MVA Vs BJP : छत्रपती संभाजीनगरचं राजकारण तापणार; एकाच दिवशी आघाडीची सभा अन् भाजपची सावरकर गौरव रॅली

Marathwada News : मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या धनुष्यबाण यात्राही होणार
Chhatrapati Sambhajinagar City
Chhatrapati Sambhajinagar CitySarkarnama
Published on
Updated on

Maharashtra Politics : मराठवाड्याचे प्रवेशद्वार समजल्या जाणाऱ्या छत्रपती संभाजीनगर येथे २ एप्रिल रोजी महाविकास आघाडीची सभा, भाजपची सावकर सन्मान रॅली आणि शिवसेनेची धनुष्यबाण यात्रेचे आयोजन करण्यात आले आहे. सध्या महाविकास आघाडी त्यांच्या वज्रमूठ विराट सभेची, भाजपकडून सन्मान रॅली तर शिवसेनेकडून धनुष्यबाण यात्रेची जोरदार तयारी सुरू आहे. त्यामुळे मराठवाड्याचे राजकारण चांगलेच तापल्याचे पहायला मिळत आहे.

कांद्याचे घसलेले दर, अवकाळी पावसामुळे अडचणीत आलेला शेतकरी, वाढती महागाई, बेरोजगारी यासह निवडणूक आयोगाचा निकाल या मुद्द्यांवरून महाविकास आघाडीने (MVA) विभागानुसार राज्यात सभांचे आयोजन केले आहे. या सभांच्या माध्यमातून शिंदे-फडणवीस सरकारला (State Government) अडचणीत आणण्याची रणनिती विरोधकांची आहे. या सभांचे नियोजन अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू असतानाच करण्यात आलेले आहे. त्यानुसार महाविकास आघीडीची पहिली सभा मराठवड्यातील छत्रपती संभाजीनगर (Chhatrapati Sambhajinagar) येथे २ एप्रिल रोजी होणार आहे.

Chhatrapati Sambhajinagar City
Karuna Sharma Allegations On Dhananjay Munde : कोट्यावधींच्या पॉलिसीचा उल्लेख करत करुणा मुंडेंचे धनंजय मुंडेंवर गंभीर आरोप

दरम्यान, काँग्रेस नेते राहुल गांधी (Rahul Gandhi) यांनी मोदी अडनावावर केलेले विधान आणि परदेशातील वक्तव्यांवरून माफी मागावी, अशी मागणी भाजपने (BJP) केली होती. त्यावर राहुल गांधींनी, 'माफी मागायला मी सावरकर नाही, गांधी आहे. गांधी माफी मागत नाहीत', असे विधान केले.

राहुल हे सावरकर (Veer Savarkar) यांचा वारंवार आपमान करीत असल्याचे म्हणत देशभर भाजप आक्रमक झाल्याचे पहायला मिळत आहे. राज्यातील शिंदे-फडणवीस यांनीही राहुल गांधींच्या वक्तव्याला उत्तर देण्याची तयारी केली. त्यासाठी शिवसेना आणि भाजपच्या वतीने राज्यभर सावरकर सन्मान यात्रेचे आयोजन करणार आहे. या यात्रेची सुरुवातही छत्रपती संभाजीनगर येथे २ एप्रिल रोजी करण्यात येणार आहे.

Chhatrapati Sambhajinagar City
Girish Bapat's Last Interview: 'कार्यकर्त्यांचं कार्य मेलं, नुसते पुढारी राहिले,' ; खालावलेल्या राजकारणावर शेवटच्या मुलाखतीत बापट म्हणाले..

छत्रपती संभाजीनगर येथे एकाच दिवशी महाविकास आघाडीची वज्रमूठ विराट सभा आणि सावरकर सन्मान रॅली होणार आहे. सध्या या सभा, रॅली आणि यात्रेची तयारी जोरात सुरू आहे. परिणामी या शहरासह मराठवाड्यातील राजकीय वातावरण चांगलेच तापल्याचे दिसून येत आहे.

दरम्यान, महाविकास आघाडीच्या सभांना उत्तर देण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) राज्यभरात 'धनुष्यबाण यात्रा' काढणार आहे. त्याची सुरुवात छत्रपती संभाजीनगर शहरातूनच होणार आहे. यामुळे राज्यात कोकणातील खेडच्या सभेनंतर पुन्हा पाठशिवणीचा खेळ सुरू होणार असल्याची चर्चा सुरू झाली आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com