Pradeep Naik : प्रदीप नाईक यांची 'फॅक्टरी' राजकीय अवसायनात?

Kinwat - Mahur Assembly Constituency : किनवट माहूरच्या अखंड राष्ट्रवादीत धुसफूस तर काँग्रेस ‘लोटस’ च्या प्रभावाखली! राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या स्थापनेपासून अध्यक्ष शरद पवार यांच्याशी जिव्हाळ्याचे संबंध असलेले जिल्ह्यातील राष्ट्रवादी काँग्रेसचे एकमेव निष्ठावान
Namdevrao Keshave, Pradeep Naik, Dr. Niranjan Keshave
Namdevrao Keshave, Pradeep Naik, Dr. Niranjan KeshaveSarkarnama
Published on
Updated on

Mahur News : राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या स्थापनेपासून अध्यक्ष शरद पवार यांच्याशी जिव्हाळ्याचे संबंध असलेले जिल्ह्यातील राष्ट्रवादी काँग्रेसचे एकमेव निष्ठावान माजी आमदार प्रदीप नाईक हे कार्यकर्ता घडविण्याचा कारखाना म्हणून संबोधले जातात. त्याला कारणही तसेच आहे.

सत्तेत असताना व सत्ते बाहेर गेल्यानंतर देखील सर्वसमावेशक राजकीय दृष्टिकोन बाळगून तळागाळातील कार्यकर्त्यांना महत्त्वांच्या संस्थावर प्रतिनिधित्व त्यांनी मिळवून दिले. मात्र ते म्हणतात ना की, घर फिरले की वासेही फिरतात! या म्हणीप्रमाणे त्यांच्या पहिल्या फळीतील अनेक अजिदादावादी कार्यकर्त्यांच्या वाहनावरील 'घडी'चे चिन्ह अद्याप पर्यंत शाबूत असल्याने नाईकांची फॅक्टरी राजकीय अवसायनात जाण्याची शक्यता राजकीय वर्तुळात वर्तविली जात आहे.

किनवट - माहूर विधानसभा (Kinwat - Mahur Assembly Constituency) मतदारसंघात तब्बल तीन पंचवार्षिक राष्ट्रवादीच्या तिकीटवर एकहाती वर्चस्व गाजविणारे नाईक हे अजून तरी राष्ट्रवादी शरद पवार गटासोबत कायम आहेत. परंतु नाईकांच्या तालमीत घडलेल्यांना अजित पवारांच्या चालत्या गाडीचा मोह जाडल्याने नाईकांना देखील बंड पुकरण्यासाठी प्रवृत्त केले जात असल्याचे खात्रीलायक वृत्त आहे.

माहूर - किनवटमध्ये निष्ठावंतांची एक जमात अद्याप तरी तग धरून आहेत. आगामी निवडणुकीत माजी आमदार प्रदीप नाईक (Pradeep Naik) यांचा प्रचार विद्यमान आमदार भीमराव केराम करणार अशा वावड्या समाजमाध्यमांवर उठत आहे. यावरून नाईकांचे निकटवर्तीयांनी त्यांची मनधरणी करून अजितदादा गटाकडे वळविण्याचा मार्ग सुखकर तर गेला नाही ना, अशी शंका सुद्धा उपस्थित होत आहे.

Namdevrao Keshave, Pradeep Naik, Dr. Niranjan Keshave
Manoj Jarange Patil: मला आत टाकूनच दाखवा, मग कळेल मराठ्यांची लाट काय असते? जरांगेंचे फडणवीसांना आव्हान

सध्या नाईक विधानसभा मतदारसंघात तुतारीचा आवाज बुलंद करण्यासाठी धावपळ करीत आहेत. तर त्यांच्या निकटवर्तीय कार्यकर्त्यांनी अद्यापपर्यंत घडीचे चिन्ह काढले नाही अन् तुतारीचे चिन्ह लावले नाही, असे एकंदरीत चित्र माहूर किनवटच्या राष्ट्रवादी (NCP) गोटात पाहायला मिळत असल्याने सर्वसामान्य निष्ठावांतांमध्ये संभ्रम निर्माण होत असून नाईकांचे बोट धरून मुंबईची सैर करणाऱ्या कार्यकर्त्यांनी आपली भूमिका स्पष्ट करावी. अन्यथा त्यांच्या तडजोडीच्या राजकारणात कार्यकर्त्यांचा बळी जाऊन गटातटात विखुरलेले पक्ष नामोहरम झाल्याशिवाय राहणार नाही

केशवे पिता - पुत्र भाजपच्या वाटेवर...

माहूर - किनवटमध्ये केशवे घराण्यापूर्ती मर्यादित असलेली काँग्रेस (Congress) माजी मुख्यमंत्री अशोकराव चव्हाण यांच्या निमित्ताने संपुष्टात आली. जाहीर पक्ष प्रवेश झाला नसला तरी काँग्रेसचे माजी नगराध्यक्ष तथा विद्यमान नगरसेवक प्रा. राजेंद्र केशवे हे अशोक चव्हाणांबरोबर भाजपात जाणार असल्याचे स्पष्ट करून टप्प्याटप्प्याने तालुका निहाय पार पडत असलेल्या भाजप प्रवेश कार्यक्रमात आपणही भाजपावासी होणार असल्याचे सांगितले आहे.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

पुतण्या काँग्रेस विचारधारेत...

माहूर तालुक्यात काँग्रेसचे ध्येयधोरण, विचारधारा समर्थपणे पेलत असलेले पुतणे डॉ. निरंजन केशवे यांनी अल्पावधीतच पक्षाच्या राज्य पातळीवरील महत्त्वाच्या जबाबदाऱ्या सांभाळत आपल्या राजकारणाचा 'श्री गणेशा' केला होता. त्यांच्या निमित्ताने काँग्रेसची परिस्थिती बऱ्यापैकी सदृढ झाली होती. डॉ. निरंजन केशवे यांचा जनसंपर्क दांडगा असल्यामुळे भविष्यात निश्चितच काँग्रेसची विचारधारा त्यांना तारणारी आहे.

हिंगोली लोकसभा मतदारसंघांमध्ये दिवंगत खासदार राजीव सातव यांच्यानंतर राहुल गांधी यांच्या निकटवर्तीयांमध्ये डॉ. केशवेचा समावेश झाल्यास नवल वाटायला नको. सध्या माहूर आणि किनवट विधानसभा मतदारसंघात निष्ठावंतांचा जर विचार केल्यास राष्ट्रवादीचे माजी आमदार प्रदीप नाईक, उद्धव ठाकरे शिवसेनेचे ज्योतिबा खराटे, राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाचे समाधान जाधव, काँग्रेसच्या डॉ. सुप्रिया गावंडे हे आपला पक्ष धरून आहेत. बंडखोरांच्या भाऊ गर्दीतीत निष्ठावंताची एक फळी माहूर किनवट विधानसभा मतदारसंघात कायम असल्याचे दिसून येते.

(Edited by Amol Sutar)

Namdevrao Keshave, Pradeep Naik, Dr. Niranjan Keshave
Mahaaghadi Seats Allotment : 'कोल्हापूर सोडतो; पण सांगली द्या' : ठाकरेंच्या मागणीमुळे काँग्रेस हडबडली!

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com