DGP Date Parli Visit : परळीतील गुन्हेगारीविरोधात DGP दातेंचा 'अॅक्शन प्लॅन'; पोलीस स्टेशनला भेट देत महत्त्वाच्या सूचना, घुले हत्याकांड तपासाबाबत कडक निर्देश

DGP Date instructions on Ghule murder case : DGP दाते यांनी परळी पोलीस स्टेशनला भेट देत कायदा-सुव्यवस्थेचा आढावा घेतला. गुन्हेगारी नियंत्रणासह विलास घुले हत्याकांड तपासाबाबत पोलिसांना कडक निर्देश दिले.
Parli crime DGP Datte action plan
Parli crime DGP Date action planSarkarnama
Published on
Updated on

Beed Police : गेल्या दीड दोन वर्षापासून बीड जिल्ह्यातील वाढती गुन्हेगारी, यातून जिल्ह्यातील राज्य पातळीवर मलिन झालेली प्रतिमा, बीड पोलीसांच्या कामगिरीवर निर्माण झालेले प्रश्न चिन्ह आणि राज्य सरकारवरचा दबाव या पार्श्वभूमीवर पोलीस महासंचालक सदानंद दाते यांचा बीड जिल्हा दौरा महत्त्वाचा ठरला.

परळी पोलीस ठाण्याला त्यांनी दिलेली भेट, प्रभू वैद्यनाथांचे घेतले दर्शन आणि गुन्हे सिध्द करण्याचे प्रमाण वाढवण्याच्या बीड पोलीसांना त्यांनी दिलेल्या सूचना हे या दौर्‍याचे वैशिष्ट ठरले. पोलीस महासंचालकांच्या दौऱ्यामुळे अलर्ट झालेल्या बीड पोलीस दलाचे मनोबलही या दौऱ्याने वाढल्याची चर्चा होत आहे.

Parli crime DGP Datte action plan
Amit Shah Mumbai : ‘सुप्रीम कोर्टातील युक्तिवादामुळे अमित शाह पळत-पळत महाराष्ट्रात’; हर्षवर्धन सपकाळांचा बोचरा टोला

राज्याचे पोलीस महासंचालक (डीजीपी) सदानंद दाते यांनी दोन दिवसीय बीड दौरा केला. गुरुवारी मुक्कामी आलेले दाते शुक्रवारी सायंकाळी बीडमधील आढावा बैठक घेऊन आष्टी तालुक्यातील अंभोरा पोलीस स्टेशनला भेट देणार आहेत. त्यानंतर रात्री अहिल्यानगर मार्गे पुण्याला मार्गस्थ होणार आहेत.

या दौऱ्या दरम्यान त्यांनी बीड पोलीस दलाच्या उल्लेखनीय कामगिरीबद्दल समाधान व्यक्त केले. पोलिसांच्या पाठीवर शाब्बासकीची थाप मारली. परळी येथील श्री वैजनाथ ज्योतिर्लिंगाचे दर्शन घेऊन त्यांनी आपल्या या दौऱ्याचा प्रारंभ केला. त्यानंतर परळी पोलीस ठाण्याला भेट देऊन तेथील कामकाजाचा सविस्तर आढावा घेतला.

यानंतर बीड जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालयात वरिष्ठ अधिकाऱ्यांची एक उच्चस्तरीय बैठक पार पडली. या बैठकीत जिल्ह्यातील कायदा व सुव्यवस्था, प्रलंबित गुन्हे आणि पोलीस दलाच्या विविध उपक्रमांची झाडाझडती घेण्यात आली. बीड पोलिसांच्या विविध नाविन्यपूर्ण उपक्रमांचे महासंचालकांनी मनापासून कौतुक केले.

यात ​पोलीस आपल्या बांधावर यामध्ये ग्रामीण भागातील जनतेशी थेट संपर्क साधणारा हा उपक्रम अतिशय प्रभावी ठरत आहे. शहरातील वाहतूक पोलीस आणि डीपीआयजे उपक्रमाच्या माध्यमातून होत असलेले काम अत्यंत समाधानकारक आहे. सुरक्षेच्या दृष्टीने बीड पोलिसांनी सुरू केलेला क्यूआर कोड उपक्रम आधुनिक तंत्रज्ञानाचा उत्तम वापर असल्याचे त्यांनी सांगितले.

Parli crime DGP Datte action plan
Amazon Bhiwandi FDA action : ‘डास मारण्यासाठी तलवार...’; ॲमेझॉन प्रकरणात FDAच्या कारवाईवर हायकोर्ट नाराज! म्हणाले, ‘प्रत्येक आस्थापना बंद करणार का?’

​खोट्या गुन्ह्यांना आळा

जिल्ह्यात खोटे गुन्हे दाखल होण्याचे प्रमाण रोखण्यात पोलिसांना मोठे यश आले आहे. दौऱ्या दरम्यान महासंचालकांनी विशेष जनता दरबार भरवून सर्वसामान्य नागरिक, विविध लोकप्रतिनिधी, आमदार आणि थेट पोलीस कर्मचार्‍यांच्या अडीअडचणी प्रत्यक्ष जाणून घेतल्या. विविध मागण्यांसाठी आलेल्या आंदोलकांची भेट घेऊन त्यांच्या समस्याही अत्यंत संवेदनशीलतेने त्यांनी ऐकून घेतल्या.

​प्रशासकीय पातळीवर ज्या काही अडचणी आहेत, त्या लवकरात लवकर सोडवण्याचे आश्वासन त्यांनी दिले. तसेच पोलीस दलाच्या प्रमुख अडचणी थेट मुख्यमंत्र्यांसमोर मांडून त्या तातडीने मार्गी लावू,असा शब्दही सदानंद दाते यांनी यावेळी दिला. या दौऱ्यामुळे बीड पोलीस दलात नवीन ऊर्जा निर्माण होऊन , सर्वसामान्य बीडकरांमध्ये सुरक्षेची भावना अधिक दृढ झाल्याची चर्चा आहे.

सखोल तपासाचे आदेश

​जिल्ह्यातील कायदा व सुव्यवस्था अधिक मजबूत करण्यासाठी गुन्हे सिद्धीचे प्रमाण वाढवण्यावर भर देण्याच्या सूचना डीजीपींनी दिल्या. गाजलेल्या घुले हत्या प्रकरणासह इतर संवेदनशील प्रकरणांच्या सध्याच्या परिस्थितीचा आढावा घेतानाच सर्व गुन्ह्याचा सखोल तपास करा, असे आदेश त्यांनी बीड पोलीसांना दिले.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com