Muslim Mayor Parbhani : हिंदुत्वाच्या बालेकिल्ल्यात ठाकरेंकडून मुस्लिम महापौर; परभणीतील ऐतिहासिक खेळीमागील खरं कारण

Parbhani Municipal Corporation resul News : परभणी महापालिका निवडणुकीत 65 पैकी तब्बल 25 जागा जिंकून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे हा सर्वात मोठा पक्ष ठरला होता.
Uddhav Thackeray, Sanjay Jadhav
Uddhav Thackeray, Sanjay JadhavSarkarnama
Published on
Updated on

Parbhani Mayor : खाण हवा की बाण? या एका वाक्यावर दिवंगत बाळासाहेब ठाकरे यांनी संपूर्ण मराठवाड्याचं राजकारण बदललं. आजचे छत्रपती संभाजीनगर, परभणी, धाराशिव आणि हिंगोली या जिल्ह्यांना शिवसेनेचा बालेकिल्ला बनवले. आता त्याच मराठवाड्यात आता शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाने महापौरपदासाठी मुस्लीम चेहरा दिला आहे. परभणीच्या महापौरपदी सय्यद इकबाल यांची निवड झाली आहे. या निवडीनंतर संपूर्ण मराठवाड्यात आश्चर्य व्यक्त केले जात आहे.

राज्यातील महापालिका निवडणुकीत एकीकडे महाविकास आघाडीच्या पदरी मोठे अपयश आले. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या पक्षाला फक्त मुंबई आणि परभणीमध्येच लक्षणीय कामगिरी करता आली. तर काँग्रेसला लातूर, चंद्रपूर, भिवंडी आणि कोल्हापूर या मोजक्या महापालिकांमध्ये आपली ताकद दाखवता आली. यातील परभणीमध्ये शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे आणि काँग्रेस या दोघांनाही संयुक्त यश मिळाले. यानंतर गुरुवारी (12 फेब्रुवारी) महापौर आणि उपमहापौरपदाची निवडणूक पार पडली.

यात सय्यद इकबाल यांची महापौरपदी निवड झाली. परभणीत शिवसेना (Shivsena) उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे खासदार संजय जाधव व आमदार राहुल पाटील या दोघांनी मतभेद दूर ठेवून ही जोडी पाय रोवून उभी राहिली. त्यामुळेच इथे ठाकरेंच्या शिवसेनेचा महापौर बसू शकला. पण परभणी हे प्रखर हिंदुत्ववादी शहर आणि जिल्हा म्हणून ओळखला जातो. शिवसेनेचे या जिल्ह्यावर पूर्वीपासून प्राबल्य बघायला मिळते. त्यामुळे इथे या जोडीने मुस्लीम चेहऱ्याला दिलेले प्रमुख पद चर्चेचा विषय ठरला आहे. मात्र यामागे कारणही तसेच आहे.

Uddhav Thackeray, Sanjay Jadhav
ShivsenaUBT Vs BJP : मोदी-ठाकरे नावांवरून रणांगण पेटलं! ‘चोर है’च्या घोषणा; भाजप-ठाकरसेना नगरसेवक आमने-सामने

परभणी महापालिका निवडणुकीत 65 पैकी तब्बल 25 जागा जिंकून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे हा सर्वात मोठा पक्ष ठरला होता. त्या पाठोपाठ काँग्रेस 12, भाजप 12, राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार 11 आणि जनसुराज्य पक्ष तीन, यशवंत सेना एक आणि अपक्ष दोन असे 65 नगरसेवक या महापालिकेत निवडून आले आहेत. निवडणुकीपूर्वीच काँग्रेस आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे (Uddhav Thackeray) पक्षाने युती करून परभणी महापालिकेची निवडणूक लढवली होती. त्यांच्या तब्बल आघाडीने 37 जागा जिंकून बहुमत सिद्ध केले होते. 65 सदस्य असलेल्या या सभागृहात 33 हा बहुमताचा आकडा हा शिवसेना आणि काँग्रेसने ओलांडला होता आणि त्यांचाच महापौर, उपमहापौर बसेल हे मात्र आधीच ठरले होते.

