Parbhani Mayor : प्रखर हिंदुत्ववादी शहरात महापौरपदासाठी ठाकरेंच्या शिवसेनेचं 'मुस्लीम' कार्ड : काँग्रेसकडून उपमहापौरपदावर 'हिंदू' चेहरा

Parbhani Mayor Election: परभणीत शिवसेनेने (उबाठा) सय्यद इकबाल यांना महापौरपदाची उमेदवारी देऊन राजकीय धक्का दिला आहे. काँग्रेसचे गणेश देशमुख उपमहापौरपदाचे उमेदवार असून, या 'हिंदुत्व' बालेकिल्ल्यात मुस्लीम चेहरा देऊन नवीन प्रयोग केला जात आहे.
Parbhani Mayor Election
Parbhani Mayor ElectionSarkarnama
Published on
Updated on

Parbhami Mayor : परभणीसारख्या प्रखर हिंदुत्ववादी शहरात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडून महापौरपदासाठी मुस्लीम चेहरा दिला आहे. महापौरपदासाठी सय्यद इकबाल यांच्या नावावर शिक्कामोर्तब झाले आहे, तर उपमहापौरपदासाठी काँग्रेसने गणेश देशमुख यांना उमेदवारी दिली आहे. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरेंच्या या उमेदवारीवर संपूर्ण शहरातून आश्चर्य व्यक्त केले जात आहे.

परभणी महापालिकेत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष आणि काँग्रेस आघाडीने बहुमत मिळवत सत्ता काबीज केली. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे खासदार संजय जाधव आणि आमदार राहुल पाटील यांनी आपापसातले मतभेद बाजूला सारत महापालिकेसाठी जोर लावला होता.

2024 च्या लोकसभा निवडणुकीपासून काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षासोबत असलेला मुस्लीम मतदार मोठ्या प्रमाणात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडे वळला आहे. परभणीत खासदार संजय जाधव यांनाही या महाविकास आघाडीचा फायदा होऊन मुस्लिम मतांच्या जोरावर त्यांनी मोठा विजय मिळवला होता.

परभणी महापालिकेत सत्ता आणण्यासाठी तोच प्रयोग संजय जाधव आणि राहुल पाटील या खासदार आमदार जोडीने केला. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाने जातीय समीकरणे लक्षात घेत काही मुस्लिम उमेदवार देत सत्ताधारी राष्ट्रवादी काँग्रेस व राष्ट्रीय काँग्रेस पक्षाची कोंडी केली होती. शिवसेनेकडून निवडून आलेल्या मुस्लीम नगरसेवकांची संख्या पाहता महापौरपदावर या नगरसेवकांनी दावा केला होता.

Parbhani Mayor Election
Parbhani Mayor election: परभणीत धाकधूक वाढली; चंद्रपूरमध्ये ठाकरेंच्या शिवसेनेची भाजपला साथ, उद्या महापौर निवडीवेळी काय घडणार? मोठी अपडेट आली समोर

परभणी हे संवेदनशील शहर म्हणून ओळखले जाते. प्रखर हिंदुत्ववादी विचारांच्या जोरावरच इथे शिवसेना वाढली. इथल्या मतदारांनी सातत्याने शिवसेनेला भरभरून मतांचे दान दिले. बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांचा पगडा आणि प्रभाव असलेल्या या शहरात राजकीय तडजोडीतून आता चक्क मुस्लिम महापौर बसणार आहे. यावरून हिंदू मतदारांमध्ये नाराजीचे वातावरण दिसून येत आहे.

चंद्रपूर महानगरपालिकेत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाने काँग्रेस सोबत न जाता भाजपला पाठिंबा देण्याचा निर्णय घेतला. या प्रकारामुळे परभणीत काँग्रेसकडून शिवसेनेला दगा फटका होण्याची शक्यता वर्तवली जात होती. परंतु या सगळ्या चर्चांना पूर्णविराम देत खासदार संजय जाधव, आमदार राहुल पाटील व काँग्रेसच्या नगरसेवक व स्थानिक नेत्यांची आज सकाळी बैठक पार पडली.

Parbhani Mayor Election
Parbhani ZP : 'रासप'चे आमदार रत्नाकर गुट्टेंनी पडद्यामागून फिरवली सूत्र; महापालिकेत हरलेली भाजप ZP निवडणुकीत थेट सत्तेच्या उंबरठ्यावर

यानिमित्ताने शिवसेनेने परभणी महापालिकेतील सत्ता राखली असली तरी आगामी विधानसभा निवडणुकीच्या दृष्टीने हा निर्णय शिवसेनेला भविष्यात घातक ठरू शकतो. आतापर्यंत परभणीत खान हवा की बाण या मुद्द्यावर निवडणुका लढल्या जायच्या. त्याच शिवसेनेने आता महापौर पदावर एका 'खानाची' निवड केल्याचे दिसून येत आहे. याचे पडसाद आगामी काळात जिल्ह्यात कसे उमटतात हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com