Narendra Modi Latest Speech : जनतेच्या संपत्तीवर नजर ठेवणाऱ्या 'कातिल पंजा'ला संधी देणार का? मोदींचा सवाल!

Lok Sabha Election 2024 : या वेळी त्यांनी काँग्रेसवर जोरदार हल्लाबोल केला. तसेच इंडिया आघाडी ही भारताला अस्थिरतेकडे आणि अराजकतेकडे घेऊन जाण्याचा प्रयत्न करत आहे, असा आरोपही केला.
Lok Sabha Election 2024 : Narendra Modi
Lok Sabha Election 2024 : Narendra ModiSarkarnama
Published on
Updated on

Latur News : लोकसभेच्या तिसऱ्या टप्प्यासाठी आता प्रचार शिगेला पोहाेचला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी महाराष्ट्रात सभांचा धडाका लावला आहे. मोदींनी आज लातूरमध्ये प्रचार सभा घेतली. या वेळी त्यांनी काँग्रेसवर जोरदार हल्लाबोल केला. तसेच इंडिया आघाडी ही भारताला अस्थिरतेकडे - अराजकतेकडे घेऊन जाण्याचा प्रयत्न करत आहे, असा आरोप केला. तसेच मागील दहा वर्षांत भारताचा जगात डंका वाजत असल्याचेही मोदींनी सांगितले. भाजप उमेदवार सुधाकर श्रृंगारे यांच्यासाठी घेतलेल्या प्रचार सभेत मोदी लातूरमध्ये बोलत होते. (Lok Sabha Election 2024)

नरेंद्र मोदी म्हणाले, "इंडिया आघाडीतील लोक देशाचे पंतप्रधानपद खंडाखंडाने देणार आहेत. प्रत्येक वर्षी नवा पंतप्रधान देण्याची त्यांची घोषणा आहे. भारताला खंडाखंडात विभागून टाकणारे लोक आता, भारत देशाच्या पंतप्रधानपदही हे खंडाखंडाने देणार आहेत. इंडिया आघाडीची ही देशाला लुटण्याची योजना आहे. अशा लोकांना तुम्ही संधी देऊ शकाल का? भारताला पुन्हा अस्थिरतेकडे घेऊन जाणार आहोत का?ठ असा सवाले मोदींनी केला.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

Lok Sabha Election 2024 : Narendra Modi
Dr. Kalyan Kale News: हर घर नल, पण जल कुठंय.. काळेंची मोदी सरकारवर टीका...

वारसा संपत्तीच्या कराच्या मुद्द्यावर निशाणा -

काँग्रेसची (Congress) नजर तुमच्या संपत्तीकडे आहे. मात्र तुमची कमाई काँग्रेसला लुटू देणार नाही. गरीब लोक बचत करतात ते काँग्रेसचं सरकार आल्यावर आपली संपत्ती पुढच्या पिढीला, आपल्या मुलांना संपत्ती देऊ शकणार नाही. काँग्रेसने वारशाने आलेल्या संपत्तीवर कर लावण्याचा विचार केला आहे. तुमच्या संपत्तीवर नजर ठेवणाऱ्या कातिल अशा पंजाला संधी द्यायला पाहिजे का? असंही मोदी म्हणाले.

Lok Sabha Election 2024 : Narendra Modi
Abhijeet Patil Way On the BJP : शरद पवारांना सोलापुरात पुन्हा धक्का; विश्वासू नेते अभिजित पाटील भाजपच्या वाटेवर?
Lok Sabha Election 2024 : Narendra Modi
Sharad Pawar NCP Manifesto 2024: गॅस 500 रुपयांपर्यंत करणार, शेतकऱ्यांसाठी स्वतंत्र आयोग; शरद पवारांच्या राष्ट्रवादीचा शपथनामा

भारताचा जगात डंका -

ही लोकसभेची निवडणूक भारताच्या स्वाभिमानाची निवडणूक आहे. दहा वर्षांपूर्वीचा भारतही तुम्ही पाहिलेला आहे. आता दहा वर्षांनतंरचा भारत पाहा. आज जगात भारताचा डंका वाजत आहे. भारताला नवी ओळख मिळत आहे. गगनयान, चंद्रयान अंतराळात यशस्वी उड्डाण करणाऱ्या भारताकडे जग पाहत आहे. कोट्यवधी जनतेचा जीव कोरोना संकट काळात वाचवणाऱ्या भारताकडे जग आदराने पाहत आहे, असेही मोदी (Narendra Modi) म्हणाले.

R

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com