

Amol Khatal threatening audio : एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे संगमनेरमधील आमदार अमोल खताळ यांची पुन्हा ऑडिओ क्लिपला व्हायरल झाली आहे. आमदार खताळ हे संगमनेरमधील टोल नाक्यावरील व्यवस्थापकावर चिडल्याचे ऑडिओ क्लिप ऐकल्यावर लक्षात येते. पत्नीच्या वाहनाचा टोल घेतल्यानं अमोल खताळ चिडल्याचं सांगितलं जात आहे.
यावर 'समोर ये, तुला सांगतो. तुला आमदार कळतो का? टोल नाका कोणाच्या हिमंतीवर चालवतो हेच पाहतो, असा धमकीवजा इशारा आमदार खताळ यांनी दिल्याचं ऑडिओ क्लिप ऐकल्यावर कळते. दरम्यान, अमोल खताळ यांनी, ही क्लिप मार्च-एप्रिलमधली आहे. जुनी आहे. निवडणुकीत या क्लिप बाहेर काढून, त्यात मोड-तोड करून, व्हायरल करण्यात आली आहे. यामागे कोण आहे, याची काहीसी कल्पना आहे. परंतु पोलिसांकडे कायदेशीर कारवाईसाठी तक्रार करणार आहे, असे 'सरकारनामा'शी बोलताना सांगितले.
शिवसेनेचे आमदार अमोल खताळ यांनी ऑडिओ क्लिप समाज माध्यमांवर (Social Media) व्हायरल झाली आहे. संगमनेरमधील टोल नाका व्यवस्थापकाला त्यांनी सुनावल्याचं या ऑडिओ क्लिपवरून समोर येत आहे. त्यांच्या पत्नीच्या वाहनाचा टोल घेतल्याने आमदार खताळ संतापले आहे.
शिवसेना (Shivsena) आमदार अमोल खताळ यांच्या आवाजात ऑडिओ क्लिपमध्ये, उद्या तुमचा अन् तुमच्या कंपनीचा माणूस, ज्याने टोल चालवायला घेतला आहे, त्याने माझ्याकडे यायचं आहे. नाहीतर उद्याच टोलनाका बंद होणार आहे, सायंकाळी. तुम्हाला सांगून देखील तुम्ही आमच्या गाड्याचं टोल कापता. एवढे माजेला का तुम्ही? कारणं सांगू नका मला. बाकीचे बोलबच्चन नको करू. लय वेळा सांगितलं आहे. पण तुम्ही जास्त शहाणे झाले आहे. कसा टोल चालवता तेच पाहतो, थांबा. कोण आहे तुमचा मालक, त्याला मला अर्धा तासाच फोन करायला लाव. तिथं नीट सांगितलं नाही का? असा प्रश्न केल्यावर समोरून टोल कशामुळे काटला हे पाहतो, उद्याच पाहतो साहेब, असे कंपनीचा व्यवस्थापन म्हणताना ऐकायला मिळतो.
यावर आता लगेच टोलनाक्यावर ये, उद्या येतो म्हणजे, असे अमोल खताळ यांच्या आवाजात बोलून, तु आताच टोलनाक्यावर ये, का 'पीडी'शी बोलू? इथूनच सांगतो या तीन महिन्यात तिसरी-चौथी घटना आहे. तुम्हाला लय खाज असेल ना, तुम्ही टोल नाका कोणाच्या हिंमतीवर चालवून दाखवा, असे वरच्या आवाजात सुनावलं आहे. यावर समोरचा मॅनेजर म्हणून आमची काय चुकी आहे? असा प्रश्न करताच, काय चुकी आहे म्हणजे, समोर ये, सांगतो तुला, काय चुकी आहे. तुला आमदार कळतो का? आमदार म्हणजे कोण आहे, असे खताळ यांच्या आवाजात सुनावल्याचं ऑडिओ क्लिपमध्ये ऐकायला येतं.
अमोल खताळ यांच्याशी संपर्क साधला असताना, त्यांनी ऑडिओ क्लिपमागील राजकारण सांगून, याबाबत पोलिसांकडे कायदेशीर कारवाईसाठी तक्रार करणार असल्याचं म्हटलं आहे. आमदार अमोल खताळ म्हणाले, "निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर समोरच्यांना पराभव दिसत होतो. त्यांनी या ऑडिओ क्लिपमध्ये मोडतोड करून, व्हायरल केला आहे. पण त्याकडे जास्त लक्ष देत नाही. ऑडिओ क्लिपमध्ये मोड-तोड करून, स्वतःची प्रतिमा स्वच्छ असल्याचं सांगायचं. अन् दुसर्याची प्रतिमा अस्वच्छ करण्याचा हा प्रकार आहे." संगमनेरच्या टोलनाक्यावरून बरेच आंदोलन मी केले आहेत. टोलनाका चालक अन् पदवधीर आमदाराचं काहीतरी कनेक्शन असणार आहे. त्याशिवाय या गोष्टी होत नाहीत, असा गंभीर आरोपही खताळ यांनी केला.
'तिथं व्यापार्यांना मारहाण झाली होती. त्यावेळी मी तिथं गेलो होतो. पण पाॅलिसीनुसार स्थानिक 20 किलोमीटरच्या वाहनांकडून टोल घेत नाहीत. संगमनेर वेठीस धरलं जात आहे. माझ्या कुटुंबाची गाडी गेल्यावर तिथं टोल कापला म्हणून विचारणा केली. आवांतर एडिट करून घेतलं आहे. टोलनाक्याची ही क्लिप फेब्रुवारी-मार्च महिन्यात असेल. आज ही का बाहेर काढली. या ऑडिओ क्लिपविषयी पोलिसांकडे तक्रार देणार आहे. ऑडिओ क्लिपमध्ये छेडछाड केली. गोपनीय बोलणं देखील व्हायरल केलं आहे. माझे कार्यकर्ते पोलिसांकडे तक्रार अर्ज देणार आहे,' असे आमदार खताळ यांनी म्हटले आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.