Parbhani Lok Sabha Election News : परभणीत राजकारण तापले; जानकरांनी काढले जाधवांचं इंग्रजी ज्ञान, म्हणाले...

Political News : परभणी लोकसभा मतदारसंघातील महायुतीचे महादेव जानकर व महाविकास आघाडीचे संजय जाधवांनी एकमेकांवर आरोप केले आहेत. त्यामुळे मतदारसंघातील राजकारण तापले आहे.
Mahadev Jankar, sanjay jadhav
Mahadev Jankar, sanjay jadhav Sarkarnama
Published on
Updated on

Parbhani News : परभणी लोकसभा निवडणुकीसाठी दुसऱ्या टप्प्यात 26 एप्रिलला मतदान होणार आहे. त्यामुळे उमेदवारांकडून जोरदार प्रचार केला जात आहे. गेल्या काही दिवसांपासून मतदारसंघातील राजकारण चांगलेच तापले आहे. महायुती व महाविकास आघाडीच्या उमेदवारांकडून एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप केले जात असून माजी मंत्री महादेव जानकर व खासदार संजय जाधव यांच्यातील वाद शिगेला पोहचला आहे.

परभणी लोकसभा मतदारसंघातील महाविकास आघाडी आणि महायुतीतील दोन्ही उमेदवार एकमेकांवर हल्लाबोल करण्याची एकही संधी सोडत नाहीत. जो मायबापाला 5-5 वर्ष भेटत नाही तो मतदारांना काय भेटणार ? असा सवाल करत ठाकरे गटाचे उमेदवार संजय जाधव यांनी महादेव जानकर यांच्यावर हल्लाबोल केला आहे.

Mahadev Jankar, sanjay jadhav
Shivsena UBT : 'नकली शिवसेना अन् नकली राष्ट्रवादी'वरून महाराष्ट्रात धुरळा

दुसरीकडे या टीकेनंतर संजय जाधव यांना माजी मंत्री महादेव जानकर यांनी चांगलेच प्रत्युत्तर दिले आहे. "बंडू जाधव तू माझ्या नादी लागू नको, फार अवघड होईल. बंडू जाधवला इंग्रजी येत नाही. तो फार छोटा माणूस आहेस. माझ्या नादी लागू नको, फार अवघड होईल.'

मी मतदारसंघातील कोणतेही गाव सोडणार नाही. मी हिंद केसरीबरोबर लढलोय. पवार साहेब मोठे आहेत. वसंतदादा, शंकरराव चव्हाण मोठी माणसे आहेत. मी नांदेडला उभा राहिलोय. नांदेडहून सांगलीला आलो. सांगलीनंतर माढ्याला उभारलो आहे. माढ्यानंतर बारामतीतून लढलो. आता मी परभणीला आलोय. मी हिंद केसरीबरोबर लढाई लढतोय आणि हा महाराष्ट्र केसरी काय करतोय. माझी विकासाची लढाई आहे. ओबीसी-मराठा जातीवाद काढला जातोय. पण मला मराठ्यांचे मतदान सर्वांत जास्त मिळणार आहे, असा दावा यावेळी महादेव जानकर यांनी केला आहे.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

'दिल्लीत थांबावे लागले तरी थांबणार'

येत्या काळात मी परभणीत विकासासाठी काम करणार आहे. दिल्लीत थांबावे लागलं तरी थांबणार आहे. परभणीचे भवितव्य बदलण्यासाठी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मला इथे पाठवले आहे. महायुतीच्या जागावाटपात 22 जागा भाजपला मिळाल्या आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसने मला ही जागा सोडली असल्याचे यावेळी महादेव जानकर यांनी स्पष्ट केले.

Mahadev Jankar, sanjay jadhav
Mahadev Jankar : परभणीत महायुतीचा उपरा उमेदवार? जानकरांचंही सडेतोड उत्तर; म्हणाले...

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com