Latur District : कासारसिरसी तालुका व्हावा आणि येथे अप्पर तहसिल कार्यालय सुरु करावे, या मागणीसाठी आमदार अभिमन्यू पवार यांनी निलंग्यात येवून गावकऱ्यांना सोबत घेत मोर्चा काढला. उपविभागीय कार्यालयावर मोठ्या संख्येने मोर्चा नेऊन त्यांनी उपविभागीय अधिकाऱ्यांना निवेदन दिले. (Abhimanyu Pawar News) सत्तेचे व प्रशासकीय कामांचे विकेंद्रीकरण झाल्याशिवाय सर्वसामान्यांना न्याय मिळणार नाही, असे मत व्यक्त करतांनाच आपण कुणाच्या मेहेरबानीवर आमदार झालेलो नाही, असा टोला माजी मंत्री संभाजी पाटील निलंगेकर यांना नाव न घेता लगावला.
गेल्या काही महिन्यांपासून निलंगा आणि औसा तालुक्यात कासारसिरशी येथे नव्याने मंजुर करण्यात आलेल्या आणि त्यात ६३ गावांचा समावेश केल्याचा वाद चांगलाच गाजतोय. औसाचे आमदार अभिमन्यू पवार (Abhimanyu Pawar) यांनी २०१९ च्या विधानसभा निवडणुकीत कासरसिरसी तालुका करण्याचे आश्वासन दिले होते. (Latur) मतदारांनी निवडून दिल्यानंतर आता त्यांनी दिलेला शब्द पुर्ण करण्यासाठी पवार यांनी हालचाली सुरू केल्या आहेत. यासाठी त्यांनी आपले राजकीय वजन वापरून कासारसिरसी येथे अप्पर तहसिल कार्यालयाला मंजुरी मिळवली.
तसेच निलंगा तालुक्यातील ६३ गावांचा समावेश देखील या कार्यालयाअंतर्गत करुन घेतला. तेव्हापासून औसा विरुद्ध निलंगा असा वादा सुरू झाला आहे. माजी मंत्री आमदार संभाजी पाटील निलंगेकर (Sambhaji Patil Nilangekar) हे पडद्यामागून सुत्र हलवत पवारांचा डाव हाणून पाडण्याचा प्रयत्न करत आहेत. तर निलंगेकरांची प्रत्येक खेळी त्यांच्यावर उलटवण्यासाठी पवार देखील मैदानात उतरले आहेत. आज निलंगा येथे येवून मोर्चा काढत अभिमन्यू पवार यांनी संभाजी पाटील यांना त्यांच्याच मतदारसंघात आव्हान दिल्याची चर्चा या निमित्ताने सुरू आहे.
उपविभागीय अधिकाऱ्यांना निवेदन दिल्यानंतर पत्रकारांशी बोलतांना पवार म्हणाले, सत्तेचे व प्रशासकीय कार्याचे विकेंद्रीकरण झाले तरच सर्वसामान्यांच्या कामांना न्याय व गती मिळेल. प्रशासकीय कामात सुसूत्रता येईल. औसा मतदार संघाचा मी लोकप्रतिनिधी असून कुणाच्याही मेहेरबानीवर मी आमदार म्हणून निवडून आलेलो नाही. मी जनतेच्या मनातील आमदार आहे, २०१९ ला मला निवडणुकीत पाडण्याचा अनेकांनी प्रयत्न केला तरी निवडून आलो. २०२४ ला पण मीच उमेदवार आहे, सध्या आमदार म्हणून मला जे अधिकार आहेत त्याचा वापर करून कासारसिरसी भागातील विकास साधण्याचा प्रयत्न करत आहे.
त्याचाच भाग म्हणून जनतेच्या सोयीसाठी अप्पर तहसील कार्यालय शासनाकडे पाठपुरावा करून मंजूर करून आणले. पण दुर्दैवाने या घटनेला वेगळेच स्वरूप देऊन तालुक्यातील वातावरण खराब करण्यात येत, असल्याचा आरोप पवार यांनी यावेळी केला. माझा पुतळा जाळून कोणाला असुरी आनंद मिळत असेल, तर माझी पुतळे जाळायला काहीच हरकत नाही. कासारसिरसी परिसरातील भागाचा गेल्या अनेक वर्षांपासून विकास झाला नाही. त्या विकासाचा अनुशेष भरून काढण्यासाठी ५७ कोटीचा निधी दिला आहे. आगामी काळात पंचायत समिती, कृषी अधिकारी कार्यालय, निबंधक कार्यालय असे प्रशासकीय सर्वच आॅफिसेस कासारसिरसी येथे कार्यान्वित करणार असल्याची ग्वाही देखील पवार यांनी दिली.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.