Nanded BJP : अशोक चव्हाण हे चिखलीकरांचा गेम करणार...? की पाठीशी उभे राहणार...?

Loksabha Election 2024 : नांदेड जिल्ह्याच्या राजकारणात सध्या एकाच म्यानात दोन तलवारी असल्यासारखी परिस्थिती निर्माण झाली आहे. गेली अनेक वर्ष एकमेकांच्याविरोधात राजकारण करणारे माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण, विद्यमान खासदार प्रताप पाटील चिखलीकर आता सध्या एकाच म्यानात म्हणजे एकाच पक्षात आहेत.
Ashok Chavan-Pratap Chikhlikar
Ashok Chavan-Pratap ChikhlikarSarkarnama

Nanded News : नांदेड जिल्ह्याच्या राजकारणात सध्या एकाच म्यानात दोन तलवारी असल्यासारखी परिस्थिती निर्माण झाली आहे. गेली अनेक वर्ष एकमेकांच्याविरोधात राजकारण करणारे माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण, विद्यमान खासदार प्रताप पाटील चिखलीकर आता सध्या एकाच म्यानात म्हणजे एकाच पक्षात आहेत. अशोक चव्हाण यांच्या भाजप प्रवेशानंतर जिल्ह्याचा कारभारी बदलल्याची चर्चा सुरू झाली आहे.

भाजपच्या महत्वाच्या निर्णयात आता चिखलीकर यांच्याऐवजी अशोक चव्हाण (Ashok Chavan) यांचे मत विचारात घेतले जाऊ लागले आहे. त्यामुळे लोकसभा निवडणुकीत चव्हाण आपल्या पारंपारिक आणि आता पक्षांतर्गत स्पर्धक असलेल्या चिखलीकर यांचा गेम करणार की त्यांच्या पाठीशी उभे राहणार? याची चर्चा महाविकास आघाडी (Mahavikas Aghadi) आणि जिल्ह्याच्या चिखलीकर समर्थकांमध्येही होऊ लागली आहे. या दोन्ही नेत्यांनी एकमेकांवर खालच्या स्तरावर टीका करण्याची संधी एकदाही सोडली नाही. हे दोन्ही नेते सध्या एकाच पक्षात काम करत आहेत.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

Ashok Chavan-Pratap Chikhlikar
Solapur Politics : लोकसभेआधीच उडाला विधानसभेचा खटका; सोलापुरात कोठे-देशमुख समर्थकांत हाणामारी

नांदेडसह मराठवाड्यातील लोकसभेच्या काही जागांची जबाबदारी अशोक चव्हाण यांना पार पाडावी लागणार आहे. पक्षाने जर प्रताप पाटील चिखलीकरांना (Pratap Patil Chikhlikar ) पुन्हा उमेदवारी दिली तर त्यांच्या पाठीशी अशोक चव्हाण खंबीरपणे उभे राहतील का? अशी भीती त्यांचे समर्थक व्यक्त करताना दिसत आहेत. नांदेडच्या जागेसाठी भाजपमध्ये उत्सुकांची संख्या जास्त असल्याने उमेदवारी मिळण्यासाठी रस्सीखेच सुरू आहे.

या जागेसाठी विद्यमान खासदार चिखलीकर हे प्रबळ दावेदार आहेत. नांदेड भाजपमय करण्याचे काम अशोक चव्हाण हे करत असल्याने उमेदवारी देताना त्यांचा शब्द महत्वाचा समजला जाणार आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या छत्रपती संभाजीनगर दौऱ्यात व सभेत अशोक चव्हाण यांची त्यांच्याशी भेट व चर्चाही झाली आहे. याच दौऱ्यात अशोक चव्हाण यांचे मेहुणे माजी मंत्री भास्करराव पाटील खतगावकर यांच्या स्नूषा डाॅ. मीनल खतगावकर यांनीही अमित शाह यांची भेट घेतली होती.

तेव्हापासून नांदेड लोकसभेची उमेदवारी चिखलीकरांना की खतगावकरांना? याची चर्चा सुरू झाली आहे. नांदेडची जागा जिंकणे हे भाजप व अशोक चव्हाण यांच्यासाठी प्रतिष्ठेचे झाले आहे. नांदेड जिल्ह्यात भारतीय जनता पक्षाची सूत्रं आपल्याकडेच राहावीत, यासाठी अशोक चव्हाण व चिखलीकर यांच्यात संघर्ष होण्याची शक्यताही नाकारता येत नाही. अशोक चव्हाण हे चिखलीकरांना कितपत साथ देतील, या विषयी शंका उपस्थित होत आहे.

Ashok Chavan-Pratap Chikhlikar
Devendra Fadnavis News : अजितदादा अन्‌ सुप्रियाताईंपासून लांब कोपऱ्यात जाऊन फडणवीस फोनवर कोणाशी बोलले?

गेल्या निवडणुकीत अशोक चव्हाण यांचा पराभव चिखलीकरांनी केला होता. आता पुन्हा चिखलीकर निवडणुकीच्या रिंगणात उतरण्याची तयारी करत आहेत. ते काँग्रेसमध्ये असताना गेल्या लोकसभा निवडणुकीत चिखलीकरांकडूनच अशोक चव्हाण यांचा पराभव झाला होता. आता नांदेडची जागा भाजपसाठी जिंकण्याची जबाबदारीच अशोक चव्हाण यांच्यावर आली आहे. भाजपने चिखलीकरांनाच दुसऱ्यांदा उमेदवारी दिली तर ही शक्ती ते लावतील का? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.

चिखलीकर यांना पुन्हा उमेदवारी मिळाली व ते निवडून आले तर ते अशोक चव्हाण यांचे नेतृत्व मान्य करून काम करतील का? हे ही तितकेच महत्त्वाचे आहे. नांदेड जिल्ह्यात चव्हाण कुटुंबीयांना मानणारा एक मोठा वर्ग आहे. हे महत्त्व लक्षात घेऊन भाजपने चव्हाणांना पक्षात प्रवेश दिला आहे. या प्रवेशाचा फायदा पक्षाला भविष्यात होईल. लोकसभा निवडणुकीत चिखलीकरांना उमेदवारी मिळवून देण्यासाठी अशोक चव्हाण किती सहकार्य करतात, हे येत्या चार-पाच दिवसांत स्पष्ट होईल.

Ashok Chavan-Pratap Chikhlikar
VSI Meeting : अजितदादा, वळसे पाटलांनी शरद पवारांसोबत एकत्र येणे टाळले...

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com