Uddhav Thackeray Hingoli Sabha : मराठवाड्यात राजकीय दिवाळी ; ठाकरे, शिंदे, पवारांच्या तोफा धडाडणार

Marathwada Politics : विदर्भ दौऱ्यानंतर उद्धव ठाकरे मराठवाड्याचे प्रवेशद्वार असलेल्या हिंगोलीत एंट्री करणार आहेत.
Eknath Shinde | Uddhav Thackeray| Ajit pawar
Eknath Shinde | Uddhav Thackeray| Ajit pawarSarkarnama
Published on
Updated on

Marathwada News : आगामी विधानसभा आणि लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्यातील सर्व पक्षांनी आपापली ताकद पणाला लावली आहे. त्यासाठी आज सर्व पक्षांनी मराठवाड्याची निवड केली आहे. मराठवाड्यात आज राजकीय पक्षांच्या सभांचा धुराळा उडणार आहे. यात हिंगोलीत शिवसेना पक्ष प्रमुख उध्दव ठाकरे बाँम्ब फोडणार आहेत. परभणीत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे धमाका करणार तर बीडमध्ये उपमुख्यमंत्री अजित पवार उत्तरसभा घेणार आहेत. त्यामुळे सर्वांचं लक्ष या प्रमुख सभांकडे लागले आहे.

हिंगोलीतील रामलीला मैदानावर आज दुपारी उद्धव ठाकरे यांची तोफ विरोधकांवर धडाडणार आहे. विदर्भ दौऱ्यानंतर उद्धव ठाकरे मराठवाड्याचे प्रवेशद्वार असलेल्या हिंगोलीत एंट्री करणार आहेत. या सभेची तयारी पूर्ण झाली असून या माध्यमातून ठाकरे गट मोठे शक्तीप्रदर्शनही करणार आहे. या सभेचा टीझरही ठाकरे गटाने शेअर केला आहे. ही सभा 'तेच तेज, तेच सळसळतं रक्त, तोच स्वाभिमान आणि तोच निष्ठावंतांचा जनसागर', या वाक्यांसह या टीझर व्हिडीओची सुरुवात होते. हिंदुत्वाचा खरा विचार ऐकायला मोठ्या संख्येने उपस्थित रहा, असे आवाहन प्रोमोच्या माध्यमातून ठाकरे गटाकडून करण्यात आले आहे.

Eknath Shinde | Uddhav Thackeray| Ajit pawar
Swarajya First Anniversary : राज्यकर्ते शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर काहीही बोलत नाहीत ; संभाजीराजे सत्ताधाऱ्यांवर संतापले

विदर्भ दौरा संपवून पक्षप्रमुख उद्धव ठाकरे मराठवाड्याचे प्रवेशद्वार असलेल्या हिंगोलीतून येणार आहेत. गेल्या आठ दिवसापासून सभेची तयारी सुरु असून शिवसेनेच्या सर्व स्थानिक नेतेमंडळींनी कसून या सभेची तयारी केली आहे. सर्वच ज्येष्ठ नेते कामाला लागले आहेत. हिंगोलीतील खासदार हेमंत पाटील, आमदार संतोष बांगर यांनी ठाकरे यांचा हात सोडून एकनाथ शिंदे यांची साथ दिली आहे. त्यामुळे या दोघांचा कुठल्या शब्दांत समाचार घेतात याकडे सर्वांचे लक्ष असणार आहे.

उद्धव ठाकरे हिंगोलीत पक्षाच्या स्थानिक पक्षाधिकाऱ्यांशी संवाद साधणार आहेत. त्यांची बाजू ऐकून घेऊन आगामी काळात पक्षाची रणनीती ठरवणार आहेत.

Edited By- Anuradha Dhawade

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com