Instagram Ban : सरकारची पोलखोल, विठ्ठल कांगणेंच 'इन्स्टा' अकाउंट क्लोज! खरात प्रकरणात नवा ट्विस्ट; सुजात आंबेडकर मैदानात

After sharing a video exposing the Ashok Kharat case, Parbhani teacher Vitthal Kangane Instagram account was reportedly shut, prompting Sujat Ambedkar to meet him : नाशिकमधील अशोक खरात प्रकरणात सरकारची पोलखोल करणारा व्हिडिओ परभणीतील प्रसिद्ध शिक्षक विठ्ठल कांगणे यांनी समाज माध्यमांवर शेअर केला होता.
Vitthal Kangane
Vitthal KanganeSarkarnama
Published on
Updated on

Parbhani teacher news : परभणीमधील प्रसिद्ध शिक्षक विठ्ठल कांगणे यांचे इन्स्टाग्राम खाते बंद करण्यात आलं आहे. नाशिकमधील भोंदूबाबा अशोक खरात प्रकरणात शिक्षक कांगणे यांनी व्हिडिओ शेअर करत सरकारची पोलखोल केली होती. त्यावरून त्यांचे खाते बंद करण्यात आल्याचे सांगितलं जात आहे.

वंचित बहुजन आघाडीचे युवा नेते सुजात आंबेडकर यांनी भेट, विठ्ठल कांगणे यांना समर्थन देत, सरकारविरोधात आवाज बुलंद करण्याचा निर्णय जाहीर केला.

वंचितचे युवा नेते सुजात आंबेडकर (Sujat Ambedkar) यांनी विठ्ठल कांगणे यांची भेट घेतल्यानंतर, जो सरकारचा खरा चेहरा समोर आणेल, त्याचा आवाज दाबला जाईल, अशा शब्दात राज्यातील सरकारवर हल्ला चढवला.

भाजप (BJP) सरकारवर टीका करणारे, सुधारणा सुचवणारे आणि सत्य परिस्थिती मांडणाऱ्यांचा आवाज दाबला जात आहे, असा आरोप करताना, स्वामी विवेकानंद करिअर अकॅडमीच्या माध्यमातून महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करणारे शिक्षक विठ्ठल कांगणे सर यांचे इन्स्टाग्राम अकाउंट बंद का करण्यात याचे उत्तर मिळाले पाहिजे, असे सुजात आंबेडकर यांनी म्हटलं.

Vitthal Kangane
Ajit Pawar NCP Controversy : राष्ट्रवादीत नवा ‘देव’ तयार होतोय? अमोल मिटकरींचा भन्नाट टोला

विठ्ठल कांगणे सर, सोशल मीडियाच्या माध्यमातून सरकारच्या चुकीच्या धोरणांबद्दल परखड मत मांडणे आणि विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करण्याचे काम ते करत आहेत. तरीही त्यांचे सोशल मीडिया अकाउंट सरकारकडून बंद करण्यात येत आहे इतकी भीती भाजप सरकारला कशाची वाटते? असा सवाल सुजात आंबेडकर यांनी उपस्थित केला.

Vitthal Kangane
Rupali Chakankar SIT summons : पुरावे नष्ट होण्याआधीच अटक करा! रोहिणी खडसेंचा थेट इशारा; चाकणकरांच्या अडचणीत भर

खरातप्रकरणात प्रश्न अन् खाते बंद...

यापूर्वी पुलकित मणी या कॉमेडियनने एक रील बनवली होती, तीही सरकारने हटवल्याकडे सुजात आंबेडकर यांनी लक्ष वेधलं. विद्यार्थ्यांमध्ये लोकप्रिय असलेले विठ्ठल कांगणे सर यांचे इन्स्टाग्राम खाते सरकारकडून बंद करण्यात आले. भोंदूबाबा अशोक खरात प्रकरणी प्रा. कांगणे सरांनी सरकारचा पोलखोल करणारा व्हिडीओ बनवला होता. त्या कारणावरून त्यांचे सोशल मीडिया खाते बंद करण्यात आल्याचा संशय सुजात आंबेडकर यांनी व्यक्त केला.

सरकारच्या हुकूमशाहीविरोधात मैदानात

महाराष्ट्र सरकारने आपलं अपयश लपवण्यासाठी सोशल मीडियावरील खाते बंद करून होणार नाही. खरात प्रकरणात अडकलेल्या सरकार, प्रशासनातील मोठ्या लोकांना गजाआड करावे, असे आव्हान सुजात आंबेडकरांनी दिलं. सरकारच्या मुस्कटदाबीचा निषेध करताना, सरकारच्या हुकूमशाही विरोधात आपण विठ्ठल कांगणे सरांसोबत आहोत, असेही सुजात आंबेडकर यांनी ठणकावून सांगितलं.

विठ्ठल कांगणेंची प्रतिक्रिया समोर...

यातच विठ्ठल कांगणे सर यांची प्रतिक्रिया समाज माध्यमांवर व्हायरल झाली आहे. "माझं इन्स्टाग्राम अकाउंट अचानक बॅन करण्यात आलं. याबाबत कोणतीही पूर्वसूचना किंवा ठोस कारण देण्यात आलेलं नाही. मी सातत्याने विद्यार्थ्यांचे प्रश्न मांडत होतो, त्यांच्या अडचणींवर बोलत होतो आणि व्यवस्थेला थेट प्रश्न विचारत होतो. जर सरकारच विद्यार्थ्यांच्या भविष्याशी खेळत असेल आणि त्या विरोधात आवाज उठवला म्हणून आमच्या इंस्टाग्राम ID बंद केल्या जात असतील, तर ID बंद करता येतील; पण विचार थांबवता येणार नाहीत. विद्यार्थ्यांच्या भविष्याशी खेळणाऱ्यांविरोधात आम्ही अधिक ताकदीने मैदानात उतरू," असं सुनावलं आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com