

Parbhani News, 06 May : ठाकरेंच्या शिवसेनेचे परभणीचे खासदार संजय जाधव यांचे निकटवर्तीय असलेले माजी जिल्हाप्रमुख गंगाप्रसाद आनेराव यांची पक्षातून हकालपट्टी केल्याचे पडसाद आता परभणीत उमटायला सुरूवात झाली आहे.
शिवसेनेतील तब्बल 82 पदाधिकाऱ्यांनी आपले राजीमाने दिले आहेत. या राजीनाम्यांमुळे ठाकरेंच्या शिवसेनेत एकच खळबळ उडाली असून पक्षासाठी हा मोठा धक्का मानला जात आहे. मागील काही दिवसांपासून परभणीत ठाकरेंच्या शिवसेनेत मोठ्या हालचाली घडताना दिसत आहेत.
खासदार संजय जाधव यांच्या विधानामुळे पक्षातील नेत्यांमध्ये चलबिचल सुरू होती. अशातच ठाकरेंच्या शिवसेनेचे नेते गंगाप्रसाद आनेराव हे शिवसेना भवन येथे आयोजित बैठकीला गैरहजर असल्यामुळे त्यांच्यावर कारवाई करत त्यांना पदावरून हटवलं.
यामुळे अनेक पदाधिकाऱ्यांमध्ये नाराजी निर्माण झाली आणि याच नाराजीतून आता त्यांनी राजीनामे दिले आहेत. आनेराव हे खासदार संजय जाधवांचे जवळचे सहकारी असून संजय जाधव हे ठाकरेंची साथ सोडण्याची चर्चा सुरू असल्यामुळे ठाकरेंनी कारवाई करत आनेराव यांनाच पदावरून हटवलं होतं.
मात्र या निर्णयाचे उलटे पडसाद उमटताना दिसत आहेत. शिवाय येत्या आठ दिवसात ठाकरेंनी निर्णय मागे घेतला नाही तर या पदाधिकाऱ्यांनी सदस्यपदाचा राजीनामा देण्याचाही इशारा दिला आहे. त्यामुळे आता पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यावर नेमका काय तोडगा काढणार? हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.