Sambhaji Bhide News : भिडे संभाजीनगरात आलेच, तर परत कसे जातात बघू ? इशाऱ्यानंतर परवानगी नाकारली..

Maharashtra : महाविकास आघाडीच्या शिष्टमंडळाने आज पोलीस आयुक्तांची भेट घेतली.
Sambhaji Bhide News
Sambhaji Bhide NewsSarkarnama
Published on
Updated on

Marathwada : महात्मा गांधी, महात्मा ज्योतीबा फुले यांच्यासह शिर्डीच्या साईबाबांबद्दल वादग्रस्त विधान केल्यामुळे चर्चेत आलेल्या संभाजी भिडे यांच्या उद्या (ता.१) रोजी होणाऱ्या कार्यक्रमाला पोलिसांनी परवानगी नाकारली आहे. (Sambhaji Bhide News) भिडे गुरूजी शहरात आलेच, तर ते परत कसे जातील हे बघूच, असा इशारा शिवसेनेने दिला होता.छत्रपती संभाजीगनर शहरातील अग्रसेन भवन येथे भिंडे यांच्या उपस्थितीत कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.

Sambhaji Bhide News
Chandrakant Khaire On Shirsat News : मी काय बोललो होतो, शिरसाट काय सांगतायेत ? खैरेंनी सुनावले..

काॅंग्रेसने हा कार्यक्रम उधळून लावण्याचा इशारा दिला होता. दरम्यान, आयोजकांनी कार्यक्रमाच्या परवानगीसाठी पोलिसांकडे केलेला अर्ज फेटाळण्यात आला आहे. (Police) कायदा आणि सुव्यवस्थेचे कारण देत शहर पोलिसांनी ही परवानगी नाकारली आहे. (Sambhaji Bhide) या संदर्भातील पत्र देखील पोलिसांनी आयोजकांना पाठवले आहे.

संभाजी भिडे यांच्या वादग्रस्त विधानांमुळे राज्यातील वातावरण तापले आहे. या पार्श्वभूमीवर महाविकास आघाडीच्या शिष्टमंडळाने आज पोलीस आयुक्तांची भेट घेतली. (Aurangabad) यावेळी दिलेल्या निवेदनात भिडे यांना तात्काळ अटक करण्याची मागणी करतांनाच त्यांच्या कार्यक्रमाला परवानगी देऊ नये, अशी विनंती केली होती.

भिडेंच्या उद्याच्या कार्यक्रमाला परवानगी दिली तर महाविकास आघाडीतील सर्व घटक पक्षांच्या वतीने तो हाणून पाडू, असा इशारा देखील निवेदनात देण्यात आला . उद्या भिडे गुरुजी शहरात आलेच, तर ते परत कसे जातील हे बघूच, अशी धमकी देखील शिवसेनेच्या वतीने देण्यात आली आहे.

काँग्रेस, शिवसेना ठाकरे गट आणि राष्ट्रवादीच्या शिष्टमंडळाने निवेदन देऊन कार्यक्रम उधळण्याचा इशारा दिल्यानंतर पोलिसांनी देखील भिडे यांच्या कार्यक्रमाला परवानगी नाकारली आहे. राज्यभरात भिडे यांच्याविरोधात संतापाचे वातावरण असून त्यांच्यावर गुन्हे दाखल करून अटकेच्या मागणीसाठी आंदोलने केली जात आहेत.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com