Beed News : बीड जिल्ह्यातील मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येनंतर महिन्याभरात आणखी एका सरपंचाचा मृत्यू झाला आहे. अभिमन्यू क्षीरसागर असे मृत्यू झालेल्या सरपंचाचे नाव असून राखेची वाहतूक करणाऱ्या टिप्परने धडक दिल्याने त्यांचा अपघाती मृत्यू झाला असल्याची माहिती समोर येत आहे. ते सौंदाना गावचे सरपंच होते. मिरवट फाट्यावर हा भीषण अपघात झाला. हा अपघात की घात आहे, याचा तपास पोलीस करीत असतानाच या सरपंचाच्या मृत्यूविषयी भाजपचे आमदार सुरेश धस यांनी संशय व्यक्त करीत सौंदाना येथील 'त्या' सरपंचाचा घातपात की अपघात सिद्ध झाले नसल्याचे म्हटले आहे.
परळी येथील थर्मल स्टेशनमधून जाणारे राखेचे टिप्पर अजून बंद झाले नाहीत. हे टिप्पर अद्याप सुरूच असून याला प्रशासन जबाबदार आहे. आजही अवैध राखेची वाहतूक सुरु असून यामुळेच सौंदाना गावच्या एका सरपंचाचा मृत्यू झाला आहे. हा प्रकार घातपात आहे की अपघात सिद्ध झाले नाही, असा आरोप भाजप (Bjp)आमदार सुरेश धस यांनी केला.
परळीच्या सौंदाना गावातील सरपंच अभिमन्यू क्षीरसागर यांच्याबरोबर शनिवारी रात्री नऊ वाजून वीस मिनिटांनी ही घटना घडली. बोगस आणि अवैध राखेची लूट परळी भागात सुरू आहे, याचा करिश्मा बघा. रात्री झालेली घटना घातपात की, अपघात याचा शोध अजून लागायचा आहे, अशी प्रतिक्रिया भाजप आमदार सुरेश धस यांनी दिली.
परळी विभागाची चर्चा महाराष्ट्रात सुरू असून सुद्धा राखेचे टिप्पर बंद नाहीत. या अवैद्य व्यवसायांना परळीचे पोलिस आणि थर्मल पॉवरचे अधिकारी आणि कर्मचारी याला जबाबदार आहेरविवारी प्रसार माध्यमांशी बोलताना सुरेश धस (Suresh Dhas) यांनी हा आरोप केला आहे.
त्यासोबतच सरपंच संतोष देशमुख हत्ये प्रकरणी अटकेत असलेल्या वाल्मिक कराड यांनी पाच हजार लोकांकडून प्रत्येकी आठ लाख हजार घेतल्याचे पुढे आले आहे. वाल्मिक कराडने पैसे घेतल्याचा आरोप शेतकऱ्यांनी केला आहे. या सर्व घटनेला पोलीस अधिकारी व प्रशासन जबाबदार असल्याचा आरोप धस यांनी केला आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.