Prakash Ambedkar on Jarange Patil : जरांगे यांना प्रकाश आंबेडकरांचा सल्ला; आरक्षणासाठी आता ‘हा’ लढा उभारा!

Ambedkar suggests a new route for Jarange reservation battle : 29 ऑगस्टच्या उपोषणापूर्वी वंचित बहुजन आघाडीच्या नेत्यांचा मोठा सल्ला; 50 टक्के वर्गीकरणाचा मुद्दा पुन्हा चर्चेत
Prakash Ambedkar on Jarange Patil
Prakash Ambedkar on Jarange PatilSarkarnama
Published on
Updated on

Reservation politics Maharashtra : मनोज जरांगे पाटील यांना काही समजत नाही हे मला माहित आहे. त्यांच्यासोबत असलेले बुद्धिवादीही कंटाळले आहेत. माझा जरांगे यांना सल्ला आहे, की त्यांनी पन्नास टक्के वर्गीकरणाचा लढा सुरू करावा.

तसे केल्यास ते मागतायेत त्यापेक्षा किती तरी पटीने जास्त त्यांना मिळेल, असा सल्ला वंचित बहुजन आघाडीचे सर्वेसर्वा प्रकाश आंबेडकर यांनी दिला आहे.

मनोज जरांगे पाटील हे गेल्या दोन वर्षापासून मराठा आरक्षणाचा लढा लढत आहेत. ओबीसीमधून (OBC) मराठा समाजाला आरक्षणाची मागणी करताना ते सरसकट मिळावे, असा आग्रह सुरूवातीला त्यांनी धरला होता. सरसकट मिळत नाही म्हटल्यावर हैदराबाद, सातारा, कोल्हापूर, औंध गॅझेट लागू करण्याची मागणी जरांगे पाटील यांनी केली.

सरकारने हैदराबाद गॅझेट लागू करून त्यातील नोंदीनुसार मराठा-कुणबी प्रमाणपत्र देण्याचे मान्य केले. परंतु या नोंदीनुसार दिलेल्या मराठा-कुणबी जातीचे प्रमाणपत्र पडताळणी समितीकडून रद्द केले जाऊ लागले आहेत. या पार्श्वभूमीवर येत्या 29 आॅगस्ट पासून मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange) यांनी अंतरवाली सराटीत पुन्हा उपोषणाला बसण्याची घोषणा केली आहे.

Prakash Ambedkar on Jarange Patil
Manoj Jarange Patil : 'तर' फडणवीस अन् विखे पाटलांना पुढचा काळ जड जाईल : मनोज जरांगे पाटलांचा गर्भित इशारा

जरांगे पाटील यांच्या उपोषणावर भाष्य करताना प्रकाश आंबेडकर यांनी त्यांना सल्ला दिला आहे. जरांगे पाटी यांना काही समजत नाही हे आपल्याला माहित आहे, त्यांना आरक्षण हवे असेल तर त्यांनी पन्नास टक्के वर्गीकरणाचा लढा सुरू करावा. तो लढा सुरू केला तर ते मागतायेत त्यापेक्षा किती तरी जास्त मिळू शकते याची त्यांना कल्पना नाही. त्यामुळे सगळं सोडून त्यांनी वर्गीकरणाचा लढा सुरू करावा.

Prakash Ambedkar on Jarange Patil
Keshari Ration Card : केशरी रेशनकार्ड काढायचेय? अगदी सोपं आहे; पात्रता, निकष अन् अटी समजून घ्या.....

राज्यातील भूठभर मराठा आणि त्यांच्या काही पिढ्या सोडल्या तर इतरांना पोटभर मिळाले, अशी परिस्थिती नाही. मग मराठ्यांना आरक्षण मागा हा राजकीय डाव राजकारण्यांनी टाकला. जरांगे पाटील यांनी एवढी उपोषणं केली तरी सरकार झुकलं नाही, त्यामुळे त्यांनी आता वर्गीकरणाचा लढा उभारावा, याचा पुनरुच्चारही प्रकाश आंबेडकर यांनी माध्यमांशी बोलताना केला.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com