BJP Politics : निवडणूक पार पडताच भाजपमध्ये अंतर्गत धुसफूस, जिल्हाध्यक्षांचा 'लेटरबॉम्ब'; मेघना बोर्डीकरांना घ्यावा लागणार मोठा निर्णय

Parbhani BJP infighting : पालकमंत्री मेघना बोर्डीकर यांच्यासह इतर नेत्यांकडेही सुरेश भु्मरे यांनी वादाबाबत पत्र पाठवले आहे.
Suresh Bhumre, Meghna Bordikar
Suresh Bhumre, Meghna BordikarSarkarnama
Published on
Updated on

Marathwada Politics : नगरपालिका, नगरपंचायत निवडणुकीच्या काळात परभणीसह पाथरी तालुक्यात भाजपमधील अंतर्गत गटबाजी उफाळून आली होती. पाथरीमध्ये नगराध्यक्ष तसेच नगरसेवक पदाच्या उमेदवारी अर्ज भरण्यासाठी तयारी असलेल्या अनेकांना शेवटपर्यंत एबी फॉर्मसाठी ताटकळत ठेवण्यात आले होते. एबी फॉर्म मिळत नाही म्हटल्यावर ऐनवेळी नगराध्यक्ष पदाच्या इच्छूक उमेदवाराने अपक्ष अर्ज दाखल केला होता. तर काही नगरसेवकांनी पक्षातील पदाधिकाऱ्यांवर संताप व्यक्त करत अर्जच फाडून टाकले होते.

पाथरीमधील या वादाचे पडसाद अजूनही उमटत आहेत. एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप करणाऱ्या भाजपचे जिल्हाध्यक्ष सुरेश भुमरे आणि उद्योग आघाडीचे प्रदेश उपाध्यक्ष प्रमोद वाकोडकर यांच्यात अजूनही शीतयुद्ध सुरू आहे. वाकोडकर यांनी आपली उद्योग आघाडी सांभाळावी, त्यांनी पक्ष संघटनेते लुडबूड करू नये. पक्षाने निरीक्षक म्हणून जबाबदारी नसताना वाकोडकर निरीक्षक म्हणून सगळीकडे फिरत असल्याचा आरोप करत भुमरे यांनी त्यांच्या हाकलपट्टीची मागणी पालकमंत्री मेघना बोर्डीकर यांच्याकडे पत्राद्वारे केली आहे.

भुमरेंच्या या मागणीमुळे संतापलेल्या वाकोडकर यांनी सुरेश भुमरे यांचे जेवढे वय आहे, तेवढा माझा पक्षातला अनुभव असल्याचे सांगत त्यांना डिवचले आहे. पाथरी नगरपालिकेत भाजपचे उमेदवार नव्हते, ते उभे करावेत अशी भूमिका स्थानिक पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केली होती. एबी फॉर्म न दिल्यावरूनही मध्यंतरीच्या काळात बरीच टीका आणि आरोप करण्यात आले होते. यावर पक्षाने निरीक्षक नेमून चौकशी सुरू केली होती. वाकोडकर यांनी पक्षाने आपल्यालाच निरीक्षक म्हणून पाठवल्याचा दावा केला.

Suresh Bhumre, Meghna Bordikar
Ladki Bahin scheme update : ‘लाडक्या बहिणीं’साठी आनंदाची बातमी; E-KYC करताना झालेल्या चुकांबाबत फडणवीस सरकारचा मोठा निर्णय

जिल्हाध्यक्ष भुमरे यांनी निरीक्षक म्हणून त्यांना कोणीही पाथरीत जाण्यास सांगितले नव्हते, ते स्वतःच आले असा आरोप केला. तर वाकोडकर यांनी मात्र आपण संघटन मंत्र्यांच्या सांगण्यावरून निरीक्षक म्हणून आल्याचा दावा केला. आता यावरूनच भुमरे-वाकोडकर यांच्यात पुन्हा खडाजंगी सुरू झाली आहे. प्रमोद वाकोडकर यांच्यासह सुभाष आंबट, मायकल दहे, पी.डी.पाटील या चौघांविरोधात कारवाईची मागणी जिल्हाध्यक्ष भुमरे यांनी केली आहे.

वाकोडकरांचे उद्योग, काँग्रेसशी हातमिळवणी?

पालकमंत्री बोर्डीकर यांच्यासह इतर नेत्यांकडेही भु्मरे यांनी या संदर्भात पत्र पाठवले आहे. पक्षाचे निरीक्षक म्हणून मिरवणारे वाकोडकर हे जिल्ह्यातील सात पैकी एकाही नगरपालिका निवडणुकीच्या प्रचारासाठी गेले नव्हते, असा आरोपही भुमरे यांनी केला आहे. कुठलेच योगदान न देणारेच आमच्यावर कारवाई करा, अशी मागणी करत असल्याचा टोलाही भुमरे यांनी वाकोडकर यांना लगावला.

Suresh Bhumre, Meghna Bordikar
Bajrang Sonawane : बजरंग सोनवणेंनी थेट लोकसभा अध्यक्षांना केलं टार्गेट; बोलतीच केली बंद...

निवडणुक काळात पक्षनिरीक्षक म्हणून पाथरीत जाणाऱ्या वाकोडकर यांनी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष बाबाजानी दुर्राणी यांच्या सांगण्यावरूनच त्यांनी पक्षविरोधात पत्रकार परिषद घेतली. त्यामुळे भाजप आणि जिल्हाध्यक्षाबद्दल नागरिकांमध्ये संभ्रम निर्माण झाल्याचा आरोप भुमरे यांनी केला. त्यामुळे या सगळ्यांची पक्षातून हाकालपट्टी करा, अशी मागणी भुमरे यांनी केली आहे. आता पक्षातील ही अंतर्गत गटबाजी पालकमंत्री मेघना बोर्डीकर रोखण्यात यशस्वी होतात का? हे पहावे लागेल.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com