Parbhani BJP : परभणीत लोकसभेला उमेदवार देतांना भाजपचे धक्कातंत्र ?

Lok Sabha Election 2024: भारतीय जनता पक्षात उमेदवार निवडताना अनेकदा धक्कातंत्राचा अवलंब केला जातो.
Parbhani BJP
Parbhani BJPSarkarnama
Published on
Updated on

Parbhani News: पार्टी विथ डीफरन्स असे बिरूद मिरवणाऱ्या भारतीय जनता पक्षात उमेदवार निवडताना अनेकदा धक्कातंत्राचा अवलंब केला जातो. राज्यपाल, लोकसभा सभापती, उपराष्ट्रपती, राष्ट्रपती या पदावर नेमणूक करताना चर्चेत नसलेले चेहरे पक्षाने पुढे केले आहेत. अशाच धक्कातंत्र पद्धतीला अनुसरून परभणी लोकसभा मतदारसंघाचा उमेदवार देण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

येणाऱ्या लोकसभा निवडणुकीसाठी सर्वच पक्षाकडून उमेदवाराची चाचपणी सुरु आहे. पक्षांतर्गत सल्लामसलत केली जात आहे. उमेदवाराचे इलेक्टिव्ह मेरिट तपासले जात आहे. काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना या पक्षात उमेदवार निवडताना राजकीय क्षेत्रातील अनुभव, संघटनेतील काम, जनसंपर्क या मुद्द्याचा विचार केल्याचे दिसून येते. त्या तुलनेत भारतीय जनता पक्षात मात्र अनेकदा राजकीय परीघाबाहेरील उमेदवार दिला जातो.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

Parbhani BJP
Tanaji Sawant Vs Omraje Nimbalkar: '..तर म्हणाल ती पैज हरायला तयार'; तानाजी सावंतांचं ओमराजे निंबाळकरांना आव्हान!

विशेषत: पक्षाची मातृसंस्था असलेल्या राष्ट्रीय स्वयंसेवक संघातील कार्यरत व्यक्तिमत्व जाणीवपूर्वक निवडले जाते. वर्षानुवर्षे तेच ते चेहरे असल्याने नकारात्मकता निर्माण झालेली असताना नवा चेहरा दिला तर त्यांच्याविषयी जनतेत उत्सुकता असते, असा तर्क सांगितला जातो.

परभणी लोकसभा मतदारसंघ शिवसेनेचा बालेकिल्ला म्हणून ओळखला जातो. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या सभेमुळे शिवसेनेची उमेदवारी म्हणजे खासदारकीची हमी, असे समीकरण जिल्ह्यात रुढ झाले आहे.

शिवसेनेत झालेल्या बंडाळीनंतर विद्यमान खासदार संजय जाधव यांनी उद्धव ठाकरे यांनाच साथ दिली. 2024 च्या लोकसभा निवडणुकीत महाविकास आघाडीचे तेच उमेदवार असतील हे निश्चित आहे. महायुतीच्या जागावाटपात परभणी लोकसभा मतदारसंघ राष्ट्रवादी काँग्रेसकडे असावा यासाठी स्वतः अजित पवार आग्रही आहेत. असे असताना भारतीय जनता पक्षानेही उमेदवार देण्याची पूर्ण तयारी केली आहे. पक्षाने लोकसभा समन्वयक, निवडणूक प्रमुख नेमले असून विधानसभा निहाय आढावा बैठकाही सुरु केल्या आहेत.

तसेच 22 जानेवारी रोजी अयोध्येत संपन्न होणाऱ्या प्रभू श्रीराम प्राणप्रतिष्ठा सोहळ्याच्या निमित्ताने प्रत्येक गावात विविध उपक्रमाचे आयोजन केले जात आहे. या आयोजनात राष्ट्रीय स्वयंसेवक संघ, विश्व हिंदू परिषद यासह भारतीय जनता पक्षाचे पदाधिकारी मोठ्याप्रमाणावर सहभागी होत आहेत. भारतीय जनता पक्षाच्या वतीनेही सोहळ्याच्या निमंत्रणाच्या अक्षता घरोघरी देण्यात येत आहेत.

परभणीमध्ये भाजपच्या या उपक्रमात राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे वरिष्ठ पदाधिकारी व शहरातील प्रसिद्ध वैद्यकीय व्यावसायिक डॉ. केदार खटिंग यांनी सक्रिय सहभाग नोंदवला आहे. यामुळे महायुतीच्या जागावाटपात परभणी लोकसभा मतदारसंघ भाजपला मिळाला तर डॉ. खटिंग हे महायुतीचे उमेदवार असण्याची राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा आहे. डॉ.केशव खटिंग हे शहरातील आघाडीचे वैद्यकीय व्यावसायिक असून त्यानी राष्ट्रीय स्वयंसेवक संघात विविध जबाबदाऱ्या पार पाडल्या आहेत.

पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांची लोकप्रियता, नवा चेहरा, उच्चशिक्षित, हिंदुत्ववादी विचारसरणी या त्यांच्या जमेच्या बाजू आहेत. त्यांना उमेदवारी मिळाली तर पक्षांतर्गत नेत्यांची नाराजी रोखण्याचे त्यांच्यासमोर मोठे आव्हान असेल, असेही बोलले जाते. यानिमित्ताने भाजपच्या धक्कातंत्राची राजकीय वर्तुळात धास्ती तर सर्वसामान्य जनतेत उत्सुकता निर्माण झाली आहे.

(Edited By- Ganesh Thombare)

Parbhani BJP
Parbhani Political : ठाकरे गटाच्या खासदाराला धूळ चारणे हेच महायुतीचे ध्येय..!

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com