Mla Prashant Bamb News : दसऱ्याला कारखाना सुरू होण्याची अन् दिवाळीला साखरेच्या बोनसची मी वाट पाहतोय..

Bjp : सभासदांनी विरोधकांना संधी दिली आहे, त्याबद्दल मी त्यांचे स्वागत करतो.
Bjp Mla Prashant Bamb News Aurangabad
Bjp Mla Prashant Bamb News AurangabadSarkarnama

Gagapur Sugar Factory : गंपापूर सहकारी साखर कारखाना (Sugar Factory) येत्या दसऱ्याला पुर्णपणे अॅटोमॅटीक पद्धतीने सुरू करण्याचे नव्याने निवडून आलेल्या पॅनलच्या प्रमुखांनी जाहीर केले आहे. तसेच दिवाळीला याच सुरू केलेल्या कारखान्यातील साखर सभासद शेतकऱ्यांना बोनस म्हणून वाटप करू, असेही त्यांनी आश्वासन दिले आहे. असे घडले तर मला आनंदच होईल, मी त्या दिवसाची वाट पहात आहे, अशा शब्दांत गंगापूर साखर कारखान्याचे माजी अध्यक्ष आमदार प्रशांत बंब यांनी प्रतिक्रिया व्यक्त केली आहे.

Bjp Mla Prashant Bamb News Aurangabad
Aurangabad Crime News : महिलेची छेड काढणाऱ्या ढुमेंचे निलंबन तर झाले, पण विभागीय चौकशी, दोषारोपपत्राचे काय ?

बंद पडलेला कारखाना सुरू करण्यासाठी मित्रांना एकत्रित करून पैसा लावला, पण विरोधकांनी न्यायलयीन प्रक्रियेत आम्हाला अडकवले, त्यामुळे शेतकऱ्यांचे, कारखान्याच्या सभासदांचे नूकसान झाले. (Bjp) तरी देखील सभासदांनी विरोधकांना संधी दिली आहे, त्याबद्दल मी त्यांचे स्वागत करतो, असेही बंब (Prashant Bamb) म्हणाले.

गंगापूर सहकारी साखर कारखान्याच्या सार्वत्रिक निवडणूकीत आमदार बंब यांच्या पॅनलचा दारूण पराभव झाला. बंब यांच्यासह त्यांचे सर्वच उमेदवार पराभूत झाले. तर कृष्णापाटील डोणगांवकर यांच्या नेतृत्वाखालील शिवशाही शेतकरी विकास पॅनलने कारखाना पुन्हा ताब्यात घेतला. या निवडणुक निकालावर आमदार प्रशांत बंब यांनी सोशल मिडियाच्या माध्यमातून प्रतिक्रिया व्यक्त केली.

बंब म्हणाले, महाराष्ट्रातील सहकार क्षेत्रामधील भ्रष्टाचार आणि त्यामुळे वाढलेल्या शेतकऱ्यांच्या आत्महत्या याला बारामतीचे काका जबाबदार आहेत. आता देखील या निवडणुकीत त्यांच्या इथल्या नेत्यांनी आणि अनुयायांनी शेतकरी, सभासद आणि नागरिकांची दिशाभूल केली. आमिष दाखवले गेले आणि त्याला सभासद शेतकरी बळी पडले. गेली अनेक वर्ष मी आणि माझे सहकारी हा कारखाना सुरू व्हावा यासाठी झटत होतो.

बंद पडलेल्या कारखान्यात कोणी हात घालत नाही, पण आम्ही ती हिमंत दाखवली, कारखाना सुरू व्हावा, ऊसाला चांगला भाव तोही जागेवरच मिळावा हा त्यामागचा आमचा प्रामाणिक हेतू होता. पण बारामतीचे काका, त्यांचे अनुयायी आणि आता निवडून आलेल्या पॅनलचे प्रमुख यांनी आमच्या मार्गात अडथळे आणले. आम्हाला न्यायालयीन लढ्यात अडकवून ठेवले, त्यामुळे कारखाना सुरू करता आला नाही.

Bjp Mla Prashant Bamb News Aurangabad
Gangapur Sugar Factory : कारखाना सुरू करण्याचे आश्वासन नवे संचालक मंडळ पाळणार का ?

आता नव्या पॅनलच्या प्रमुखांनी येत्या दसऱ्या पर्यंत गंगापूर कारखाना पुर्णपणे स्वयंचलित पद्धतीने सुरू करण्याचा शब्द दिला आहे. तो त्यांनी पाळावा, तसेच येत्या दिवाळीला याच कारखान्यातील साखर बोनस म्हणून सभासद शेतकऱ्यांना वाटण्याचे आश्वासन देखील त्यांनी दिले आहे. माझ्यासाठी देखील तो क्षण आनंदाचा असेल, आम्ही त्याची वाट पाहू. सहकार क्षेत्रात अशा प्रकारचे बदल होत असतात, त्यामुळे आश्चर्य वाटण्याचे किंवा दुःख करण्याचे कारण नाही. उलट आपली जबाबदारी आता वाढली आहे, यापुढे आणखी नेटाने काम करू, असेही बंब यांनी स्पष्ट केले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com