पाथरी नगर परिषद निवडणुकीत भाजपच्या अधिकृत उमेदवारांनाच AB फॉर्म न दिल्याने मोठा गोंधळ आणि नाराजी निर्माण झाली.
स्थानिक पातळीवरील गटबाजी आणि अंतर्गत विरोधामुळे काही उमेदवारांना फॉर्म न देण्याची शक्यता असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे.
घटनेची चौकशी करण्यासाठी भाजपने विशेष निरीक्षक पाथरीत पाठवला असून संपूर्ण प्रकरण गंभीरतेने घेतले जात आहे.
Pathri Municipal Council Election : पाथरीमध्ये स्वबळावर लढण्याची भाषा करणाऱ्या भाजप जिल्हाध्यक्ष सुरेश भुमरे यांनी ऐनवेळी भाजप इच्छूकांना एबी फार्मसाठी ताटकळत ठेवले. अखेर नगराध्यक्ष पदाच्या उमेदवारालाही अपक्ष उमेदवारी दाखल करावी लागली होती. तर काहींनी रागाच्या भरात अर्जच फाडून टाकले होते. आता हे प्रकरण चांगलेच तापले असून स्थानिक भाजप पदाधिकाऱ्यांनी जिल्हाध्यक्ष भुमरे यांची चौकशी करून त्यांच्यावर कठोर कारवाईची मागणी केली आहे.
स्वबळावर निवडणूक लढवायची भूमिका घेणाऱ्या जिल्हाध्यक्ष सुरेश भुमरे यांनी ऐनवेळी एबी फार्म का दिले नाहीत? ही भूमिका त्यांचीच होती की, त्यामागे आणखी कोण होते? याची पक्षश्रेष्ठींनी चौकशी करावी, तसेच दोषींवर कडक कारवाई करावी, अशी मागणी पाथरीतील भाजपा पदाधिकाऱ्यांनी पत्रकार परिषद घेत केली आहे. भाजपचे राज्य परिषदेचे सदस्य शिवराज नाईक यांच्या कार्यालयात हा संवाद झाला.
जिल्हा उपाध्यक्ष सुभाष आंबट, माजी जिल्हाध्यक्ष प्रा.पी.डी. पाटील, माजी नगरसेवक डॉ. राजेंद्र चौधरी, डॉ. राठी, शिवराज नाईक, शहराध्यक्ष मायकल दहे, अनिल पोपळघट, ऍड. श्रीपाद कोंत, संतोष जोगदंड हे यावेळी हजर होते. शहराध्यक्ष मायकल दहे यांनी भाजपा नगर पालिका निवडणुकीतुन बाहेर का राहिला? हे सांगताना जिल्हाध्यक्षांवर गंभीर आरोप केले.
तर प्रा.पी.डी. पाटील यांनी भाजपाची आजच्या एवढी ताकद नसतानाही त्यावेळी नगरसेवक, जिल्हा परिषद सदस्य, पंचायत समिती सदस्य निवडून आले होते. आता तर पूर्ण ताकद असतांना पक्षाकडून पाथरीत निवडणुकीची तयारी करूनही पक्षाकडून एबी फार्म वेळेवर दिले गेले नसल्याचा आरोप केला. एबी फार्म का दिले नाहीत? यामागे कोणाचे डोके होते? याची सविस्तर चौकशी झाली पाहिजे.
पाथरीतील एबी फार्म प्रकरणात पदाधिकाऱ्यांची भूमिका जाणून घेण्यासाठी निरीक्षक म्हणून आलेले भाजपा नेते प्रमोद वाकोडकर यांच्या समोर भाजपा पदाधिकारी जिल्हाध्यक्षावर कारवाई करण्याची मागणी करत होते. त्यांना याबाबत विचारले असता काय झाले आहे? हेच जाणून घेण्यासाठी आपण या ठिकाणी आलो असल्याचे त्यांनी सांगितले.
भाजपच्या अधिकृत उमेदवारांनाच AB फॉर्म न दिल्याने पक्ष कार्यकर्त्यांमध्ये असंतोष निर्माण झाला.
स्थानिक गटबाजी, अंतर्गत मतभेद आणि काही नेत्यांचा प्रभाव यामागील कारणे असल्याची चर्चा आहे.
अनेकांनी नाराजी व्यक्त केली असून काहींनी याला अन्यायकारक निर्णय म्हटले आहे.
पक्षाने तत्काळ चौकशी आदेश देत पाथरीत निरीक्षक पाठवला आहे.
भाजपचे मत विकेंद्रीत होण्याची भीती व्यक्त होत असून विरोधकांना फायदा होऊ शकतो.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.