Karnataka Election : अबब! कर्नाटकात तब्बल २५६ कोटींची रोकड जप्त; 'या' बड्या नेत्यांच्या वाहनांची तपासणी

Election Commission in Karnataka : सोने, चांदी, भेटवस्तूंसह अंमली पदार्थांचाही समावेश
D.K. Shivkumar's Helicopter Check
D.K. Shivkumar's Helicopter CheckSarkarnama
Published on
Updated on

Karnataka Assembly Election : कर्नाटक निवडणूक भाजप आणि काँग्रेस या प्रमुख पक्षातील बंडखोरांमुळे देशभरात चांगलीच गाजत आहे. दोन्ही पक्षातील बड्या नेत्यांनी उमेदवारी मिळण्यासाठी बंडखोरी केली. काही नेत्यांनी मतदारांनी माझी शेवटची निवडणूक आहे, असे भावनिक आवाहनही केले आहे. दरम्यान, या निवडणुकीत बेहिशेबी रकमही मोठ्या प्रमाणत जप्त करण्यात आली आहे. निवडणूक आयोगाच्या अधिकाऱ्यांनी भाजप-काँग्रेसच्या अनेक बड्या नेत्यांच्या हेलिकॉप्टर व वाहनांची तपासणी केली आहे. या कारवाईमुळेही सध्या कर्नाटक निवडणूक देशभरात चर्चेचा विषय बनल्याचे दिसून येत आहे.

D.K. Shivkumar's Helicopter Check
Bawankule News : `एकेरी'वरून बावनकुळे भडकले; म्हणाले, मोदी नावाच्या वादळात ठाकरे उडून जातील !

कर्नाटक विधानसभा निवडणूक (Karnataka Assembly Election) जाहीर होताच २९ मार्चपासून आदर्श आचारसंहिता लागू झाली आहे. कर्नाटकमध्ये विधानसभेसाठी १० मे रोजी मतदान होणार आहे. या दरम्यान निवडणूक प्रक्रिया सुरळीत पार पाडण्यासाठी निवडणूक आयोगाचे अधिकारी सतर्क होऊन काम करताना दिसून येत आहेत. या अधिकाऱ्यांनी भाजप आणि काँग्रेसमधील काही बड्या नेत्यांच्या वाहनांच्या तपासणीसह विविध ठिकाणी धडक कारवाई केल्या आहेत. अधिकाऱ्यांनी केलेल्या कारवाईत कोट्यवधी रुपयांच्या रोकडसह सोने, चांदी, भेटवस्तू आणि अंमली पदार्थ जप्त केले आहेत.

D.K. Shivkumar's Helicopter Check
Amol Kolhe Post On Book Day: 'त्या' पोस्टमधून अमोल कोल्हेंना काय सुचवायचं होतं?; स्वत:च केला मोठा खुलासा!

२९ मार्चपासून निवडणूक आयोगाच्या अधिकाऱ्यांनी २५३ कोटींची बेहिशेबी रोकड जप्त केली आहे. दरम्यान, निवडणूक आयोगाच्या अधिकाऱ्यांनी अनेक बड्या नेत्यांच्या वाहनांची तपासणी केली. विद्यमान मुख्यमंत्री बसवराज बोम्मई (Basavraj Bommai) यांच्या गाडीचीही अधिकाऱ्यांनी तपासणी केली. बोम्मई चिक्कबल्लापुर जिल्ह्यातील मंदिरात ३१ मार्च रोजी दर्शन घेण्यासाठी जात होते. त्यावेळी त्यांच्या वाहनाची तपासणी करण्यात आली होती.

निवडणूक आयोगाच्या अधिकाऱ्यांनी भाजपचे नेते आणि कर्नाटक निवडणूक प्रभारी के. अन्नामलाई (K. AnnaMalai) यांच्याही हेलिकॉप्टरची तपासणी केली. कापू विधानसभा मतदारसंघातील काँग्रेसचे उमेदवार विनय कुमार सोरके यांनी अन्नामलाई यांच्यावर रोख रक्कम नेल्याचा आरोप केला होता. त्यानंतर काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष डी. के. शिवकुमार (D.K. Shivakumar) आणि त्यांचे कुटुंबीय प्रवास करत असलेल्या खासगी हेलिकॉप्टरचीही तपासणी केली.

D.K. Shivkumar's Helicopter Check
Shivsena(UT)delegation Meet governor : महाराष्ट्र भूषण कार्यक्रमाची उच्चस्तरीय चौकशी करा, दोषींवर मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करा..

मुख्य निवडणूक अधिकारी (सीईओ) मनोज कुमार मीणा यांनी सांगितले की, "कर्नाटकमध्ये आचारसंहिता लागू झाल्यानंतर आतापर्यंत २५३ कोटी रुपये जप्त करण्यात आले आहे. मुधोल पोलिसांनी २८ किलो वजनाचे चांदीचे दागिने जप्त करण्यात आले आहे. निरानी यांच्या साखर कारखाना परिसरातून १.८२ कोटी रुपयांची रोकड, ३७.६४ लाख रुपयांच्या भेटवस्तू, ४५.२५ लाख रुपयांची औषधे जप्त करण्यात आली आहे. दरम्यान, उद्योग मंत्री निरानी पर यांच्यावर मतदारांना आमिष दाखवल्याचा आरोप असून त्यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे."

D.K. Shivkumar's Helicopter Check
Political News : सत्तासंघर्ष : ''सरकार कोसळणार नाही, 16 आमदार अपात्र झाले तरी धोका नाही''

आत्तापर्यंत निवडणूक आयोगाने केलेली कारवाई

८२.०५ कोटी रुपयांची रोकड जप्त

१९.६९ कोटी रुपयांच्या वस्तू

५६.६७ कोटी रुपयांची दारु

१६.५५ कोटी रुपयांचे अंमलीपदार्थ

७३.८ कोटी रुपयांचे सोने

४.२६ कोटी रुपयांची चांदी

(Edited by Sunil Dhumal)

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com