EVM security controversy : सत्ताधारी राष्ट्रवादीचाही प्रशासनावर भरोसा नाही; स्ट्राँग रूमबाहेर तीन शिफ्टमध्ये पहारा, स्वखर्चाने 'सीसीटीव्ही'ही लावले!

Parbhani Election NCP Installs CCTV Workers Guard EVM Strong Room : परभणीत सत्ताधारी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने स्थानिक प्रशासनावर अविश्वास दाखवत तीन शिफ्टमध्ये पहारा सुरू केला आहे.
EVM security controversy
EVM security controversySarkarnama
Published on
Updated on

Parbhani Municipal Election : निवडणुक आयोगाच्या निर्णयामुळे नगरपालिका, नगरपंचायत निवडणुकीचा निकाल लांबला. तीन डिसेंबर रोजी होणारी मतमोजणी आता स्थगित झालेल्या निवडणुकीनंतर एकत्रित 21 डिसेंबरला होणार आहे.

त्यामुळे निवडणुका पार पडलेल्या भागातील ईव्हीएम मशीन स्ट्राँग रूममध्ये सुरक्षित ठेवण्याची मोठी जबाबदारी निवडणूक विभाग, पोलिसांवर आली आहे. त्यातच महाविकास आघाडीतील विरोधी पक्षांनी अविश्वास दाखवल्याने मराठवाड्यात ठिकठिकाणी स्ट्राँग रूम बाहेर पदाधिकारी कार्यकर्त्यांचा खडा पहारा सुरू आहे.

विरोधकांप्रमाणेच आता परभणीत सत्ताधारी अजित पवार राष्ट्रवादी काँग्रेस (NCP) पक्षाने स्थानिक प्रशासनावर अविश्वास दाखवत तीन शिफ्टमध्ये पहारा सुरू केला आहे. गंगाखेड, जिंतूर आणि पाथरी नगरपालिकेत मोठ्या प्रमाणात पैसे वाटप करण्यात आल्याचा आरोप विरोधकांनी केला आहे. परभणीचे खासदार संजय जाधव यांनी एकट्या पाथरी विधानसभा मतदारसंघात शंभर कोटींची उलाढाल झाल्याचा आरोप केला आहे.

मराठवाड्यात परळीमध्ये (Parli) राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे नेते माजी नगराध्यक्ष दिपक देशमुख यांनी सर्वप्रथम आमदार धनंजय मुंडे व त्यांच्या समर्थकांकडून ईव्हीएम ठेवण्यात आलेल्या स्ट्राँग रूममध्ये दगाफटका होऊ शकतो, अशी शंका उपस्थितीत करत पहारा देण्यासाठी मुक्कामाची व्यवस्था करण्याची मागणी केली.

EVM security controversy
Ashish Yerekar dispute news : भाजपने पैसे वाटल्याचे पुरावा देतो, जिल्हाधिकारी येरेकरांच्या बघ्याची भूमिका; गुन्हा दाखल होताच 'वंचित'च्या विश्वकर्मांची विभागीय आयुक्तांकडे तक्रार

यावरून राष्ट्रवादीचे पदाधिकारी, निवडणुक विभाग आणि पोलीसांशी त्यांचा संघर्षही उडाला. परंतु नंतर हे लोन आणि स्ट्राँग रूम बाहेर खडा पहारा देण्याचे प्रकार मराठवाड्यात अनेक ठिकाणी होऊ लागले. बीडसह जिल्ह्यात अनेक ठिकाणी पदाधिकारी, कार्यकर्ते कडाक्याच्या थंडीत शेकोटी पेटवून स्ट्राँग रूमसमोर बसल्याचे पहायला मिळाले. त्यानंतर आता अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षानेही जिंतूर, गंगाखेडमध्ये तीन शिफ्टमध्ये कार्यकर्त्यांची नियुक्ती करत डोळ्यात तेल घालून स्ट्राँग रूमवर वाॅच ठेवण्यास सुरूवात केली आहे.

EVM security controversy
Siddaramaiah vs DK Shivakumar : सत्तानाट्याला ऊत, अधिवेशनाचा पहिला दिवस; सिद्धरामय्या-शिवकुमारांचे आमदार आमने-सामने

अगदी स्वखर्चाने सीसीटीव्ही देखील काही ठिकाणी बसवण्यात आले आहे. जिंतूरमध्ये राष्ट्रवादीचे माजी आमदार विजय भांबळेविरुद्ध परभणीच्या पालकमंत्री मेघना बोर्डीकर यांच्यात फाईट आहे. तिकडे गंगाखेडमध्ये राष्ट्रवादीचेच डाॅ. मुधुसूदन केंद्रे विरुद्ध आमदार रत्नाकर गुट्टे यांच्यात वर्चस्वाची लढाई आहे. पाथरीमध्ये काँग्रेसचे बाबाजानी दुर्राणी, एकनाथ शिंदेच्या शिवसेनेचे सईद खान हे निवडणुक काळात एकमेकांना भिडले होते. ही सगळी पार्श्वभूमी पाहता स्ट्राँग रूममधील ईव्हीएमच्या सुरक्षेसाठी पोलीस, निवडणुक प्रशासनासोबत राजकीय पक्षांनी स्वतःचीही यंत्रणा तैनात केली आहे.

आम्ही सत्ताधारी, पण यंत्रणेवर विश्वास नाही..

आम्ही सत्ताधारी पक्षाचे असलो तरी स्थानिक यंत्रणेवर विश्वास ठेवावा, अशी परिस्थिती नसल्याचे स्पष्ट मत राष्ट्रवादी काँग्रेसचे मधुसूदन केंद्रे यांनी व्यक्त केले आहे. प्रशासनातील अधिकारी हे स्थानिक लोकप्रतिनिधीचे सालगडी असल्यासारखे वागत असल्याचा आरोप करत केंद्रे यांनी आमदार रत्नाकर गुट्टे यांच्यावर अप्रत्यक्षरित्या निशाणा साधला.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com