Maratha Agitation : मराठा आरक्षणासाठी धनगर समाजाच्या सरपंचाने दिला राजीनामा; OBC बांधवांनीही केले मुंडन!

Maratha Reservation : मनोज जरांगे पाटील यांनी सुरू केलेल्या उपोषणाला बीड जिल्ह्यात मोठा पाठिंबा मिळत आहे.
Maratha Agitation : मराठा आरक्षणासाठी धनगर समाजाच्या सरपंचाने दिला राजीनामा; OBC बांधवांनीही केले मुंडन!
sarkarnama
Published on
Updated on

Beed Maratha Reservation News : मराठा समाजाला सरसकट कुणबी प्रमाणपत्र व आरक्षण मिळावे, यासाठी मनोज जरांगे पाटील यांनी सुरू केलेल्या उपोषणाला बीड जिल्ह्यात मोठा पाठिंबा मिळत आहे. या मागणीसाठी धनगर समाजाच्या सरपंचांनी आपल्या पदाचा राजीनामा गटविकास अधिकाऱ्यांकडे दिला आहे. तसेच, याच मागणीसाठी ओबीसी समाज बांधवांनी मुंडन करून सरकारचा निषेधही केला.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

Maratha Agitation : मराठा आरक्षणासाठी धनगर समाजाच्या सरपंचाने दिला राजीनामा; OBC बांधवांनीही केले मुंडन!
Maratha Reservation : रोहितदादांनी संघर्ष यात्रा थांबवली, अजितदादांनी गाळपाला जाणे टाळले; आता शरद पवार त्याला जाणार का?

जिल्ह्यात मराठा आरक्षण आंदोलनाची धग वाढली आहे. आंदोलनाला विविध घटकांचा पाठिंबा मिळत आहे. विविध ठिकाणी साखळी उपोषणांमध्ये समाज बांधवांसह महिला, विद्यार्थी मोठ्या संख्येने सहभागी होत आहेत. आता या मागणीला इतर समाजांतूनदेखील पाठिंबा मिळत असल्याचे चित्र आहे.

परिसरातील आनंदवाडी ग्रामपंचायतीचे सरपंच मोहन भगवान देवकते यांनी आपल्या पदाचा राजीनामा बीडचे गटविकास अधिकारी सचिन सानप यांच्याकडे सादर केला. देवकते धनगर समाजाचे आहेत. त्यांनी सखूबाई खरसाडे, बालाजी पवार यांच्या समक्ष नमुना नंबर एक या राजीनामापत्रावर आपल्या पदाचा राजीनामा दिला.

याशिवाय, रायमोह (ता. शिरूर कासार) येथे ओबीसी समाज बांधवांनी मुंडन करून मराठा आरक्षणाच्या मागणीला पाठिंबा व सरकारचा निषेध केला.

(Edited by - Mayur Ratanaparkhe)

Maratha Agitation : मराठा आरक्षणासाठी धनगर समाजाच्या सरपंचाने दिला राजीनामा; OBC बांधवांनीही केले मुंडन!
Karmala news : करमाळ्यात मराठा आक्रमक; मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री अन्‌ आरोग्य मंत्र्यांच्या फोटोला काळे फासले

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com