Dharashiv News : 'महाराष्ट्राची कुलस्वामिनी आई तुळजा भवानीला नमन करतो' असे मराठीतून म्हणत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी धाराशिव येथील भाषणाची सुरुवात केली. आई तुळजा भवानीने छत्रपती शिवाजी महाराजांना या ठिकाणी विजयी होण्याचे आशीर्वाद दिले होते आणि आज मी याच धर्तीवर जनता जनार्धन व आई तुळजा भवानीचे आशीर्वाद घेण्यासाठी मी येथे आलो आहे. शक्तिशाली भारतासाठी आशीर्वाद विकसित भारतासाठी हवा असल्याचे सांगत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी उपस्थिांची मने जिंकली.
या वेळी व्यासपीठावर आल्यानंतर पीएम मोदींचे (Narendra Modi) स्वागत तुळजा भवानी मातेची मूर्ती, कवड्याची माळ व त्रिशूल देऊन धाराशिवच्या महायुतीच्या उमेदवार अर्चना पाटील (Archana Patil) यांच्या हस्ते करण्यात आला. या वेळी मोदी यांनी गळ्यातही कवड्याची माळ घालून संपूर्ण भाषण केले.
यावेळी माजी केंद्रीय मंत्री प्रफुल्ल पटेल, भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, पालकमंत्री तानाजी सावंत यांच्यासह जिल्ह्यातील महायुतीचे सर्व आमदार उपस्थित होते. या वेळी मोदी यांनी भाषणातून वेगवेगळ्या मुद्द्यांना हात घातला. काँग्रेस सरकार भारताला वेगळ्या उंचीवर नेऊ शकतं का ? काँग्रेसची एक ओळख विश्वासघात अशी आहे. काँग्रेस साठ वर्षे सत्तेत होती, पण मराठवाड्याला पाणी दिले नाही.
मराठवाडा वॉटरग्रीडला कोणी अडवलं, जलयुक्त शिवार कोणी रोखलं. तुमचं पाणी त्यांनी अडवलं. पाणी समस्या टाळत नाही, मोदी हे समस्याला तोंड देतात. प्रत्येक घरात पाणी पोहोचवणे, शेतात पाणी पोहोचवणे मोदींचे मिशन आहे, असे सांगितले.
(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)
आता तर दहा वर्षे झाली, दहा वर्षांत जे पाण्यावर काम मोदींनी केलं, ते साठ वर्षांत काँग्रेस करू शकली नाही. ७५ लाख लोकांना पाच वर्षे पाणी दिले. काँग्रेसने ज्या सिंचन योजनेत अडवलं, त्याला मोदी पूर्ण करत आहे. मोदी नवीन सिंचन योजना सुरू करत आहे.
R