Phulambri Assembly Election : फुलंब्रीचा आर्थिक कणा असलेला देवगिरी साखर कारखाना पुन्हा सुरू करणारच; अनुराधा चव्हाण

आपली लाडकी बहीण म्हणून मी अभिवचन देते की, फुलंब्री विधानसभा मतदार संघाचा आर्थिक कणा असलेला देवगिरी साखर कारखाना पुन्हा सुरू करणारच, अशी ग्वाही फुलंब्री विधानसभा मतदारसंघाच्या महायुतीच्या उमेदवार अनुराधा चव्हाण यांनी दिली.
Phulambri Assembly Election
Phulambri Assembly Election
Published on
Updated on

फुलंब्री : आपली लाडकी बहीण म्हणून मी अभिवचन देते की, फुलंब्री विधानसभा मतदार संघाचा आर्थिक कणा असलेला देवगिरी साखर कारखाना पुन्हा सुरू करणारच, अशी ग्वाही फुलंब्री विधानसभा मतदारसंघाच्या महायुतीच्या उमेदवार अनुराधा चव्हाण यांनी दिली. तसेच मक्का प्रोसेसिंग युनिट सुरू करून युवकांना रोजगार मिळवून देण्यावर आपला भर असणार आहे, असेही त्यांनी सांगितले.

प्रचार सभा आणि पदयात्रेतून अनुराधा चव्हाण मतदारांना साद घालत आहेत. जिल्हा परिषद व कृषी उत्पन्न बाजार समितीच्या माध्यमातून प्रत्येक समाज घटकापर्यंत विकास कार्य पोहोचवण्याचा प्रामाणिक प्रयत्न केला. त्या कामाची पावती म्हणून आज जनतेचे प्रचंड सहकार्य लाभत आहे. जनतेकडून मिळणारे हे प्रेम आणि आशीर्वाद कधीही विसरता न येण्यासारखे आहेत. तुमचा हा पाठिंबा असाच कायम राहू द्या व येणाऱ्या २० तारखेला साथ देऊन आपल्या सर्वांची सेवा करण्याची संधी द्या.

लहान मुलांचे उज्ज्वल भविष्य घडवण्यासाठी मतदारसंघांत पायाभूत सुविधा, आधुनिक शिक्षण, रोजगार उपलब्ध व्हावा यासाठी मी परिश्रम घेत आहे. मी धाडस केलंय, तुम्ही साथ द्यावी ही विनंती, असे आवाहन अनुराधा चव्हाण यांनी केले. सक्षम महिला म्हणजे सक्षम समाजया धोरणानुसार फुलंब्री मतदार संघातील मुली-महिलांसाठी विशेष उपक्रमांचे आयोजन करून महिला सक्षमीकरणावर आपण भर देणार आहोत.

महायुती सरकारने विविध कल्याणकारी योजनांच्या माध्यमातून समाजाच्या प्रत्येक घटकापर्यंत विकास कार्य पोहोचवले आहेत. तसेच महिला सबलीकरणासाठी विविध योजना राबविल्या जात आहेत. त्यासाठी सरकारला भक्कम पाठिंबा देणे आवश्यक आहे, असेही अनुराधा चव्हाण म्हणाल्या.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com