Pankaja Munde : 'ओबीसी नेता म्हणून ओळख नको, जातीत जन्म म्हणून...', पंकजा मुंडेंनी स्पष्टच सांगितले

Pankaja Munde OBC Politics : छगन भुजबळ आणि भाजपच्या जवळीकीविषयी बोलताना पंकजा मुंडे म्हणाल्या, ते महायुतीत आहे. राष्ट्रवादी आमच्याच महायुतीचा भाग आहे. त्यामुळे त्यांच्याशी जवळीक आहे. ते विरोधी पक्षात नाहीत.
Pankaja Munde
Pankaja Mundesarkarnama
Published on
Updated on

Pankaja Munde News : उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मंत्रिमंडळात स्थान दिले नसल्याने माजी मंत्री तसेच ओबीसींचे नेते अशी ओळख असलेले छगन भुजबळ नाराज आहेत. मराठा समाजाला ओबीसीमधून आरक्षण देण्यास विरोध केल्याने त्यांचा पत्ता कापल्याची चर्चा आहे. ओबीसी नेत्यांना डावलल्या जात असल्याच्या चर्चेवर राज्याच्या पर्यावरणमंत्री पकंजा मुंडे यांनी आपली भूमिका स्पष्ट केली.

'कुठल्याही नेत्याला हा ओबीसींचा, मराठ्यांचा असे लोबल लावले जाऊ नये. नेता हा सर्वच समाजाचा असोत. फक्त एखाद्या जातीत जन्म घेतला म्हणून त्या समाजाच्या नावाने त्याला ओळखले जाऊ नये. अशी ओळख आम्हाला नको आहे. त्यापेक्षा चांगल्या कामाने जी ओळख निर्माण होते त्या नावाने आपल्याला ओळखल्यास आवडेल.' ,असे पंकजा मुंडे म्हणाल्या.

Pankaja Munde
Maharashtra BJP Politics : कोकणात शिवसेनेला भगदाड? भाजपने खिंडार पाडले; 600 जणांच्या हाती ‘कमळ’

छगन भुजबळ आणि भाजपच्या जवळीकीविषयी बोलताना पंकजा मुंडे म्हणाल्या, ते महायुतीत आहे. राष्ट्रवादी आमच्याच महायुतीचा भाग आहे. त्यामुळे त्यांच्याशी जवळीक आहे. ते विरोधी पक्षात नाहीत. त्यामुळे आमच्याच चर्चा होत असते. ते भाजपात येणार नाही. राष्ट्रवादी सोडणार याविषयी मला फार काही माहीत नाही. सुप्रीम कोर्टाने लाडक्या बहिणी संदर्भात काय म्हटले, त्याबद्दल मला माहित नाही. त्यामुळे त्यावर बोलणार नाही असेही पंकजा मुंडे यांनी स्पष्टपणे सांगितले.

पंकजा मुंडे नद्यांचा पुनर्जिवन आणि प्रदूषणाचा आढावा घेण्यासाठी नागपूरला आल्या आहेत. नागपूरच्या नागनदीचा आढावासुद्धा त्यांनी घेतला. इंद्रायनी, पंचगंगा, गोदावरी, चंद्रभागा या नद्यांची स्वच्छता, पुनर्जिवन करण्याचा मानस त्यांनी व्यक्त केला. नद्यांच्या स्वच्छता आणि प्रदूषणमुक्त करण्यासाठी सरकारच्या वतीने निधी दिला जातो. मात्र त्या बदल्यात हवा तसा फायदा होताना दिसत नाही. रस्त्यांप्रमाणे नद्यांनासुद्धा एक स्पेशल प्रॉपर्टी म्हणून ट्रीट करून, त्यांची स्वच्छता आणि मेंटेनेससाठी एक प्लॅनिंग करायला पाहिजे, असे त्यांनी सांगितले.

बुटीबोरी औद्योगिक वसाहतीमुळे होणाऱ्या प्रदूषणाच्या तक्रारीसुद्धा आहेत. त्यावर देखील चर्चा करणार आहोत. इंडस्ट्रीमुळे रोजगार निर्माण होतो. अनेक नियम बदलले आहेत. वीस वर्षांपूर्वी असलेले नियम आता नाही. त्यावरसुद्धा आम्ही काम करत आहोत. उद्योग रोजगार देत असतात. पर्यावरण आणि रोजगार दोन्ही महत्त्वाचे आहे. सरकारतर्फे उद्योगांना मदत करण्याचे काम माझ्या खात्यातर्फे केले जाईल. आमच्या खात्याकडे प्रदूषण दाखवण्याचे एवढेच काम आहे. ते दूर करण्याची जबाबदारी नाही. त्याच्या पलीकडे पर्यावरण खात्याचे काम जावे याकरिता काही सुधारणा केल्या जात आहेत. यास थोडा वेळ लागले असे देखील पंकजा मुंडे म्हणाल्या.

Pankaja Munde
Congress News : सपकाळांच्या नावावरून विखे पाटलांचा काँग्रेसच्या दिग्गजांना टोला

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com