Mahadev Jankar : परभणीत महायुतीचा उपरा उमेदवार? जानकरांचंही सडेतोड उत्तर; म्हणाले...

Parbhani Lok Sabha Constituency : बारामतीत पवारांनी, रायबरेलीत गांधींनी, तर वाराणसी आणि गांधीनगरमध्ये मोदींनी विकास केला आहे. त्यासारखाच विकास परभणीचा करणार आहे.
Mahadev Jankar
Mahadev JankarSarkarnama
Published on
Updated on

Parbhani Political News : लोकसभा निवडणुकीसाठी महायुती आणि महाविकास आघाडीने काही जागांवरील आपापल्या उमेदवारांची घोषणा केली आहे. त्यामुळे संबंधित मतदारसंघातील लढती स्पष्ट झाल्या आहेत. परभणी (Parbhani) लोकसभा मतदारसंघात शिवसेना ठाकरे गटाने सीटिंग खासदार संजय ऊर्फ बंडू जाधवांना तर युतीने रासपच्या महादेव जानकरांना उमेदवारी जाहीर केली. त्यामुळे येथून बाहेरचा विरुद्ध स्थानिक उमेदवार अशी लढत होणार असल्याचे बोलले जाते. यावर जानकरांनी देशातील दिग्गज नेत्यांची नावे घेत महायुतीतील नेत्यांना सहकार्य करण्याचे आवाहन केले आहे.

महादेव जानकर (Mahadev Jankar) म्हणाले, महायुतीकडून माझ्या नावाला केंद्रातून शिक्कामोर्तब झाले आहे. अजितदादांनी आपल्या वाट्याचे सीट मला दिले आहे. मुख्यमंत्री शिंदे, उपमुख्यमंत्री फडणवीस आणि पवार यांनी मिळून हा निर्णय घेतला आहे. येथून मी माझ्या पक्षाच्या चिन्हावरच निवडणूक लढवणार आहे. निवडून आल्यानंतर जगातील जर्मनीसारखा विकास देशातील परभणीचा करू, असा शब्दच जानकरांनी दिला.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

Mahadev Jankar
Sanjay Shirsat News : संजय शिरसाटांनी महाजनांना शेलक्या शब्दात सुनावले; म्हणाले, 'शेपटीला चिंधी बांधून...'

बारामतीत पवारांनी, रायबरेलीत गांधींनी, तर वाराणसी आणि गांधीनगरमध्ये मोदींनी (Narendra Modi) विकास केला आहे. त्यासारखाच विकास परभणीचा करणार आहे. त्यासाठी केंद्रीय पातळीवर कसा पाठपुरावा करायचा हे मला माहिती आहे. मराठवाड्यातील इतर जिल्ह्यांचा विकास होत असताना परभणीकडे दुर्लक्ष झाले, याकडेही जानकरांनी लक्ष वेधले. आता निवडणुकीला वेळ कमी आहे, त्यामुळे सर्व पक्षांनी सहकार्य करावे, असेही त्यांनी आवाहनक केले.

दरम्यान, या मतदारसंघात स्थानिक विरुद्ध परका असा प्रचार करून दिशाभूल करण्याचा प्रयत्न होईल, त्याकडे मात्र लक्ष देऊ नका, असे आवाहनही जानकरांनी केले. ते म्हणाले, राष्ट्रवादीने पोटात घेतल्याने विटेकरांची जबाबदारी वाढली आहे. नरेंद्र मोदींना पुन्हा पंतप्रधान करण्यासाठी भाजपची साथ महत्त्वाची आहे. आता मला परका समजू नका. मोदी वाराणसीतून लढले, राहुल गांधी (Rahul Gandhi) वायनाडमधून निवडून येतात, मग मी तर राज्यातीलच आहे. परभणीतील सर्व गावांत मी फिरलो आहे. विटेकरांच्या सासरवाडीचेही नाव सांगतो. त्यामुळे उपरा वगैरे अशा काही मुद्द्यांना स्थान देऊ नका, असे उत्तरही जानकरांनी दिले.

(Edited by Sunil Dhumal)

R

Mahadev Jankar
Buldhana Politics : काँग्रेसच्या नेत्याचं विधान अन् ठाकरे गटातील नेत्यांच्या तोंडचं पाणी पळालं!

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com