Prakash Ambedkar : संविधानाची विटंबना, प्रकाश आंबेडकर आक्रमक; म्हणाले ' परिणामास तयार...'

Prakash Ambedkar Reaction to Constitution Desecration : दलित अस्मितेच्या प्रतिकाची अशी तोडफोड होण्याची ही पहिलीच घटना नाही. राज्यघटनेची तोडफोड ही अत्यंत लाजिरवाणी गोष्ट आहे, असे प्रकाश आंबेडकर म्हणाले.
Prakash Ambedkar
Prakash Ambedkar sarkarnama
Published on
Updated on

Parbhani News : परभणीमध्ये डाॅ.बाबासाहेब आंबेडकर शिल्पामध्ये त्यांच्या हातात असलेल्या संविधानाची तोडफोड समाजकंटकांकडून करण्यात आली आहे. त्यामुळे परभणी बंदची हाक देण्यात आली होती. या बंदला हिंसक वळण लागले आहे. जमावाकडून तोडफोड करत दगडफेक करण्यात आली.

संविधानच्या तोडफोडीनंतर वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी ट्विटरवरून आपली प्रतिक्रिया दिली आहे. त्यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटले आहे की, 'परभणीत जातीयवादी मराठा समाजकंटकांनी बाबासाहेबांच्या पुतळ्याची केलेली भारतीय राज्यघटनेची तोडफोड ही अत्यंत लाजिरवाणी गोष्ट आहे.'

Prakash Ambedkar
Parbhani Riot News : माथेफिरूकडून संविधान प्रतिकृतीची विटंबना, परभणीत दंगल उसळली!

'बाबासाहेबांच्या पुतळ्याची किंवा दलित अस्मितेच्या प्रतिकाची अशी तोडफोड होण्याची ही पहिलीच घटना नाही. वंचित बहुजन आघाडीचे परभणी जिल्हा कार्यकर्ता प्रथम घटनास्थळी गेले आणि त्यांच्या निषेधामुळे पोलिसांनी गुन्हा दाखल केला आणि एकाला अटक केली.', असे देखील आंबेडकर यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटले आहे.

24 तासांचे अल्टिमेटम

प्रकाश आंबेडकर यांनी प्रशासनाला 24 तासांचे अल्टिमेटम दिले आहे. 24 तासामध्ये सर्व आरोपींना अटक करा अन्यथा परिणामास तयार राहा, असे इशारा प्रकाश आंबेडकारांनी दिला आहे. तसेच कायदा सुव्यवस्था राखण्याचे आवाहन सर्वांना केले आहे.

जाब कोणाला विचारणार

परभणीच्या घटनेवर लोकप्रतिनिधींनी आपल्या प्रतिक्रिया दिल्या आहेत. खासदार संजय जाधव यांनी कायदा सुव्यवस्था राखण्याचे आवाहन केले आहे. तर, सुषमा अंधारे यांनी राज्याला गृहमंत्री नसल्याचे जाब कोणाला विचारायचा, असे प्रश्न केला आहे.

Prakash Ambedkar
Rahul Gandhi Video : राहुल गांधींची संसदेत ‘गांधीगिरी’; राजनाथ सिंह यांना दिले गुलाब अन्...

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com