Mahadeo Jankar-Bhujbal: '...अन् भाषणाआधी महादेव जानकरांनी स्टेजवरच भुजबळांचे पाय धरले!'

Beed OBC Elegar Melava : ''आता गोपीनाथ मुंडे यांचं स्वप्न छगन भुजबळ यांनी पूर्ण करावं...'
Mahadeo Jankar - Bhujbal
Mahadeo Jankar - Bhujbal
Published on
Updated on

Beed News : मराठा आरक्षणावरुन राज्यात मोठा वादंग निर्माण झाला आहे.एकीकडे मराठा आरक्षणासाठी आक्रमक झालेल्या मनोज जरांगे पाटील यांनी 20 जानेवारी रोजी मुंबईत मोठं आंदोलन उभं करण्याचा सरकारला इशारा दिला आहे. तर दुसरीकडे या मागणीला राज्याचे अन्न आणि नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी विरोध केला आहे. पण याचवेळी बीडमध्ये एक अनोखं चित्र पाहायला मिळाले.

राष्ट्रीय समाज पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष महादेव जानकर यांनी सुरुवातीला संयोजकांना बोलण्यास नकार दिला होता. आग्रहानंतर बोलण्यास उठलेल्या जानकर यांनी भाषणाची मुख्य भाषणाची सुरुवात करतानाच गोपीनाथ मुंडे आणि छगन भुजबळ हे महाराष्ट्राचा हुंकार आहेत, अशी केली.

Mahadeo Jankar - Bhujbal
CM Eknath Shinde: 'माझ्या दाढीत अनेकांच्या नाड्या, दाढीवर हात फिरवला की...'; मुख्यमंत्री शिंदेंचा रोख कुणाकडे ?

आता गोपीनाथ मुंडे यांचं स्वप्न छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) यांनी पूर्ण करावं. मुंडे हयात नाहीत आता भुजबळांनी मुख्यमंत्री व्हावे, भुजबळांसाठी आपण हाडाचे काडं करु, असे म्हणत आपण त्यांच्या पाया पडणार आहोत असे म्हणत भाषण थांबवले व व्यासपीठावर बसलेल्या भुजबळांकडे जाऊन महादेव जानकर (Mahadeo Jankar) त्यांच्या पाया पडले.

राज्याचे नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांच्या उपस्थितीत शनिवारी येथील श्रीमंत योगी छत्रपती शिवाजी महाराज जिल्हा क्रीडा संकुलावर ओबीसी एल्गार परिषद झाली. सभेला आमदार गोपीचंद पडळकर (Gopichand Padalkar), प्रकाश शेंडगे आदी ओबीसी नेते उपस्थित होते.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

छगन भुजबळ म्हणाले, वेगळे आरक्षण द्या, चुकीचे आरक्षण देऊ नका, चुकीचे पायंडे पाडू नका. गोपीनाथ मुंडे असते तर हे प्रश्न निर्माण झालेच नसते. ते नसल्यानेच ओबीसींच्या मागे संकटांची मालीका सुरु आहे. बीडमध्ये विचारपूर्वक प्लान करुन जाळपोळ, हिंसाचार झाला. छत्रपती शिवाजी महाराजांसोबत सर्वच जाती धर्माचे मावळे होते. आता महाराजांचे नाव घेत लोकांची घरं फुंकता हे शोभतं का, असा सवालही त्यांनी केला. देशाला, राज्याला विचार, वारसा, दिशा देण्याचे काम ओबीसींनी केले, अनेक संत बहुजन समाजातील आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या संविधानामुळेच देश एकसंघ आहे.

कोणाच्याही विरोधात काहीही बोलायचं, उपमुख्यमंत्री अजित पवार केवळ कायदा - सुव्यवस्थेबाबत बोलले तर त्यांच्यावर बोलण्याची गलिच्छ बोलता, एवढी मस्ती कुठून आली, असा टोलाही त्यांनी नाव न घेता जरांगे पाटलांना लगावला. आपण दोन महिने शांत होतो, टीका - शिव्या दिला जात असतानाही पाहत होतो. मी शांतता बिघडवतोय म्हणता, जाळपोळ कोणी केली, मारहाण कोणी केली, असा सवाल करत अजुनही ओबीसींना मारहाण होत असल्याचा आरोप करत यावर पोलिसांनी कारवाई करावी, असे आवाहन त्यांनी केले. पोलिस हात बांधून बसले तर जनता कायदा हातात घेईल असेही छगन भुजबळ म्हणाले.

(Edited By Deepak Kulkarni)

Mahadeo Jankar - Bhujbal
MLA Ratnakar Gutte : 'मी जेलमध्ये जावं अशी अनेकांची इच्छा होती...'; आमदार गुट्टेंचं खळबळजनक विधान

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com