Piyush Goyal News : प्रदूषण मंडळाच्या परवानगीला विलंब, उद्योजकांच्या तक्रारीनंतर केंद्रीय मंत्री गोयल यांचा थेट पंकजा मुंडेंना फोन!

Piyush Goyal calls Pankaja Munde after complaints from entrepreneurs about delays in obtaining permission from the pollution board. : प्रदूषण मंडळाच्या परवानगीचा कालवधी सात दिवसांवर आणून प्रलंबित फायली तातडीने निकाली काढाव्यात, अशी सचूना गोयल यांनी मुंडे यांना दिली.
Piyush Goyal-Pankaja Munde News
Piyush Goyal-Pankaja Munde NewsSarkarnama
Published on
Updated on

BJP Political News : मराठवाड्याची राजधानी असलेल्या छत्रपती संभाजीनगरमधील आॅरिक सिटीसह शेंद्रा-बिडकीन भागात मोठ्या प्रमाणात उद्योग येऊ पाहत आहेत. कोट्यावधींची गुंतवणूक करण्यास इच्छूक असलेल्या प्रकल्पांना येणाऱ्या अडचणींचा आढावा आज केंद्रीय मंत्री पियुष गोयल यांच्यासोबत उद्योजकांच्या झालेल्या बैठकीत घेण्यात आला. यात प्रदूषण मंडळाच्या परवानग्या मिळण्यात विलंब केला जातो, असा तक्रारीचा सूर उद्योजकांनी लावला.

यावर गोयल (Piyush Goyal) यांनी तात्काळ राज्याच्या पर्यावरण मंत्री पंकजा मुंडे यांना फोन लावून लक्ष घालण्यास सांगितले. शहरात महाराष्ट्र प्रदूषण विकास मंडळाकडून उद्योग सुरू करण्यासाठी लागणाऱ्या परवानगीसाठी तब्बल दीडशे दिवस लागत असल्याचे उद्योजकांच्या शिष्टमंडळाने मंत्री गोयल यांच्या निदर्शनास आणून दिले. अनेक उद्योगांच्या फायली अधिकाऱ्यांनी अडवून धरल्याचा आरोपही यावेळी करण्यात आला.

याची गंभीर दखल घेत पियूष गोयल यांनी थेट पर्यावरण मंत्री पंकजा मुंडे (Pankaja Munde) यांना फोन केला. प्रदूषण मंडळाच्या परवानगीचा कालवधी सात दिवसांवर आणून प्रलंबित फायली तातडीने निकाली काढाव्यात, अशी सचूना गोयल यांनी मुंडे यांना दिली. छत्रपती संभाजीनगरच्या औद्योगिक क्षेत्रात मोठ्या प्रमाणात गुंतवणूक झाली आहे. तर अनेक नव्या कंपन्या आपले प्रकल्प इथे उभारू पाहत आहेत.

Piyush Goyal-Pankaja Munde News
Pankaja Munde : 'ओबीसी नेता म्हणून ओळख नको, जातीत जन्म म्हणून...', पंकजा मुंडेंनी स्पष्टच सांगितले

अशा उद्योगांना प्रदूषण मंडळाकडून ना हरकत प्रमाणपत्र मिळविण्यासाठी दीडशे दिवस वाट पहावी लागते. एवढा प्रदीर्घ कालवधी कशासाठी? असा प्रश्न उद्योजकांनी मंत्री गोयल यांच्या भेटीत उपस्थित केला होता. कोट्यवधी रुपयांची गुंतवणूक आणि त्यातून होणारी रोजगार निर्मिती पाहता प्रदूषण मंडळाचे प्रमाणपत्र लवकर मिळावे, अशी अपेक्षा यावेळी व्यक्त करण्यात आली.

Piyush Goyal-Pankaja Munde News
BJP Member Registration : भाजप सदस्य नोंदणीसाठी कॉर्पोरेट कॉन्ट्रॅक्टर! भाजपकडून करण्यात आला खुलासा

या पूर्वी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्यांच्याकडे केलेल्या वैयक्तिक तक्रारीत लक्ष घालून त्या सोडवल्या होत्या. पण जे त्यांच्यापर्यंत पोहचू शकले नाहीत त्यांच्याबातीत दफ्तर दिरंगाई सुरूच असल्याचे यावेळी निदर्शनास आणून देण्यात आले. यावर पियुष गोयल यांनी पर्यावरण मंत्री पंकजा मुंडे व संबंधित अधिकाऱ्यांना दूरध्वनीकरुन अशी प्रमाणपत्रे देण्याचा कालावधी सात दिवसापर्यत आणण्याचे निर्देश दिले.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com