BJP News : पाथरीत भाजप नेत्यांकडून गेम, शेवटपर्यंत एबी फॉर्म न दिल्याने नगराध्यक्षपदासाठी इच्छूकाने भरला अपक्ष अर्ज!

BJP Candidate Submit His Nomination Without AB Form : सर्व इच्छुक उमेदवार व पदाधिकारी पालिका कार्यालयात एबी फॉर्मची प्रतीक्षा करत होते. काही पदाधिकारी वरिष्ठ नेत्यांना विचारत असता आम्ही रस्त्यात आहोत थोड्याच वेळात येऊ असे सांगत होते.
Pathri Local Body Election 2025 News
Pathri Local Body Election 2025 NewsSarkarnama
Published on
Updated on
Summary
  • पाथरी नगरपालिकेत स्थानिक भाजप नेत्यांनी एबी फॉर्म न दिल्याने नगराध्यक्षपदाचे इच्छूक उमेदवाराने अपक्ष म्हणून उमेदवारी दाखल केली.

  • भाजपमधील अंतर्गत संघर्ष व ‘गेम’मुळे हा निर्णय घेतल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे.

  • या घटनेमुळे पाथरीतील राजकीय समीकरणे बदलण्याची आणि निवडणुकीत अनपेक्षित कलाटणी येण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

Pathri Local Body Election News : नगरपरिषद, नगरपंचायत निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा आज शेवटचा दवस होता. अनेकांना पक्षाने तुम्हालाच उमेदवारी म्हणत ताटकळत ठेवले. अगदी नगराध्यक्षपदाच्या उमेदवारालाही आम्ही रस्त्यात आहोत, एबी फॉर्म घेऊन निघालोच आहोत, अशी बतावणी नेते करत होते. अखेरच्या क्षणी एका भाजप इच्छूकाने नगराध्यक्ष पदासाठी अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल करत स्थानिक नेत्यांवर आगपाखड केली.तर अनेक इच्छूकांनी उमेदवारी अर्ज फाडून फेकत संताप व्यक्त केला.

उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या शेवटच्या क्षणापर्यंत सोमवारी (ता.17) एबी फॉर्मची वाट पाहणाऱ्या भाजपच्या नगराध्यक्ष व नगरसेवकपदाच्या उमेदवारांना अपक्ष म्हणून उमेदवारी अर्ज दाखल करावा लागला. तर काहींनी उमेदवारी अर्ज फाडून टाकत संताप व्यक्त केला. परभणी जिल्ह्यातील पाथरी नगरपालिकेचे नगराध्यक्षपद सर्वसाधारण प्रवर्गासाठी सुटले आहे. पक्षाने एकाचवेळी अनेक इच्छूकांना गाजर दिल्यामुळे नेत्यांवर खोटं बोलण्याची वेळ आल्याचे दिसून आले.

प्रमुख पक्षाकडून नगराध्यक्षपदासाठी मुस्लिम उमेदवार देण्यात आल्याने गेल्या चार-पाच दिवसांत भाजपच्या वतीने हिंदू उमेदवार देण्याच्या दृष्टीने बैठका घेऊन उमेदवाराची चाचपणीही करण्यात आली. मात्र शेवटच्या दिवशी अर्ज दाखल करताना अर्जासोबत पक्षाचा अधिकृत उमेदवार असल्याचा एबी फॉर्म दाखल करणे आवश्यक असल्याने भाजपच्या उमेदवारांनी शेवटच्या क्षणापर्यंत एबी फॉर्मची प्रतीक्षा करावी लागली.

Pathri Local Body Election 2025 News
Pathri AMC News : बाबाजानी दुर्राणी यांचा पाथरीत अजित पवारांना धक्का; शिवसेनेसोबत हातमिळवणी करत सभपतीवर अविश्वास!

सकाळी अकरा वाजेपासून पदाधिकारी जिल्ह्यातील वरिष्ठ नेत्यांच्या संपर्कात राहून अर्ज दाखल करण्याच्या तयारीत होते, तर सर्व इच्छुक उमेदवार व पदाधिकारी पालिका कार्यालयात एबी फॉर्मची प्रतीक्षा करत होते. काही पदाधिकारी वरिष्ठ नेत्यांना विचारत असता आम्ही रस्त्यात आहोत थोड्याच वेळात येऊ असे सांगत होते. परंतु एबी फॉर्मच्या प्रतीक्षेतील नगराध्यक्षपदाच्या उमेदवाराने शेवटच्या क्षणी अपक्ष म्हणून अर्ज दाखल केला.

Pathri Local Body Election 2025 News
Parbhani News : परभणी जिल्ह्यात स्वार्थी राजकारण, गटबाजीचा खेळ सुरूच; बोर्डीकर, भांबळे, जाधव, वरपूडकरांची दिशा ठरेना!

तर काही नगरसेवकपदाच्या उमेदवारांनी आधीच भरून ठेवलेला भाजपचे अर्ज एबी फॉर्मविनाच दाखल केले. एकाने इतर पक्षाकडून उमेदवारी अर्ज भरला तर संतापलेल्या इच्छुकांसह राज्य प्रवक्ते डॉ. उमेश देशमुख, माजी जिल्हाध्यक्ष प्रा.पी.डी.पाटील व पदाधिकरी निघून गेले. या प्रकारामुळे स्वबळावर लढण्याची भाजपची घोषणा हवेतच विरली आहे.

FAQs

1. एबी फॉर्म म्हणजे काय?
एबी फॉर्म म्हणजे पक्षाकडून अधिकृत उमेदवारीची खात्री देणारा दस्तऐवज, जो पक्षाच्या अंतिम मान्यतेनंतर दिला जातो.

2. भाजपने एबी फॉर्म का दिला नाही?
स्थानिक राजकीय समीकरणे, अंतर्गत गटबाजी किंवा अन्य इच्छुकांना प्राधान्य देण्यासाठी फॉर्म न देण्यात आला असल्याची चर्चा आहे.

3. उमेदवाराने अपक्ष अर्ज का भरला?
पक्षाकडून तिकीट न मिळाल्यानेही निवडणूक लढण्याचा निर्णय घेतला म्हणून उमेदवाराने अपक्ष मार्ग निवडला.

4. याचा निवडणुकीवर काय परिणाम होऊ शकतो?
बंडखोर अपक्ष उमेदवारामुळे भाजपची मतविभाजन होण्याची दाट शक्यता आहे.

5. पक्षाकडून पुढे काही कारवाई होऊ शकते का?
पक्ष शिस्तभंगाची कारवाई करू शकतो किंवा परिस्थितीनुसार चर्चा होण्याचीही शक्यता आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com