

Women empowerment schemes : मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेतील पात्र लाभार्थी महिलांना ई-केवायसी करणे बंधनकारक करण्यात आले आहे. ई-केवायसी न केलेल्या महिलांना या योजनेचा लाभ मिळणार नाही, असेही सरकारने स्पष्ट केले आहे. मात्र, ही प्रक्रिया पूर्ण करताना पर्याय निवडण्यात अनेक महिलांच्या चुका झाल्या आहेत. त्यामुळे आता योजनेचा लाभ मिळणार की नाही, या चिंतेत लाडक्या बहिणी आहेत.
राज्य सरकारने याबाबत आज शासन निर्णय जारी करत अशा लाडक्या बहिणींना मोठा दिलासा दिला आहे. महिला व बाल विकास विभागाच्या गुरूवारी जारी करण्यात आलेल्या जीआर म्हणजे म्हटले आहे की, मुख्यमंत्री-माझी लाडकी बहीण या योजनेंतर्गत काही पात्र लाभार्थी महिलांचे वडील हयात नाहीत किंवा पती देखील हयात नाहीत किंवा घटस्फोट झालेला आहे.
संबंधित लाभार्थी महिलांनी स्वतःचे e-KYC करावे व त्यानंतर त्यांनी त्यांचे पती अथवा वडील यांचे अधिकृत मृत्यू प्रमाणपत्र व घटस्फोट प्रमाणपत्र किंवा न्यायालयाचे आदेश याची सत्यप्रत्त संबंधित अंगणवाडी सेविका यांच्याकडे ता. ३१ डिसेंबरपर्यंत जमा करण्यात यावी. ही प्रक्रिया ऑफलाईन पध्दतीने करावयाची असल्याचे सरकारने स्पष्ट केले आहे.
तसेच, त्यांनी या योजनेच्या https://ladakibahin.maharashtra.gov.in या Web Portal वरील ई-KYC प्रक्रिया ऑनलाईन पध्दतीने अंतिम करणे आवश्यक असल्याने त्या Web Portal वर आवश्यक त्या सुधारणा करण्यात आलेल्या आहेत. त्यानुषंगाने या पात्र लाभार्थी महिलांनी योजनेच्या Web Portal वर भेट देवून e-KYC प्रक्रिया ऑनलाईन पध्दतीने अंतिम (पुर्ण) करण्यात यावी, असे आवाहन सरकारने केले आहे.
योजनेतील ज्या पात्र लाभार्थी महिलांना e-KYC प्रक्रिया पूर्ण केली आहे मात्र त्यांच्याकडून पर्याय निवडताना काही चुका झाल्या असतील तर अशा लाभार्थ्यांना सरकारकडून संधी देण्यात आली आहे. या लाभार्थी लाडक्या बहिणींना योजनेच्या Web Portal वर e-KYC प्रक्रिया पूर्ण करण्याची एक अंतिम संधी ता. ३१ डिसेंबरपर्यंत उपलब्ध करुन देण्यात आली आहे. ही शेवटची संधी असणार आहे. त्यानंतर त्यामध्ये कोणताही बदल करण्याचा पर्याय उपलब्ध होणार नसल्याने, काळजीपूर्वक माहिती भरण्यात यावी, असे आवाहन सरकारकडून करण्यात आले आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.