Marathwada : परभणी जिल्ह्यात शिंदे गटाने नुकताच राष्ट्रवादी व काॅंग्रेसल मोठा धक्का दिल्यानंतर आता राष्ट्रवादीचे राज्य सरचिटणीस संजय रोडगे (Sanjay Rodge) हे देखील भाजपमध्ये प्रवेश करणार आहेत. माजी आमदार विजय भांबळे यांच्या त्रासाला कंटाळून आपण हा निर्णय घेतल्याचे रोडगे यांनी म्हटले आहे. शुक्रवारी (ता.३१) रोजी त्यांनी भाजपच्या आमदार मेघना बोर्डीकर-साकोरे यांच्यासह उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली. त्यामुळे ते भाजपमध्ये प्रवेश करणार यावर शिक्कामोर्तब झाले आहे.
रोडगे यांच्या भाजप प्रवेशाने परभणी जिल्ह्यात पक्षाला मोठी ताकद मिळेल, अशी चर्चा आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे (Ncp) राज्य सरचिटणीस तथा वाशीम जिल्हा निरिक्षक डॉ. संजय रोडगे भाजपाच्या वाटेवर असल्याने तालुक्यातील राजकीय समिकरण बदलण्याची चिन्हं आहेत. (Bjp) गेल्याच आठवड्यात जिल्ह्यातील शेकडो सरपंच, जिल्हा परिषद, पंचायत समिती सदस्यांसह पदाधिकारी, कार्यकर्त्यांनी शिंदे गटात प्रवेश केला होता.
या सर्वांचा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत मुंबईतच प्रवेश झाला. त्यानंतर आठवडाभरात राष्ट्रवादीला जिल्ह्यात रोडगे यांच्या रुपाने दुसरा धक्का बसणार आहे. मागील अनेक दिवसापासून संजय रोडगे यांना जाणीवपूर्वक तालुक्यातील कार्यक्रमातून डावलण्यात येत होते. याबद्दल आपल्याला खंत असल्याचे रोडगे सांगतात. तसेच रवळगाव येथील ग्रामपंचायतमध्ये निर्णय घेतांना आपल्याला विश्वासात न घेतल्यामुळे आपण स्वतंत्र पॅनल उभे करत सरपंचपदाचा उमेदवार निवडून आणला होता.
ही सल माजी आमदार विजय भांबळे यांच्या मनात असल्याने रोडगे आणि त्यांच्यातील मतभेद वाढत गेले. शेवटी राष्ट्रवादी काँग्रेस सोडण्याचा निर्णय रोडगे यांना घ्यावा लागत असल्याचे बोलले जाते. मुंबईत आमदार मेघना बोर्डीकर यांच्यासह रोडगे यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली. अनेक वर्षापासून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे इमानेइतबारे काम केले. पक्ष नेतृत्वाने जी जबाबदारी दिली ती पूर्णपणे पार पाडली.
मात्र काही दिवसापासून विनाकारण मानसिक त्रास देण्याचे काम माजी आमदार विजय भांबळे यांनी केले. माझी विनाकारण पक्षात घूसमट करण्यात येत असल्याने मी माजी आमदार रामप्रसाद बोर्डीकर, मेघना बोर्डीकर यांच्यासोबत राहून काम करणार असल्याचे रोडगे यांनी स्पष्ट केले. लवकरच सेलू येथे मान्यवरांच्या उपस्थिती भाजपात प्रवेश करणार असल्याचे रोडगे यांनी सांगितले.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.