Dharashiv News : धाराशिवमधील 'तो' हल्ला राजकीय नव्हे, वैयक्तिक कारणातून ; खून नाही, दोन जखमी!

Dharashiv Police News : पोलिसांनी पत्रक जारू करून घटनेबाबत दिली माहिती .
Crime
CrimeSarkarnama

Dharashiv Loksabha Election 2024 : धाराशिव लोकसभा मतदारसंघातील पाटसांगवी (ता. भूम) या गावात मतदानाच्या दिवशी दुपारी 12 वाजेच्या सुमारास एकाचा भोसकून खून करण्यात आल्याचे वृत्त पसरले होते, मात्र पोलिसांनी खून झाला नसल्याचे म्हटले आहे. या हल्ल्याचे कारण राजकीय नसून वैयक्तिक असल्याचे पोलिसांनी जारी केलेल्या पत्रकात म्हटले आहे. एकाने चाकूने केलेल्या हल्ल्यात दोघे जखमी झाले असून त्यांना बार्शी (जि. सोलापूर) येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

पाटसांगवी येथे जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील केंद्रावर सकाळी मतदान सुरू झाले. सकाळी 11.30 च्या सुमारास गौरव उर्फ लाल्या अप्पा नाईकनवरे (वय 23, रा. पाटसांगवी) हा मतदान केंद्राच्या बाहेर आला. तेथे समाधान नानासाहेब पाटील (वय 27, रा. पाटसांगवी) आणि अन्य एकासोबत गौरव नाईकनवरे याचा वाद झाला. वादाच्या कारण काय, याचा उल्लेख पोलिसांनी केलेला नाही.

या वादाचे पर्यवसान हाणामारीत झाले. गौरव नाईकनवरे याने त्या दोघांवर धारदार चाकून वार केला. या चाकूहल्ल्यात समाधान पाटील आणि त्याच्यासोबत असलेला एकजण जखमी झाले. या प्रकारानंतर घटनास्थळी नागरिकांची गर्दी झाली.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

Crime
Dharashiv Loksabha : मतदानादिवशीच धाराशिव लोकसभा मतदारसंघ हादरला; ठाकरे गटाच्या कार्यकर्त्याची भोसकून हत्या

माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांनी नागरिकांच्या मदतीने दोघा जखमींना बार्शी (जि. सोलापूर) येथील रुग्णालयात पाठवून दिले. तेथे त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. पोलिसांनी या प्रकरणाचा तपास सुरू केला आहे. या हल्ल्याचा मतदानाशी अथवा निवडणुकीशी कोणताही संबंध नाही, असे पोलिसांनी पत्रकात म्हटले आहे.

भूमचे उपविभागीय पोलिस अधिकारी गौरीप्रसाद हिरेमठ यांनी हे पत्रक जारी केले असून, त्या पत्रकावर त्यांची सही आहे. पाटसांगवी येथील दोन्ही केंद्रांवर मतदान सुरळीत सुरू आहे, असेही पोलिसांनी या पत्रकाद्वारे कळवले आहे. हल्लेखोराला अटक करण्यात आली आहे किंवा नाही, याची माहिती पोलिसांनी या पत्रकात दिलेली नाही.

Crime
Jalna Loksabha Constituency : जालना-संभाजीनगरात दानवे-भुमरेंचे 'एकमेका सहाय्य करू'ची भूमिका!

या घटनेच्या अनुषंगाने योग्य कायदेशीर कार्यवाही सुरू आहे, असा उल्लेख करण्यात आला आहे. शिंदे गटाच्या 20 ते 22 कार्यकर्त्यांनी ठाकरे गटाच्या 3 ते 4 कार्यकर्त्यांवर हल्ला केल्याचे वृत्त जिल्हाभरात वाऱ्यासारखे पसरले होते. त्यामुळे खळबळ उडाली होती. पोलिसांनी पत्रक जारी करून असे काही झाले नसल्याचे स्पष्ट केले आहे.

(Edited by - Mayur Ratnaparkhe)

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com