसाठीच्या जागा वाटपाच्या वाटाघाटी महत्वाच्या असणार आहेत. सध्यातरी माजी नगराध्यक्ष सौदागर यांनी उमेदवारीचा दावा करीत रणशिंग फुंकले आहे.

FAQs

1. परांडा नगराध्यक्ष पदाचे आरक्षण कोणत्या वर्गासाठी जाहीर झाले आहे?
इतर मागासवर्गीयांसाठी नगराध्यक्षपद घोषित झाले आहे. आरक्षणामुळे राजकीय समीकरणांवर प्रभाव पडला आहे.

2. फटाक्यांची आतषबाजी कोणी केली?
आमदार सावंत यांच्या समर्थकांनी आरक्षण जाहीर होताच परांड्यात जल्लोष साजरा केला.

3. आरक्षण जाहीर झाल्याने परांडा राजकारणावर काय परिणाम होईल?
यामुळे नगराध्यक्षपदाची शर्यत सावंत गटाच्या बाजूने झुकल्याचे संकेत आहेत.

4. परांडा नगराध्यक्षपदासाठी कोणकोण दावेदार आहेत?
सावंत गटासह विरोधी गटातील काही प्रमुख नेते उमेदवारीसाठी तयारी करत आहेत.

5. परांडा नगरपरिषद निवडणुका कधी होणार आहेत?
राज्य निवडणूक आयोगाकडून लवकरच अधिकृत कार्यक्रम जाहीर होण्याची शक्यता आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com