Sanjay Raut threatened : संजय राऊतांना बिश्नोई गँगची धमकी; नेमकं प्रकरण काय?

या धमकीच्या मेसेजचे स्क्रिनशॉट संजय राऊतांनी सोशल मिडीयावर शेअर केले आहे
Sanjay Raut threatened
Sanjay Raut threatenedSarkarnama
Published on
Updated on

Sanjay Raut threatened by Bishnoi gang : उद्धव ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांना बिश्नोई गँगकडून धमकी आल्याची माहिती समोर आली आहे. या प्रकरणी कांजूर मार्ग पोलीस ठाण्यातील पोलिसांत तक्रार दाखल करण्यात आली आहे. तसेच राऊत यांच्या निवासस्थानी आणि दैनिक सामना वृत्तपत्राच्या कार्यालयाबाहेर पोलिसांचा पहारा तैनात करण्यात आला (Sanjay Raut threatened by Bishnoi gang; If you come to Delhi...)

शुक्रवारी संध्याकाळी पाच वाजण्याच्या सुमारास संजय राऊत यांच्या मोबाईलवर धमकीचा मेसेज आला. या मेसेज मध्ये दिल्लीत आल्यास त्यांना AK 47 ने हत्या करण्याची धमकी देण्यात आली आहे. या मेसेज चा स्क्रिनशॉटही त्यांनी सोशल मिडीयावर शेअर केला आहे. त्यावरून आता राजकीय वर्तुळात तर्क-वितर्कांना उधाण आलं आहे.

Sanjay Raut threatened
Maharashtra Politics : मुख्यमंत्री शिंदेंचा अपमान ; राऊतांवर मानहानीचा दावा ; राहुल गांधींची खासदारकी रद्द झाल्यानंतर...

दरम्यान, या प्रकरणी पोलिसांनी पुण्यातून एका तरुणाला जणांना ताब्यात घेतलं आहे. राहुल तळेकर (वय २३) असे या तरुणाचे नाव आहे. पुण्यातील खराडी भागातून गुन्हे शाखेने काल रात्री उशिरा ताब्यात घेतलं. मुंबई पोलीस आणि पुणे पोलिस यांच्या गुन्हे शाखेने संयुक्त कारवाई केली.

ताब्यात घेतलेल्या तळेकरला सध्या मुंबई पोलिसांच्या ताब्यात देण्यात आलं आहे. मुंबई पोलीस या तरुणाला घेऊन रात्रीच रवाना झाले. रात्री साडेदहा वाजण्याच्या सुमारास खराडी परिसरातील जयशंकर हॉटेलमधून या तरुणाला ताब्यात घेण्यात आलं. मुंबई पोलिसांनी माहिती दिल्यानंतर गुन्हे शाखेच्या पोलिसांनी तत्काळ या प्रकरणी कारवाई करत लगोलग या तरुणाला ताब्यात घेत मुंबई पोलिसांकडे सोपवलं

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com