Ashish Yerekar dispute news : भाजपने पैसे वाटल्याचे पुरावा देतो, जिल्हाधिकारी येरेकरांच्या बघ्याची भूमिका; गुन्हा दाखल होताच 'वंचित'च्या विश्वकर्मांची विभागीय आयुक्तांकडे तक्रार

FIR Filed Against Vanchit Leader Nilesh Vishwakarma After Clash with Amravati Collector in Chandur Railway Municipal Election : अमरावती चांदूर रेल्वे नगरपालिका निवडणुकीत जिल्हाधिकारी आशिष येरेकर आणि वंचितचे नीलेश विश्वकर्मा यांच्यावत वाद झाला होता.
Ashish Yerekar dispute news
Ashish Yerekar dispute newsSarkarnama
Published on
Updated on

Chandur Railway municipal election : अमरावती जिल्ह्यातील चांदूर रेल्वे नगरपालिका मतदानाच्या दिवशी तिथल्या पंचायत कार्यालय परिसरातून भाजपचे कार्यकर्त्यांनी पैसे वाटल्याचा आरोप वंचित बहुजन आघाडीचे युवक आघाडीचे प्रदेशाध्यक्ष नीलेश विश्वकर्मा केला.

पैसे वाटपाचे पुरावे देतो, असा दावा करत त्यांनी जिल्हाधिकारी आशिष येरेकर यांच्याशी वाद घातला. या वादाला आता सहा दिवस उलटल्यानंतर नीलेश विश्वकर्मा यांच्याविरोधात गुन्हा नोंदवण्यात आला आहे. यावरून वंचितचे कार्यकर्ते, पदाधिकारी आक्रमक झाले असून, नीलेश विश्वकर्मा यांनी यासंदर्भात थेट विभागीय आयुक्तांकडे धाव घेत तक्रार केली आहे.

अमरावतीच्या (Amravati) चांदुर रेल्वे नगरपालिकेच्या मतदानाच्या दिवशी 2 तारखेला पालिका कार्यालय परिसरातून भाजप कार्यकर्त्यांनी पैसे वाटल्याचा आरोप वंचित बहुजन आघाडीचे युवक आघाडीचे प्रदेशाध्यक्ष नीलेश विश्वकर्मा यांचा आहे. भाजपचे तीन कार्यकर्ते आणि एक कंत्राटदार पैशांचे वाटप करीत होते. त्याचे पुरावे आपल्याकडे आहेत, असाही दावा नीलेश विश्वकर्मा यांचा आहे.

Ashish Yerekar dispute news
Siddaramaiah And DK Shivakumar watch controversy : लक्झरी घड्याळाच्या वादात अडकले सिद्धरामय्या अन् शिवकुमार; ‘नाश्ता डिप्लोमसी’ बैठकीत ‘जुळत्या घड्याळांची’ चर्चा रंगली

जिल्हाधिकारी (Collector) आशीष येरेकर याच वेळी प्रत्यक्ष भेटीवर आले होते. त्यांना समोरे जात, परिस्थिती सांगितली, तरी त्याची दखल घेतली गेली नाही, असा गंभीर आरोप वंचितचे नीलेश विश्वकर्मा यांनी केला. जिल्हाधिकारी येरेकर यांना परिस्थिती सांगत असताना, नीलेश विश्वकर्मा यांचा आवाज काहीसा वाढला होता. यातच जिल्हाधिकारी यांच्याबरोबर असलेल्या सरकारी अंगरक्षक पुढे घाला. नीलेश विश्वकर्मा यांनी आपण जिल्हाधिकाऱ्यांच्या इजा पोहचवत आहे का? असा प्रश्न केला.

Ashish Yerekar dispute news
Goa nightclub fire : गोवा नाइट क्लब अग्निकांड; 25 जणांचा बळी, लुथरा बंधूंचा थायलंडला पळ!

नीलेश विश्वकर्मा यांनी आपले म्हणणे मांडताना, जिल्हाधिकारी आमचा आहे. त्यांनी ऐकलं पाहिजे, असे म्हणत असतानाच, जिल्हाधिकारी आशिष येरेकर यांनी तुमचे म्हणणे शांतपणे मांडा, असे म्हटले. याचा व्हिडिओ समाज माध्यमांवर चांगलाच व्हायरल झालेला आहे. परंतु या प्रकाराला आता सहा ते सात दिवस उलटून गेले आहेत. पण आता नीलेश विश्वकर्मा यांच्याविरोधात गंभीर स्वरूपाचे कलम लावत गुन्हा दाखल केला आहे.

Ashish Yerekar dispute news
Siddaramaiah vs DK Shivakumar : सत्तानाट्याला ऊत, अधिवेशनाचा पहिला दिवस; सिद्धरामय्या-शिवकुमारांचे आमदार आमने-सामने

विभागीय आयुक्तांकडे तक्रार

हा गुन्हा दाखल झाल्यानंतर वंचितचे कार्यकर्ते, पदाधिकारी प्रशासनाविरोधात आक्रमक झाले आहेत. उलटा चोर कोतवाल को दाटे, असं प्रशासनाचं कामकाज असल्याचा आरोप केला. यानंतर कार्यकर्ते, पदाधिकाऱ्यांनी नीलेश विश्वकर्मा यांच्यासह थेट अमरावतीच्या विभागीय आयुक्तांची भेट घेत जिल्हा प्रशासनाच्या कारभाराविरोधात तक्रार केली.

पैसे वाटले भाजपने, कारवाई माझ्यावर

'पैसे वाटणाऱ्यावर कारवाई करण्याऐवजी माझ्यावर गुन्हे दाखल केले गेले, भाजपवाले पैसे वाटत असताना त्यांच्यावर कारवाई केलीच नाही, तर माझ्यासारख्या तरुण कार्यकर्त्यावर गुन्हे दाखल केले, जिल्हाधिकाऱ्यांनी यावर चौकशी करायला पाहिजे होती, माझ्यासारख्या तरुणाचा आवाज दाबण्याचा हा प्रयत्न आहे, असं होत राहिलं, तर माझ्यासारखे तरुण राजकारणात येणार नाही,' असा घणाघात वंचित बहुजन आघाडीचे युवा आघाडीचे प्रदेशाध्यक्ष नीलेश विश्वकर्मा यांनी केला.

भाजप आमदारांवर जोरदार टीका

नीलेश विश्वकर्मा यांनी भाजपचे आमदार प्रताप अडसड यांच्यावरही जोरदार टीका केली आहे. भाजपच्या आमदारांच्या इशाऱ्यावरून असे प्रकार घडले. पैशांचे वाटप थेट सरकारी कार्यालयातून होते, यातून भाजपचा खरा चेहरा समोर आला आहे, असा गंभीर आरोप नीलेश विश्वकर्मा यांनी केला.

विश्वकर्मा यांच्या पत्नी नगराध्यक्षपदाच्या उमेदवार

नीलेश विश्वकर्मा यांच्या पत्नी प्रा. प्रियंका विश्वकर्मा या चांदूर रेल्वे नगराध्यक्षपदाच्या उमेदवार आहेत. ‘आपलं चांदूर’ या पॅनेलच्या वतीने त्यांनी निवडणूक लढवली. वंचित बहुजन आघाडी, एकनाथ शिंदे शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्ष, अजित पवार राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने पाठिंबा दिला आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com