Uddhav Thackeray, Sanjay Jadhav
Karad BJP : ऐतिहासिक सत्तांतर! कराड पंचायत समितीवर भाजपचा झेंडा : दोन्ही राष्ट्रवादीवर आत्मचिंतनाची वेळ, काँग्रेसचा दिवा विझण्याच्या मार्गावर

65 पैकी 29 नगरसेवक मुस्लिम समाजाचे

परभणी शहर हे जसे हिंदुत्वबहुल आहे तसेच मुस्लिम बहुल आहे. त्यामुळेच सर्वच पक्षाने मोठ्या प्रमाणात मुस्लिम समाजाच्या उमेदवारांना संधी दिली होती. त्यामुळे 65 पैकी 29 नगरसेवक मुस्लिम समाजाचे निवडून आले आहेत. त्यामध्ये उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेचे 13 तर काँग्रेसचे 8, राष्ट्रवादी काँग्रेसचे 6 तर अपक्ष दोन नगरसेवक निवडून आले आहेत. यात ठाकरेंची शिवसेना व काँग्रेसमध्ये 37 पैकी जवळपास 21 नगरसेवक मुस्लिम समाजाचे निवडून आले असल्याने त्यांची संख्या मोठी होती. त्यामुळेच उद्धव ठाकरे यांनी महापौर पदाची संधी मुस्लिम नगरसेवकाला दिली.

Uddhav Thackeray, Sanjay Jadhav
Congress Vs BJP : 'अशोक चव्हाण खुर्चीत, नगराध्यक्ष उभे...'; काँग्रेस प्रवक्त्याने 'चव्हाण', 'देशमुख' पॅटर्नमधील फरक सांगितला

परभणी हा शिवसेनेचा बालेकिल्ला असला तरी पक्षफुटीनंतर या बालेकिल्ल्याला सुरुंग लावण्याचे मोठे प्रयत्न झाले. मात्र, खासदार संजय जाधव यांनी ग्रामीण भागात आणि आमदार राहुल पाटील यांनी शहरात अशी जबाबदारी विभागून घेतली. दोघांमधील समन्वयामुळेच ६५ पैकी २५ जागांवर शिवसेनेचा भगवा फडकला. त्यामुळेच परभणी महानगरपालिकेत सय्यद इकबाल यांच्या रूपाने मिळालेल्या मुस्लिम महापौराचे श्रेय पूर्णपणे खासदार संजय जाधव आणि आमदार डॉ. राहुल पाटील यांच्यातील अभेद्य एकजुटीला जाते. या दोघांनी 'जुळवून' घेतल्यानेच परभणीत 'ठाकरे ब्रँड'ची जादू कायम राहिली.

Uddhav Thackeray, Sanjay Jadhav
Parbhani Mayor : प्रखर हिंदुत्ववादी शहरात महापौरपदासाठी ठाकरेंच्या शिवसेनेचं 'मुस्लीम' कार्ड : काँग्रेसकडून उपमहापौरपदावर 'हिंदू' चेहरा

'मुस्लिम महापौर' हे मास्टरस्ट्रोक समीकरण

परभणी शहरात मुस्लिम मतदारांची संख्या निर्णायक आहे. भाजपला रोखण्यासाठी केवळ हिंदुत्वाच्या जोरावर सत्ता येणे कठीण होते. हे संजय जाधव यांच्या लोकसभा निवडणुकीवेळी लक्षात आले. लोकसभा निवडणुकीवेळी मराठवाड्यात मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनामुळे मराठा विरुद्ध ओबीसी अशी हिंदुत्ववादी मतांची विभागणी झाली. त्यावेळी स्वतः जाधव यांनी हे मान्य केले की मला मराठा, दलित आणि मुस्लीम समाजाने भरभरून मतदान केले.

Uddhav Thackeray, Sanjay Jadhav
Congress Vs BJP : 'अशोक चव्हाण खुर्चीत, नगराध्यक्ष उभे...'; काँग्रेस प्रवक्त्याने 'चव्हाण', 'देशमुख' पॅटर्नमधील फरक सांगितला

हेच ओळखून या जोडीने महापालिका निवडणुकीतही मुस्लिम समाजातील उमेदवारांना मोठ्या प्रमाणावर संधी दिली. यातून काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेससोबत असेला मुस्लीम मतदारही आपल्याकडे वळवला. आता सय्यद इकबाल यांच्या रूपाने महापौरपद देऊन एक मोठा सामाजिक संदेश दिला. यामुळे एमआयएम आणि इतर अपक्ष मुस्लिम नगरसेवकांचा कलही शिवसेनेकडे वळला. भविष्यात या सामाजिक समीकरणाचा फटका बसू शकतो, असे सध्या तरी दिसत नसल्याचे राजकीय जाणकारांचे मत आहे. परंतू शिवसैनिकांना हे समीकरण कितपत रुचणार आणि ते भविष्यात काय भूमिका घेणार यावर बऱ्याच गोष्टी असल्याचेही त्यांनी सांगितले.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com