्धLatest Political News in Parbhani : शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाने लोकसभा उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली असून, परभणी लोकसभा मतदारसंघातून विद्यमान खासदार संजय जाधव यांना तिसऱ्यांदा उमेदवारी जाहीर झाली आहे. शिवसेनेला धनुष्यबाण हे पक्षचिन्ह देणारा मतदारसंघ म्हणून परभणी लोकसभा मतदारसंघ (Parbhani Loksabha Constituency) राज्यात ओळखला जातो. शिवसेनाप्रमुखांनी दिलेला उमेदवार परभणीच्या जनतेने नेहमीच स्वीकारला. त्यामुळे परभणी लोकसभा मतदारसंघातून (Loksabha Election) शिवसेनेची उमेदवारी म्हणजे खासदारकी पक्की, असे समीकरणच तयार झाले आहे.
मतदारसंघातील कडवा सैनिक हे शिवसेनेचे बळ म्हणूनच आजवर निवडून आलेल्या खासदारांनी पक्ष सोडला, पण शिवसैनिकांनी मात्र बाळासाहेबांवर (Balasaheb Thackeray) असलेली निष्ठा कायम ठेवली. विशेष म्हणजे ज्यांनी गद्दारी केली त्यांना परभणीकरांनी (Parbhani) पुन्हा विजयाचा गुलाल लावू दिला नाही. राजकीय क्षेत्रात त्यांचे बस्तान उठले ते उठलेच, अशी अनेक उदाहरणं जिल्ह्यात पाहायला मिळतील. गद्दारांच्या विरोधात जेव्हा जेव्हा शिवसेनेने कट्टर सैनिक मैदानात उतरवला तेव्हा तेव्हा मतदारांनी त्याला दिल्लीत पाठवले. संजय ऊर्फ बंडू जाधव यांनी आधी आमदार आणि त्यानंतर दोनदा खासदार म्हणून काम करण्याची संधी मिळाली.current news about Maharashtra politics
(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)
सामान्य शेतकरी कुटुंबातील संजय जाधव यांनी जिल्हाप्रमुख, दोन वेळा आमदार व दोन वेळा खासदार पदाला गवसणी घातली. 2014 आणि 2019 अशा दोन लोकसभा निवडणुकीत विजय मिळवलेल्या जाधव यांनी पक्ष सोडण्याची परंपरा मोडून काढली. महाविकास आघाडी सरकारमध्ये शिवसैनिकांची गळचेपी होत असल्याची भावना सर्वात प्रथम जाधव यांनी जाहीरपणे मांडली. पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्याकडे खासदारकीचा राजीनामाही सोपवला. पण म्हणून काही त्यांनी बंड केले नाही, की शिवसेनेशी असलेली निष्ठा सोडली.
शिवसेनेच्या (Shivsena) इतिहासातील सर्वात मोठी फूट पडल्यानंतर दिग्गज नेत्यांनी उगवत्या सूर्याला नमस्कार केला. अशा कठीण प्रसंगीसुद्धा संजय जाधव यांनी पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची साथ सोडली नाही. एकवेळ राजकारण सोडेन, पण शिवसेनेशी गद्दारी करणार नाही, अशी ठाम भूमिका त्यांनी घेतली. जाधव (Sanjay Jadhav) यांचे नेतृत्व ज्यांच्या मार्गदर्शनाखाली वाढले त्या रवींद्र वायकर यांनीही पक्षाची साथ सोडली. मात्र, तरीसुद्धा जाधव यांच्या निष्ठेवर तीळमात्र फरक पडला नाही. पक्षाने त्यांच्या या निष्ठेची दखल घेत त्यांना उपनेतेपदी बढती दिली.
प्रतिवर्षी पंढरपूरची पायी वारी करणारे जाधव यांची हिंदुत्वाची प्रतिमा परभणीकरांना भावली. पं. प्रदीप मिश्रा, बागेश्वर धाम सरकार धीरज शास्त्री यांच्या भव्य कथांचे आयोजन करत त्यांनी हिंदुत्वाची पताका फडकवत ठेवण्याचा प्रयत्न केला. 2024 च्या लोकसभा निवडणुकीला maharashtra latest news politics सामोरे जाताना जाधव हे तिसऱ्यांदा नशीब आजमावत आहेत. मात्र, यावेळेस पहिल्यांदाच ते धनुष्यबाण सोडून अन्य चिन्हावर निवडणूक लढवणार आहेत. निष्ठावंत जाधव यांना पक्षाने संधी दिली आहे. आता परभणीकरांचा कौल कोणाच्या पारड्यात पडतो हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.
R
Edited By : Rashmi Mane