Amit Shah Mumbai : ‘सुप्रीम कोर्टातील युक्तिवादामुळे अमित शाह पळत-पळत महाराष्ट्रात’; हर्षवर्धन सपकाळांचा बोचरा टोला

Harshwardhan Sapkal targets Amit Shah over his Mumbai visit and Supreme Court's Shiv Sena case proceedings : अमित शाह यांच्या मुंबई दौऱ्यावरून काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ आक्रमक; शिवसेना-धनुष्यबाण प्रकरण, मोदी-शिंदे गटाच्या खासदारांची भेट आणि परिसीमनावरून भाजपवर निशाणा
Amit Shah
Amit ShahSarkarnama
Published on
Updated on

Amit Shah Mumbai visit Harshwardhan Sapkal criticism : भाजपचे ज्येष्ठ नेते आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह आज मुंबई दौऱ्यावर असताना काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी त्यांच्यावर जोरदार निशाणा साधला.

शिवसेना आणि ‘धनुष्यबाण’ चिन्हाच्या वादावर सर्वोच्च न्यायालयात झालेल्या सुनावणीचा संदर्भ देत, ‘सुप्रीम कोर्टात जो जबरदस्त युक्तिवाद झाला, त्याअनुषंगाने अमित शाह यांना महाराष्ट्रात पळत-पळत यावे लागले आहे,’ असा टोला सपकाळ यांनी लगावला.

शिवसेना पक्ष आणि ‘धनुष्यबाण’ चिन्हाच्या वादावर उद्धव ठाकरे यांच्या बाजूने ज्येष्ठ वकील कपिल सिब्बल यांनी सर्वोच्च न्यायालयात युक्तिवाद केला आहे. केवळ आमदारांच्या संख्याबळावर मूळ पक्ष ठरवता येत नाही, तसेच निवडणूक आयोगाने पुरेशा पुराव्यांशिवाय एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेला मान्यता दिली आणि अधिकाराचा गैरवापर केला, असा दावा सिब्बल यांनी केल्याचे सपकाळ यांनी नमूद केले. याच पार्श्वभूमीवर अमित शाह (Amit Shah) यांच्या आजच्या मुंबई दौऱ्याचा धागा पकडत सपकाळ यांनी भाजपवर टीका केली.

एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेतील (Shivsena) सहा खासदारांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतल्याचा संदर्भ देत सपकाळ यांनी या भेटीवरही प्रश्न उपस्थित केले. ‘डरो मत, नैतिकता से डरो मत, संविधान से डरो मत, अजून पक्ष, खासदार फोडता येतात,’ असा या भेटीमागचा संदेश असल्याचा आरोप त्यांनी केला.

Amit Shah
Jyoti Waghmare Kutumbpramukh remark : उद्धव ठाकरेंनंतर आता मोदींसाठीही 'कुटुंबप्रमुख' शब्द; ज्योती वाघमारे यांच्या वक्तव्याची चर्चा

सर्वोच्च न्यायालयाने केलेल्या निरीक्षणांमुळे संबंधितांची झोप उडाली असून, खासदारांची पंतप्रधानांसोबतची भेट ही ‘उपचाराचा भाग’ होती, असा दावा सपकाळ यांनी केला. या भेटीला शिष्टाचाराचे स्वरूप नव्हते, असेही ते म्हणाले. ‘मूळ धनुष्यबाण हा बाळासाहेब ठाकरे यांचाच आहे. तो उद्धव ठाकरे यांनाच मिळाला पाहिजे,’ अशी भूमिका सपकाळ यांनी मांडली.परिसीमनावरूनही भाजपला लक्ष्य

Amit Shah
Third Mumbai Project : ‘तिसरी मुंबई’ विरोधात शेतकरी आक्रमक; 25 हजार हरकतींचा दावा, 15 ऑगस्टला कोकण भवनासमोर उपोषणाचा इशारा

आगामी काळात परिसीमन विधेयक संसदेत मांडण्याचा प्रयत्न होणार असल्याचे सांगत सपकाळ यांनी भाजपवर आणखी एक निशाणा साधला. भाजप या मुद्द्यावर घाई करत असल्याचा आरोप त्यांनी केला. देशातील राजकीय वारे बदलत असल्याचे भाजपच्या लक्षात आले असून, त्यामुळे पक्ष सावध झाला आहे, असा दावा सपकाळ यांनी केला. ‘पार्लमेंटमधून पळ काढणे ही त्याची पावती आहे,’ अशी टीकाही त्यांनी केली.

मोहन भागवत यांच्यावर टीका

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांनी Gen-Z तरुणांशी साधलेल्या संवादावरूनही सपकाळ यांनी संघाला लक्ष्य केले. ‘Gen-Zच्या प्रश्नांची उत्तरे दिली म्हणजे प्रश्न विचारणे सुरू झाले आहे. प्रश्न विचारू नका, ही राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची भूमिका आहे. हा त्यांचा पराभव आहे,’ असे सपकाळ म्हणाले. संघाच्या स्थापनेला 100 वर्षे पूर्ण होत असल्याच्या पार्श्वभूमीवरही त्यांनी टीका करत, ‘आता संघाची शंभरी भरलेली आहे,’ असा टोला लगावला.

भाजपवर जोरदार हल्लाबोल

दरम्यान, सपकाळ यांनी उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्याबाबत केलेल्या ‘गूंगी गुडिया’ या वक्तव्यापासून ते मोहन भागवत यांच्या Gen-Z संवादापर्यंत विविध राजकीय मुद्द्यांवर माध्यमांशी संवाद साधला. याच पत्रकार परिषदेत अमित शाह यांच्या मुंबई दौऱ्यावरून त्यांनी काँग्रेसची भूमिका मांडत भाजपवर जोरदार हल्लाबोल केला.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com